साहित्य– टुथपेस्ट किंवा सॉसपॅकची दोन झाकणे, एक मोठ्ठे गोल झाकण (फेसवॉशचे) बॉलपेनचे जुने रिफिल किंवा स्ट्रॉ, फुलपुडीचा दोरा, कागद, स्केचपेन, फेली बॉण्ड (प्लॅस्टिक चिकटवायचे) कात्री, इ. रंगाचे साहित्य (अ‍ॅक्रॅलिक रंग), हिरवा रंग.
कृती– दोन लाल झाकणे एकमेकांना उभी चिकटवा (पोकळ बाजू खाली जाईल अशा पद्धतीने). पांढऱ्या कागदावर झाकणाचे ठसे घ्या व गोलाकारात कापा. आतील बाजूस काळ्या स्केचपेनने डोळे तयार करा व झाकणाच्या वरील बाजूस चिकटवा. स्ट्रॉचे तीन समान आकार कापा. साधारण झाकणाच्या रुंद बाजूच्या दुप्पट अंतराने भाग करा.  दोन्ही बाजू एकामेकांस जोडा व घट्ट दोरा गुंडाळत चिकटवा व तिन्ही तुकडे अशाच प्रकारे तयार करा.  हिरव्या अ‍ॅकॅ्रलिक रंगात रंगवा व वाळू द्या.
पांढरा कागद मधोमध दुमडा व कापा व चित्रात दाखविल्याप्रमाणे रंगवा.  आता सर्व भाग बेडकाच्या आकारात एकत्रितपणे चिकटवा. पोटाला थोडासा ठिपक्यांसारखा हिरवा रंग दिल्यावर कस्सा दिसतोय बेडूकदादा?
अर्चना जोशी – muktakalanubhuti@gmail.com