सिर्योझाला त्याच्या वाढदिवसाला खूप भेटवस्तू मिळाल्या. पण सर्वात महागडी भेटवस्तू ही त्याला त्याच्या काकांनी दिली होती. त्यांनी त्याला पक्षी पाळण्यासाठी पिंजरा भेट दिला होता. तो पिंजरा अगदी विशिष्ट पद्धतीने बनवला होता. त्याच्या फ्रेमवर एक छोटीशी फळी बसवली होती आणि ती जाळीने झाकलेली होती. त्या फळीवर पक्ष्यांसाठी बिया टाकल्या की त्या हळूच पिंजऱ्यात जाऊन पडायच्या. पक्षी उडून त्या फळीवर बसला, की ती फळी फिरून पिंजऱ्याचा दरवाजा आपोआप बंद होत असे. त्या दिवशी सिर्योझा खूप खूश होता. त्याने धावत जाऊन आईला पिंजरा दाखवला. आई म्हणाली, ‘‘सिर्योझा, हे काही चांगले खेळणे नाही. पक्षी रे तुला कशाला पाहिजे? उगीचच तू त्यांना त्रास देत बसशील.’’

‘‘नाही, मी त्यांना पिंजऱ्यात बसवेन. ते गाणी गातील आणि मी त्यांना खाऊ देईन!’’

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?

सिर्योझाने तो पिंजरा घेतला. त्यातल्या छोटय़ा फळीवर थोडे दाणे टाकले आणि बागेतल्या झाडावर तो पिंजरा अडकवून त्यात कोणता पक्षी अडकतो का याची वाट तो पाहू लागला. पण त्याला तिथे पाहून पक्षी घाबरून पिंजऱ्याकडे फिरकत नव्हते. शेवटी पिंजरा तिथेच ठेवून सिर्योझा जेवायला गेला. जेवण झाल्यावर सहज पाहतो तर काय, पिंजऱ्याचे दार जोरात वाजले आणि पिंजऱ्यात एक पक्षी अडकला. तो पक्षी पिंजऱ्याला चोच मारू लागला. बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागला. पण सिर्योझाला मात्र खूप आनंद झाला, त्याने पिंजरा घरात आणला.

‘‘आई, बघ मी पक्षी पकडला. कदाचित हा बुलबुल आहे. बघ त्याचं हृदय कसं धडधडतंय.’’

आई म्हणाली, ‘‘अरे, हा तर छोटा सूर्यपक्षी (ऋ्रल्लूँ) आहे. हे बघ, त्याला सतावून त्रास देऊ नकोस, तू सोडून दे  त्याला.’’

‘‘अजिबात नाही, मी त्याला खाऊ -पिऊ  घालेन.’’ सियरेझाला आईचं म्हणणं काही पटत नव्हतं.

दोन दिवस सिर्योझाने त्या पक्ष्याची चांगलीच बडदास्त ठेवली. त्याला वेळेवर खायला दिले, पाणी दिले. त्याचा पिंजरा स्वच्छ केला आणि तिसऱ्या दिवशी मात्र त्या पक्ष्याबद्दल तो सर्व विसरलासुद्धा! त्याचे पाणीसुद्धा त्याने बदलले नाही.

आई त्याला म्हणाली, ‘‘बघ, मी म्हटलं होतं ना तुला, तू विसरलाससुद्धा त्या पक्ष्याला! सोडून दे रे त्याला. ऐक माझं.’’

‘‘नाही ग आई, आता नाही विसरणार. आत्ता त्याला पाणी देतो आणि पिंजरापण साफ करून टाकतो.’’  सिर्योझा आपला हात पिंजऱ्यात टाकून साफ करू लागला. पक्षी घाबरून गेला, तो पिंजऱ्यावर चोच मारू लागला. सिर्योझाने पिंजरा स्वच्छ केला आणि तो पाणी आणण्यासाठी धावला. आईच्या लक्षात आलं की तो पिंजरा बंद करायचा विसरलाय. ती एकदम ओरडली, ‘‘सिर्योझा, पिंजऱ्याचं दार बंद कर, नाही तर तुझा पक्षी उडून जाईल.’’

तिची सांगण्याची आणि छोटय़ा सूर्यपक्षाला दरवाजा सापडण्याची एकच वेळ झाली. त्याने आनंदाने जोरात खिडकीकडे झेप घेतली. पण खिडकीची काच त्याच्या लक्षात आली नाही आणि तो जोरात खिडकीच्या काचेवर आपटून खिडकीखाली उलटा पडला. सिर्योझा धावत त्याच्याकडे गेला. त्याने हळूच त्या छोटुल्याला पिंजऱ्यात ठेवलं. अजून तो जिवंत होता, पण तो छातीवरच पडला होता. आपले पंख त्याने पसरले होते, त्याला श्वास घेणेही कठीण झाले होते. सिर्योझाने त्याच्याकडे पहिले आणि त्याला रडूच कोसळले. ‘‘आई, आता मी काय करू?’’

‘‘आता तू काहीच करू शकत नाहीस.’’ आई उत्तरली.

सिर्योझा संपूर्ण दिवस पिंजऱ्याजवळ बसून त्या छोटुल्याकडे बघत होता. पक्षी दिवसभर तसाच पडून होता. त्याचा श्वासोच्छ्वास जोरात चालू होता. जेव्हा सिर्योझा जड पावलांनी रात्री झोपायला गेला तेव्हा सूर्यपक्षी जिवंत होता. बिछान्यावर आडवे झाल्यानंतरही कितीतरी वेळ सिर्योझाला झोप येईना. बऱ्याच उशिरा केव्हातरी त्याचा डोळा लागला.. पण रात्रभर त्याच्या डोळ्यासमोर तो छोटुला पक्षीच येत होता. तो कसा पडला. त्याला कसा श्वास घ्यायला त्रास होतोय.. सकाळी डोळा उघडताच सिर्योझा पिंजऱ्याजवळ धावला, तर त्याला सूर्यपक्षी पाठीवर पडलेला दिसला, त्याचे दोनही पाय वर कडक होऊन

सरळ झाले होते. सिर्योझा खूप दु:खी

झाला. तेव्हापासून  सिर्योझाने चांगलाच धडा घेतला. नंतर त्याने कधीच पक्षी पकडण्याचा हट्ट केला नाही.

-विद्या स्वर्गे- मदाने
vedvidya@yahoo.co.in
(लीओ तालस्तोय यांच्या  मूळ रशियन कथेचा भावानुवाद)