आश्लेषा महाजन यांच्या शाळेविषयीच्या कविता म्हणजे ‘स्कूल दुनिया’ हा मिंग्लिश काव्यसंग्रह. म्हणजेच हा काव्यसंग्रह मराठी आणि इंग्रजी अशा द्वैभाषिक स्वरूपात आहे. आश्लेषा महाजन यांच्या मराठी कविता श्रीनिवास शारंगपाणी यांनी इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. त्यामुळे मराठी व इंग्रजी माध्यमातल्या मुलांनाही या कवितांचा आस्वाद घेता येईल.
कवयित्रीने या कवितांच्या माध्यमातून मुलांचे शालेय जग अलवारपणे उलगडले आहे. या कविता वाचताना शालेय जीवनातील आपलेच भावविश्व कवयित्रीने शब्दबद्ध केले आहे की काय, असे वाटत राहते. या कवितांमध्ये लाडक्या बाई येतात, मुलांची काळजी घेणारी आई येते, सुट्टीतली मजामस्ती- रूक्ष दिवस, पुस्तकं, वही, अक्षरे, अंगावर शहारे आणणारी परीक्षा.. अशा अनेक गोष्टी येतात. मराठी कविता आणि शेजारच्याच पानावर तिच इंग्रजी अनुवादित कविता वाचण्याची एक आगळी मजा अनुभवता येते.
या कवितांना आदित्य महाजन आणि आश्लेषा महाजन यांनी समर्पक चित्रे रेखाटली आहेत.
‘स्कूल दुनिया’, आश्लेषा महाजन,
श्रीनिवास शारंगपाणी,
संस्कृती प्रकाशन
पृष्ठे- १५७, मूल्य-१४० रुपये

डिटेक्टिव्ह हर्षद
 उन्हाळ्याच्या सुट्टीत जसे तुम्ही मजामस्तीचे नवनवीन बेत आखता तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत हर्षदला डिटेक्टिव्ह व्हायचे वेध लागतात. तो डिटेक्टिव्ह बनतो आणि त्याच्या स्वभावात कशा प्रकारे सकारात्मक बदल होतो, याच्या गोष्टी म्हणजे ‘डिटेक्टिव्ह हर्षद आणि मूर्तिचोर’, ‘डिटेक्टिव्ह हर्षद आणि रहस्यमयी त्रिकूट’, ‘डिटेक्टिव्ह हर्षद आणि देवटाक्याचे रहस्य’, ‘डिटेक्टिव्ह हर्षद आणि चिक्कीतली चिठ्ठी’. मालविका देखणे यांनी लिहिलेल्या डिटेक्टिव्ह हर्षदच्या चार भागांतील या गोष्टी वाचनीय आहेत. डिटेक्टिव्हगिरी करताना कोणत्या गंमतीजमती घडतात, हर्षद साहसाने व बुद्धीने कशा प्रकारे सफल होतो, हे वाचताना वाचकही या गोष्टींशी समरस होतो.
– ‘डिटेक्टिव्ह हर्षद आणि मूर्तिचोर’, ‘डिटेक्टिव्ह हर्षद आणि रहस्यमयी त्रिकूट’, ‘डिटेक्टिव्ह हर्षद आणि देवटाक्याचे रहस्य’, ‘डिटेक्टिव्ह हर्षद आणि चिक्कीतली चिठ्ठी’
मालविका देखणे,
विजय प्रकाशन,
मूल्य – प्रत्येकी ३० रुपये

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

बोधपर कथा-कविता
अरुण देशपांडे यांचा ‘रेणूची गोष्ट’ हा कथा संग्रह आणि ‘आली आली परीराणी’ हा काव्यसंग्रह अलीकडेच प्रसिद्ध झाले आहेत. ‘रेणूची गोष्ट’ या  कथासंग्रहातील कथा या बोधपर आहेत. करमणुकीबरोबरच या गोष्टींमधून मिळणारा बोध महत्त्वाचा आहे. उत्तम संस्कारांची ओळख, कुठली गोष्ट चांगली-वाईट याची शिकवण या कथांमधूान देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
‘आली आली परीराणी’ या काव्यसंग्रहात बोधपर, निसर्ग, आजी-आजोबा, प्राणी यांच्यावर  कविता रचल्या आहेत. गेयपूर्ण कविता मुलांना आवडतील अशाच आहेत.
रेणूची गोष्ट (कथासंग्रह)
आली आली परीराणी (काव्यसंग्रह),
 अरुण देशपांडे
चेतन बुक्स प्रकाशन
मूल्य – प्रत्येकी ३५ रुपये

लहानग्यांचे विश्व
‘किलबिलाट’ हा सुकुमार नितोरे यांचा काव्यसंग्रह.  या काव्यसंग्रहातून लहानग्यांना त्यांच्या आवडीच्या प्रांताची सफर घडते. त्यात आहेत पशु-पक्षी, झाडे, पाऊस, त्यांचा लाडका चांदोमामा, फळे, वारा.
‘किती ग अभ्यासाचे डोंगर
उंच उंच पसरले
खेळू दे ना थोडं, बघ ना माझे
मन कोमेजून गेले’
या कवितांमधून कवीने मुलांचे भावविश्व अलवारपणे उलगडले आहे. सहज, सुंदर आणि गेयपूर्ण यांमुळे या कविता लहानग्यांच्या मनाचा ठाव घेतात. सौरभ बेर्डे आणि श्रेया नितोरे यांची सुंदर चित्रे कवितांना अधिकच उठाव देतात.
‘किलबिलाट’, सुकुमार नितोरे,
सानेगुरुजी कथामाला प्रकाशन संस्था, मुंबई<br />पृष्ठे-५२
मूल्य -६० रुपये

सामाजिक सूर
‘वाघूरचं पाणी’ हा अशोक कौतिक कोळी यांचा बालकवितांचा संग्रह. खानदेशी भाषेतून व्यक्त केलेल्या या कवितांना खास ग्रामीण बाज आहे. या कवितांमधून निसर्गाचा ऱ्हास, सरत चाललेलं माणूसपण, हिरमुसलेलं बालपण, मानवता धर्म, स्त्रीभ्रूण हत्या असा या कवितांना उदास सामाजिक सूर आहे. सरदार यांची समपर्क चित्रं कवितांना अधिक गहिरा अर्थ प्राप्त करून देतात.
‘वाघूरचं पाणी’, अशोक कौतिक कोळी,
गाव प्रकाशन,
पृष्ठे -२४, मूल्य- ५० रुपये
 मी क्रांतिवीर बोलतोय..
‘मी क्रांतिवीर बोलतोय..’ ही क्रांतिवीर गाथा. क्रांतिवीरांचे आत्मकथन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. तात्या टोपे, प. रामसिंह कुका, मंगल पांडे, वासुदेव बळवंत फडके, दामोदर चापेकर, वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक अशा ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांचा जीवनपट उलगडला आहे.
‘मी क्रांतिवीर बोलतोय’,
रंजन खरोटे,
नवचैतन्य प्रकाशन,
पृष्ठे- ८७
मूल्य- ९०  रुपये ल्ल