मुलं ही फुलांसारखी असतात, असं म्हणतात. मग ही फुलं कशी असतात? त्यांचे रंग,  गंध, आकार या पलीकडेही त्यांच्यात अनेक रहस्य दडलेली असतात.. त्याचीच गंमत..

छोटी छोटी फुले, पाकळ्यांचा शुभ्र पांढरा रंग, हिरवे चुटुक देठ आणि त्याची सुंदर रचना, मंत्रमुग्ध करणारा सुगंध.. काय, काही ओळखीचे वाटतेय का? मी कोणत्या फुलाबद्दल बोलतोय ते?.. मोगरा..

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

अगदी बरोबर..

मोगऱ्याचे शास्त्रीय नाव  Jasminun Sambac (जासमिनन साम्बाक) असे असून ती भारतीय वनस्पती आहे. नोव्हेंबर महिना सरला की मोगऱ्याला बहर यायला सुरुवात होते. मोगऱ्याचे झुडुप किंवा वेल असते. ते फुलांनी बहरतात. हिरव्यागार पानांमध्ये पांढरीशुभ्र फुलांची रंगसंगती खूप संदर दिसते. आकाशातील चांदण्याच या रोपाला/ वेलीला लगडल्यात की काय असेच वाटते. मोगरा ही खूप सूर्यप्रकाशात वाढणारी वनस्पती. त्याला सावली अजिबात आवडत नाही. सावलीत असणाऱ्या मोगऱ्याला कधीही फुले येत नाहीत. प्रखर सूर्यप्रकाशात मोगरा बहरतो. मोगऱ्याला फुले येतात. पण फळधारणा होत नाही नि फळे नसल्यामुळे बिया नसतात, त्यामुळेच मोगऱ्याची रोपे तयार करण्यासाठी मोगऱ्याच्या फांद्या वापरल्या जातात. पावसाळ्यात मोगऱ्याची फांदी लावली असता लवकर जगते. आपल्याकडे सिंगल (पाकळ्यांची एकच रिंग) आणि डबल (पाकाळ्यांच्या दोन-तीन रिंग)अशी दोन्ही प्रकारची फुले आढळतात. मोगरा ही बहुवर्षांयू वनस्पती असून दरवर्षी याची छाटणी केली असता फुले येण्याचे प्रमाण वाढते तसेच फुले देखील टपोरी मिळतात.

मोगरा लोकप्रिय आहे तो त्याच्या सुगंधासाठी. मोगऱ्याच्या फुलांचे गजरे, वेण्या, हार केले जातात. मोगरा हा शोभेची तसेच सुगंधी वनस्पती म्हणून वापरली जाते. मोगऱ्याच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार केले जाते. त्याचा वापर परफ्यूम, अत्तर, साबणं, अगरबत्ती, रुमफ्रेशनर तयार करण्यासाठी होतो. मोगरा तुरट व थंड आहे. आयुर्वेदात मोगरा रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी तसेच खूप ताप असेल तर वापरला जातो. मोगऱ्याचे सुगंधी तेल पुष्पौषधी (Aroma Therapy) मध्ये  वापरले जाते. चीनमध्ये मोगऱ्याच्या फुलांपासून बनवलेला Jasmine Tea (चहा) खूप लोकप्रिय आहे. हा चहा ताप तसेच मूत्ररोगावर गुणकारी आहे. मानसिक ताणतणाव तसेच उन्हापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी देखील तो उपयुक्त ठरतो. मोगऱ्याचा सुगंध वातावरण उल्हसित करतो. तसेच मनदेखील प्रसन्न करतो. मग काय थोडा प्रयत्न केलात तर आपल्या घरातदेखील मोगऱ्याचे शुभ्र सुगंधी नि मन प्रसन्न करणारे चांदणे लगडू शकते. मग काय, लागा तयारीला!

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com