साहित्य :
प्लॅस्टिकच्या गोल डब्याचे झाकण, उदबत्ती, मेणबत्ती, माचिस, स्केचपेन, रांगोळी.

कृती :
गोल डब्याचे झाकण खोलगट बाजू वर ठेवून हवे ते सोप्पेसे चित्र स्केचपेनच्या साहाय्याने काढून घ्या. मेणबत्ती पेटवून ठेवा आणि उदबत्ती लावा. काढलेल्या चित्राला जवळ जवळ छिद्र पाडायला सुरुवात करा. जळती उदबत्ती प्लॅस्टिकवर ठेवल्यास छोटेसे छिद्र तयार होण्यास वेळ लागत नाही. काम पटापट आटपणे भाग पडते. अगदी लहान मुलांनी मोठय़ांच्या, दादा-ताईंच्या सोबतच ठसा बनवा. अन्यथा चटका लागण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या डिझाइन्सचे ठसे बनवा आणि दिवाळीची रंगीत मजा लुटा.