झुळझुळ वाहे नदीचा पाट
उतरून जातो चढणीचा घाट।।

नदीचं पाणी खळ खळ छान
फुलून फुलते हिरवे रान।।

कोकीळ कंठी गातो गळा
मुलांना लागतो शिवार लळा।।

नदीत विसावते गावची पांदण
कडे-कपारी फुलते गोंदण।।

शंख, शिंपले वेचायची भारी
मऊ मऊ गोटे नदी किनारी ।।

तृष्णा तृप्ती, विसावली गुरं
डोहात उडय़ा मारती पोरं।।

नदीच्या पात्रात शिवाचे मंदिर
गूळ खोबरं चोरतो उंदीर।।

वर्षांकाठी येतोय पूर
गावातला कचरा नेतोय दूर।।

झऱ्याच्या पाण्याने भरू या चूळ
शोधायचे नसते नदीचे मूळ।।