मित्रांनो, नवरात्र हा आदिशक्ती कालिमातेचा उत्सव आहे. त्यातून तिच्या विविध रूपांचा आपल्याला परिचय होतो. स्त्रीची विविध रूपे हा आजच्या कोडय़ाचा विषय आहे. उदाहरणार्थ, अध्यापिका म्हणजेच शिक्षिका या स्त्री रूपाची तुम्हाला शालेय जीवनात ओळख आहेच. नातेसंबंधातील स्त्रीची प्रमुख रूपे आपण ‘अ’ गटात घेणार आहोत. ‘ब’ गटात तुम्हाला सुप्रसिद्ध गाण्यांच्या ओळी दिलेल्या आहेत. या गाण्यांतील ओळी ‘अ’ गटातील कुठल्या स्त्री रूपाशी संलग्न आहेत याच्या जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत. अ गट माता, बहीण, भावजय, मैत्रीण, आजी, मुलगी, स्नुषा, नवरीब गट१) नको ताई रुसू, कोपऱ्यात बसूयेऊ दे गं गालात खुदकन हसू२) कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला,वैभवाने बहरून आला, याल का हो बघायाला३) मायेविण बाळ क्षणभरी न राहे।न देखतां होय कासावीस॥४) तुझी नि माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानातआपण दोघी बांधू या गं दादाचं घर बाई उन्हात५) आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाहीम्हणून श्रीकाराच्या नंतरशिकणे अ, आ, ई६) पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडावधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा!७) चला सख्यांनो हलक्या हाते,नखांनखांवर रंग भरा गंनखांनखांवर रंग भरा८) चल गं सये वारुळाला, वारुळाला, वारुळाला नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला ९) ताईबाई, ताईबाई गं,अता होणार लगीन तुमचं!१०) गोरी गोरीपान, फुलासारखी छानदादा, मला एक वहिनी आण११) तव भगिनीचा धावा ऐकुनि धाव घेई गोपाळागोपाळा लाज राख नंदलाला१२) लेक लाडकी या घरचीहोणार सून मी त्या घरची१३) कन्या सासुऱ्यासीं जाये।मागें परतोनी पाहे ॥ १॥१४) नववधू प्रिया मी, बावरतेलाजते, पुढे सरते, फिरते१५) करु देत शृंगार, सख्यांनो करु देत शृंगारअग्नीवाचून आज करितसे राजपुती जोहार१६) दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ छोडमे जी ये गमुस्सा ज़्ारा हँस के दिखाओ १७) जननी जन्मभूमि स्वर्ग से महान हैजिसके वास्ते ये तन है मन है और प्राण है॥१८) नानी तेरी मोरनी को मोर ले गएबाकी जो बचा था काले चोर ले गए