साहित्य : हॅण्डमेड पेपर, सुतळ, खराब झालेली सी. डी., कात्री, गम, ब्रश, सोनेरी अ‍ॅक्रिलिक रंग इ.
कृती : आपल्याला हव्या त्या आकारात हॅण्डमेड पेपर चौकोनात कापून घ्या. आतमध्ये मोठ्ठे सूर्याचे चित्र काढून घ्या. आऊटलाइनवर गमच्या साहाय्याने सुतळ चिकटवून घ्या. पूर्णपणे वाळल्यावर बारीक ब्रशच्या साहाय्याने सोनेरी रंगाने रंगवा व वाळू द्या. जुन्या सी. डी.चे कात्रीने लांब व छोटे असे त्रिकोण मोठय़ा आकारात मावतील अशा पद्धतीने कापून घ्या. यातूनच सूर्याचे नाक, डोळे, तोंड अशा आकाराच्या तुकडय़ांना कापून घ्या. झाली आपली सूर्यसजावट.
काही दिवसांमध्ये गणपती घरोघरी विराजमान होईल. त्यासाठी तुम्ही इकोफ्रेंडली व टाकाऊपासून टिकाऊ अशी सूर्यसजावट करू शकता.

डोकॅलिटी
बालमित्रांनो, आज आहे कृष्णाष्टमी. विष्णूच्या अनेक रूपांपकी आपले सर्वात लाडके रूप म्हणजे कृष्ण. त्याच्या बाललीलांचे कौतुक म्हणून आपण दहीहंडीचा उत्सव साजरा करतो. मोरपिसाचा मुकुट आणि बोटावर सुदर्शनचक्र धारण करणारा, बासरी वाजवून गोकुळाला वेड लावणारा असा हा कृष्ण. आजच्या कोडय़ात त्याची नावे तुम्हाला शोधायची आहेत. त्यात थोडी मदत म्हणून तुम्हाला चौकटीत अक्षरांची रचना करून दिली आहे. उत्तरात दिलेल्या नावांपेक्षा तुम्हाला वेगळी नावेही सापडू शकतील.                                        ज्योत्सना सुतावाणी  jyotsna.sutavani@gmail.com