साहित्य : झाकणासकट पाण्याची छोटी रिकामी बाटली, दोन टुथपिक किंवा दोन मोठय़ा जाड सुया, पाण्याच्या बाटलीची चार झाकणे किंवा मोठी बटणे, एक मध्यम आकाराचा फुगा, रबर बँड, कडक परंतु सहज वाकणारा स्ट्रॉ, डिंक
गाडी तयार करण्याची कृती- प्रथम बाटलीला चाके लावून घेऊ. त्यासाठी बाटली आडवी करा. बाटलीच्या खालच्या बाजूला थोडे अंतर सोडून दोन्ही टुथपिक बाटलीच्या आरपार सरकवा. आता बाटलीच्या झाकणांना छोटे भोक पाडून टुथपिकच्या दोन्ही बाजूंना एकेक याप्रमाणे चारही झाकणे टुथपिकमध्ये अडकवा. झाकणे पक्की बसावीत म्हणून त्यावर थोडा डिंक लावा. अशा प्रकारे आपल्या गाडय़ांची चाके तयार झाली. गाडी मागे पुढे करून चाके सहजपणे हलत असल्याची खात्री करा.
आता बाटलीच्या वरच्या बाजूला स्ट्रॉ जाइल एवढेच एक भोक पाडा. आणि दुसरे भोक बाटलीच्या झाकणाच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच बाटलीच्या तळाला पाडा. आता स्ट्रॉ या दोन्ही भोकातून आरपार गेला पाहिजे. आता चाकाच्या वरच्या भागातून बाहेर आलेल्या स्ट्रॉला रबर बँडच्या सहाय्याने फुगा जोडा.
अशा प्रकारे आपली संपूर्ण गाडी तयार झाली आहे. आता स्ट्रॉचे उघडे टोक तोंडात धरून स्ट्रॉच्या दुसऱ्या बाजूला जो फुगा आहे तो फुगवा. फुगा पुरेसा फुगवून झाल्यावर स्ट्रॉच्या टोकावर बोट दाबून धरा. गाडी सपाट पृष्ठभागावर
ठेवा. आता स्ट्रॉच्या टोकावर ठेवलेले बोट काढा आणि काय गंमत होते ते पाहा. फुग्यात
हवा असेपर्यंत आपली ही गाडी वेगाने पुढे धावताना दिसेल.
वैज्ञानिक तत्त्व : न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार लावलेल्या प्रत्येक बलास तेवढेच प्रतिक्रिया बल तयार होते. येथे स्ट्रॉच्या टोकावरील बोट काढल्यावर फुग्यात
भरलेली अधिक दाबाची हवा स्ट्रॉतून
वेगाने बाहेर म्हणजे मागे फेकली जाते. त्याची प्रतिक्रिया म्हणून बाटलीची गाडी विरुद्ध दिशेने म्हणजे पुढे ढकलली जाते. हा प्रयोगवर https://www.youtube.com/watch?v=nWE8e0OBDjM पाहू शकता.
manaliranade84@gmail.com

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!