मित्रांनो, व्हाट्स अ‍ॅप, फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया आधी.. मेसेज आणि ई-मेलच्यादेखील आधीही लोकांना सणासुदीच्या शुभेच्छा, भेटवस्तू द्यायची पद्धत होती. परंतु त्या काळी ती प्रत्यक्ष भेटून दिली जायची. आजही फ्रेंडशिप डे असला की प्रत्यक्ष भेटून हाताला रिबीन बांधून शुभेच्छा देतात. पण हीच व्यक्ती लांब असली की पत्राद्वारे केवळ शुभेच्छा पोहचवल्या जाऊ  लागल्या.

त्यात आकर्षकपणा आणण्यासाठी ग्रीटिंग म्हणून ग्रीटिंग कार्डस देऊ  लागले. आजही वाढदिवसाला, मदर्स, फादर्स डेला ग्रीटिंग देतात. परंतु हे प्रमाण आताशा खूपच कमी झालंय. सुंदर कवितांनी, सुविचारांनी, विचारांनी नटलेली ग्रीटिंग्स हळूहळू लोप पावत आहेत.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
kolhapur, Two Arrested in scam, India Makers Agro Scam, Rs 2 Crore Assets Seized, shridhar khedekar, suresh junnare, lure, crore scam, police, scam news, kolhapur news, marathi news,
कोट्यवधीचा गंडा; इंडिया मेकर्स ऍग्रो इंडियाशी संबंधित आणखी दोघांना कोल्हापुरात अटक
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

आपले रोजचे जीवन सुखकर व्हावे म्हणून वर्षभर खूप लोक कार्यरत असतात; जे आपल्याला सेवा पुरवतात. कचरावेचक, पोस्टमन, बस कंडक्टर, नेहमीचा वेटर, लॉन्ड्रीवाला, मच्छीवाली, भाजीवाले, सलुनवाला ते शिक्षकांपर्यंत असे कोणीही यात येऊ  शकतं! त्यांना तुम्ही दिवाळी शुभेच्छा कशा देता? देता की नाही?

नसाल देत तर यावेळी न चुकता द्या.

ही २ सुंदर चित्रं किंवा तुम्हाला सुचलेली २ चित्रं सूचनेप्रमाणे कापून घ्या. ही २ टपालपत्राला चिकटवता येतील. किंवा तुम्हीही चित्र काढू शकताच!

पटकन व छानसे ग्रीटिंग आपोआप तयार होईल. यात मागे शुभेच्छा व त्या व्यक्तीचे नाव पत्ता लिहून भारतात कुठेही ‘फ्री’ म्हणजे एकदम ‘चकटफू’ पाठवू शकाल किंवा प्रत्यक्ष भेटून देऊही शकाल.. करताय ना मग सोपी ग्रीटिंग्जस!

– श्रीनिवास आगवणे

chitrapatang@gmail.com