docalityआजचे कोडे इंग्रजी शब्दांवर आधारित आहे. इंग्रजी शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला मराठी सूचक शब्द दिलेले आहेत. या शब्दकोडय़ांची एक गंमत म्हणजे यात गणितासारखी बेरीज वजाबाकी करायची आहे. पहिला शब्द ओळखल्यावर त्यापुढेच तुम्हाला कंसात एक अक्षर आणि बेरीज किंवा वजाबाकीचे चिन्ह देण्यात आलेले आहे. तुम्ही ओळखलेल्या शब्दातून अक्षर काढून टाकले किंवा त्यात वाढविले तर जी अक्षरे मिळतात त्यांचा योग्य क्रम लावून सूचक शब्दांच्या साहाय्याने तो ओळखायचा आहे.
सूचक शब्द –
१) विक्री २) पाटी ३) चोरणे, लंपास करणे
४) अत्याधुनिक, अद्ययावत ५) लढाया ६) औषधाच्या गोळ्या ७) स्थिर, तबेला ८) किमान ९) गोष्टी, कथा १०) मीठ
उत्तर
1) SALE 2) SLATE
3) STEAL 4) LATEST
5) BATTLES 6) TABLETS
7) STABLE 8) LEAST
9) TALES 10) SALT
manaliranade84@gmail.com