आईला सांगू का

गोष्ट मीच एक

Maharashtrian Style Gavachi Kheer or Wheat Kheer Note The Recipe And Try Ones At Home
Wheat Kheer Recipe: पौष्टिक अन् खमंग गव्हाची खीर बनवा; ‘ही’ सोपी पद्धत लगेच नोट करा
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

गव्हाचे दाणे गं

अंगणात फेक!

 

अंगणी येईल

चिमणी लाजाळू

दाणे दोन-चार

टिपेल ती हळू!

 

हळूच येईल

कावळा हुशार

टिपून तो दाणे

होईल पसार!

 

मान वेडावत

येईल पारवा

टिपून दाण्यास

जाईल दूर गावा!

 

पोपट म्हणत

येईल तो गाणे

मिठ्ठू मिठ्ठू म्हणून

खाईल तो दाणे!

 

धावत पळत

कोंबडा येईल

कोंबडीसोबत

दाणे वेचून जाईल

 

अटक मटक

ती येईल खारू

खाऊन ती दाणे

जाई तुरुतुरु!

 

अंगणी सगळे

येतील ना असे

आई गं अंगण

सुंदरसे दिसे!