आभाळाचा फळा
वाच ना रे बाळा
कधी सावळा तर
कधी दिसे निळा

आभाळात ढग कसे
पळताना दिसे
कधी इंद्रधनु येऊन
पावसात हसे

Chef Vikas Khanna's favorite kairicha thecha
शेफ विकास खन्ना यांचा आवडता कैरीचा ठेचा खाल्ला आहे का? नसेल तर एकदा खाऊन पाहा, ही घ्या रेसिपी
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
Use Apps to Manage Electricity Use and Reduce Bills During Summer Heatwaves
भरमसाठ वीज देयक येते का? ‘हे’ करा मग येईल वीज वापराचा अंदाज…
pimpri chinchwad, citizen, water scarcity, Pavana Dam, Water Storage, Decrease, Summer Heat Rises, Evaporation, marathi news,
पिंपरी-चिंचवडवर पाणीटंचाईचे संकट?… पवना धरणातील पाणीसाठ्यात घट

पहाटेला पूर्वेकडून
सूर्यदादा येई
हळूहळू साऱ्या दिशा
लख्ख होऊन जाई

सायंकाळी सूर्यदादा
गुडूप जेव्हा होतो
आभाळाला चांदण्यांचे
दान देऊन जातो

दिवसागणिक चंद्र त्याच्या
कला दाखवितो
आभाळाच्या भाळावरी
मजेने फिरतो

आभाळाचा फळा बाळा
आहे चमत्कारी
अख्खी आकाशगंगा बघ
फिरे फळ्यावरी
– एकनाथ आव्हाड

bal02