bal04आजचे आपले कोडे हे पक्षीनिरीक्षणावर आधारित आहे. येथे तुम्हाला भारतात आढळणाऱ्या काही पक्ष्यांची वैशिष्टय़े आणि त्यांची छायाचित्रे त्यांच्या नावांसहित दिलेली आहेत. कुठले वैशिष्टय़ कोणत्या पक्षाचे आहे हे तुम्हाला शोधायचे आहे. चला तर!
पक्ष्यांची वैशिष्टय़े
१) पाने गोल वळवून त्यांच्या कडा आपल्या सुईसारख्या चोचीने नैसर्गिक धाग्यांनी शिवून घरटे तयार करणारा पक्षी.
२) लांबलचक, धारदार आणि अणकुचीदार चोचीने झाडाच्या खोडावर टकटक आवाज करत ते पोखरून बिळासारखे घरटे तयार करणारा पक्षी.
३) तांब्याच्या पत्र्यावर ठोके घालताना जसा आवाज येतो तसा आवाज काढणारा, जाड, आखूड
चोचीचा पक्षी.
४) शेपटी वारंवार खाली-वर हलवण्याची सवय असलेला पाणवठय़ाजवळ किंवा दगडांच्या कपारीत घरटी करणारा पक्षी.
५) झाडावर बसून शिकारी पक्ष्यांना हुसकावून इतर पक्ष्यांचे संरक्षण करणारा पक्षी.
६) गवत व काथ्या इत्यादींच्या धाग्यांनी सुरेख विणकाम करून पालथ्या चंबूसारखे घरटे तयार करणारा पक्षी.
७) जास्तीचे मिळवलेले भक्ष्य बाभळीसारख्या काटेरी झुडपांवर टांगून साठवण करणारा शिकारी पक्षी.
८) डोळ्याभोवती पांढऱ्या रंगाचे वर्तुळ असणारा, खुंटीला टांगलेल्या पिशवीसारखे घरटे बनवणारा पक्षी.
९) गोड आवाजाचा, पिवळ्या धमक रंगाचा पक्षी

उत्तरे : १. C)शिंपी (Tailorbird)
२. इ) सुतार (Woodpecker)
३. ओ) तांबट (Coppersmith Barbet)
४. ए) परीट, धोबी (Wagtail)
५. आ) कोतवाल (Drongo Cuckoo)
६. ऐ) विणकर (सुगरण) (Weaver Bird)balmaifil

scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

ज्योत्स्ना सुतवणी -jyotsna.sutavani@gmail.com