झाडातून, खिडकीतून, तर कधी फटीतून
कधी छपरातून, तर कधी थेट दरवाजातूनbal06
मी येतो तुम्हाला भेटायला,
सूर्यकिरणांची नक्षी दाखवायला
परावर्तीत प्रकाशाचे दूत आम्ही
विस्मृतीत झालो जमा
आमचे खेळ बघायचे तर मग गावाकडे चला

कवडसे

पाणी तापले, त्याने घेतले वाफेचे रूप
उंचच उंच उडाले ते आकाशात खूप
फिरता फिरता घेतले विविध आकार
थंडावा मिळताच परत पाण्याची धार
जिकडून निघाले, तिकडेच परत आले
सांगा सृष्टीचे कोणते चR पूर्ण झाले?

पावसाचे जलचक्र

कधी मी गुरू होऊन तुम्हाला ज्ञान देतो
कधी मित्र होऊन तुमची करमणूक करतो
आजचा मी उद्या शिळा होतो
आणि रोज नव्याने जन्म घेतो
चारी दिशेने मला खाद्य पुरवतात
वाचक मला चहाबरोबर चाळतात

वर्तमानपत्र

ज्योती कपिले – jyotikapile@gmail.com