साहित्य – रंगीत कार्डपेपर, कात्री, पेन्सिल, रबर पट्टी, सजावटीचे साहित्य, लेस, गम.

कृती – १५ सेंमी रुंदी आणि २६ सेंमी लांबीचा कार्डपेपर घ्या. आकृतीत  दाखविल्याप्रमाणे रेषा आखून घ्या. प्रत्येक रेषेवर पट्टीने दुमडून घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे तुटक रेषेवर कापून घ्या. कार्डपेपरचा अधोरेखित भाग कार्डपेपरच्या दुसऱ्या भगाला गमने चिकटवा. खालील बाजू वर करून समोरासमोरचे भाग आधी चिकटवून घ्या, मग बाकीचे भाग चिकटवा. वरचा अधोरेखित भाग आतमध्ये दुमडून व बाहरेच्या त्रिकोणास भोके पाडून लेस किंवा रंगीत दोरी ओवून घ्या, म्हणजे बटव्याचा आकार तयार होईल. त्यावर तुमच्या आवडीप्रमाणे सजावट करा. सक्रांतीला हलवा व तिळगूळ ठेवायला हा कागदी बटवा वापरा.