मेष ग्रहमान संमिश्र आहे. जो काम करतो त्याच्याच मागे काम लागते, असा अनुभव येईल. पूर्वी केलेल्या कामातून पसे मिळाल्यामुळे उत्साह संचारेल. नवीन आíथक वर्षांकरिता आखलेले बेत आता कार्यान्वित होतील. नोकरीमध्ये लांबलेली कामे हातावेगळी कराल. नवीन नोकरीच्या शोधात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आपले-परके यातील भेद लक्षात येतील. एखाद्या समारंभानिमित्त बजेटबाहेर जाऊन जास्त पसे खर्च होतील.

वृषभ ग्रहमान संमिश्र आहे. काहीतरी मिळण्याकरिता काहीतरी गमवावे लागते याचा अनुभव येईल. व्यावसायिक प्रगतीकरता व्यक्तिगत सुखामधे थोडी कमतरता सहन करावी लागेल. व्यापारउद्योगात अडकलेल्या देण्यांचा मार्ग मोकळा होईल. कारखानदारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना त्याची माहिती नीट मिळवावी. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी  दिलेले एखादे आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता आहे.  दीर्घकाळानंतर लांबच्या नातेवाईकांना भेटण्याचा कार्यक्रम ठरेल. स्वतचा छंद जोपासाल.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Gold prices hit highs in gold market in Delhi
सोन्याच्या भावाची उच्चांकी गुढी; दिल्लीत भाव ७१ हजार ७०० रुपयांवर पोहोचला
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

मिथुन काही गोष्टी मनाप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी तडजोड करावी लागेल. व्यवसाय-उद्योगात हातातोंडाशी आलेली कामे तांत्रिक कारणामुळे लांबण्याची शक्यता आहे. मालाची विक्री आणि उलाढाल वाढवण्याकरता जनसंपर्क आणि प्रसिद्धीमाध्यमांचा उपयोग करावा लागेल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या आवडीचे काम मिळेल. ते पूर्ण करण्याकरता कोणीचीही मदत मिळणार नाही. घरामधे ठरलेला कार्यक्रम लांबण्याची शक्यता आहे. छंदामुळे करमणूक होईल.

कर्क एक चांगले तर एक वाईट तुमच्या वाटय़ाला येणार आहे. आपुलकीची व्यक्ती तुमच्या जवळ नसल्यामुळे तुम्हाला रीतेपण जाणवेल. व्यापार उद्योगात काही नवीन हितसंबंध निर्माण होतील. पूर्वीचे काम थोडेसे कंटाळवाणे असल्याने त्याला राम राम ठोकावासा वाटेल. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. नोकरीमध्ये कामाच्या वेळेला कोणीच पुढे येत नाही, असा अनुभव येईल. तरीही तुमच्या कार्यात तत्पर राहा. घरात अधिकार गाजवायला जाल. पण इतरांना ते मान्य होणार नाही.

सिंह ग्रहमान संमिश्र आहे. ज्या कामात जातीने लक्ष घालाल त्यात चांगले यश मिळेल. व्यापारउद्योगात बदलत्या वातावरणाची गरज म्हणून कार्यपद्धतीमधे बदल करणे भाग पडेल. त्याचा सकारात्मक विचार करा. उद्योगपतींना नवीन काम मिळविण्यासाठी परदेशवारी करावी लागेल. नोकरीमधे आवडते काम उत्साहाने कराल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी दृष्टिक्षेपात येईल. घरामधे एखाद्या मुद्दय़ावर झालेला विरोध मावळेल.

कन्या या आठवडय़ात एखादे काम तुम्हाला दगदग, धावपळ करायला लावेल. व्यापार-उद्योगातील प्रवासाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला करा. सप्ताहाच्या मध्यानंतर पूर्वी केलेल्या एखाद्या कामातून तुम्हाला अचानक पसे मिळतील. खेळत्या भांडवलाची सोय होईल. नोकरीच्या ठिकाणी तेच काम परत करायला लागल्यामुळे तुम्ही थोडासा आळस कराल. वरिष्ठ मखलाशी करून तुमच्याकडून आवळा देऊन कोहळा काढतील. घरामधल्या व्यक्तींना कामाच्या वेळेला तुमची आठवण येईल.

तूळ स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याचा अनुभव येईल. मध्यस्थांवर सोपवलेली कामे नीट पार न पडल्यामुळे लक्ष घालावे लागेल. व्यापारउद्योगात रोखीपेक्षा उधारीचे व्यवहार जास्त होतील. नोकरीमध्ये महत्त्वाचे काम स्वत: हाताळा. बदली हमी असेल तातडीने हालचाल करा. नवीन नोकरी घाईने स्वीकारू नका. घरामधे एखाद्या प्रसंगामुळे आपले-परके यांतील फरक कळणार नाही. मनात थोडी नाराजी राहील. वस्तूंची मोडतोड वगरे गोष्टींमुळे खर्च वाढतील.

वृश्चिक तुम्ही इतरांवर सोपवलेली कामे  अर्धवट राहिल्यामुळे तुम्हाला ती पूर्ण करावी लागतील. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरिता एखादा धोका पत्कारावासा वाटेल. पण या बाबतीत कोणीच तुम्हाला साथ द्यायला तयार होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी जो काम करतो त्याच्याच मागे काम लागते असा अनुभव येईल. वरिष्ठांच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. घरामध्ये प्रिय व्यक्तीशी काही कारणाने दुरावा निर्माण होईल. तो दूर करण्याकरिता एखादे आश्वासन द्यावे लागेल.

धनू कंटाळा न येणे या तुमच्या गुणाचा या आठवडय़ात सगळ्यांना उपयोग होईल. अपेक्षित व्यक्तींकडून साथ न मिळाल्यामुळे एकटे पडल्यासारखे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी जिथे कमी तिथे आम्ही असा अनुभव तुम्हाला येईल. वरिष्ठांच्या शब्दाला मान देऊन काम चांगल्या पद्धतीने पार पाडाल. घरामधे कोणत्याही कामामधे माघार घेणार नाही. त्यामुळे सगळ्यांना तुम्ही हवेहवेसे वाटाल. एखाद्या व्यक्तीशी किरकोळ कारणावरून खटके उडतील.

मकर ग्रहमान परस्परांविरोधी आहे. सहसा स्वतच्या कामापासून लांब गेलेले तुम्हाला आवडत नाही. पण या आठवडय़ामध्ये थोडासा आराम करावासा वाटेल. त्यामुळे फक्त महत्त्वाची कामे हाताळाल. व्यापारउद्योगात अर्धवट राहिलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही थोडेसे निश्चित बनाल. पशाची आवक साधारण राहील. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामांमधे कष्ट कमी असतील असे काम तुम्ही पसंत कराल. बाकी कामे लांबविण्याचा प्रयत्न कराल. घरामधे कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल. लांबच्या नातेवाईकांशी गाठभेट होईल.

कुंभ दुरून डोंगर साजरे हा अनुभव येईल. ज्यांच्यावर अवलंबून आहात ते आपला शब्द आयत्यावेळी फिरवतील. याउलट ज्यांच्याकडून अपेक्षा नाही अशा व्यक्ती साथ देतील. व्यापार-उद्योगात कामकाज चांगले असल्यामुळे गतिमान व्हाल. नोकरीमधे वरिष्ठ एकामागून एक कामे सांगत जातील. आवडत्या सहकाऱ्यांची अनुपस्थिती असल्यामुळे कामाचा तणाव जाणवेल. घरामध्ये एखाद्या मुद्यावरती तडजोड करावी लागेल. एखादा ठरविलेला कार्यक्रम अचानक रद्द करावा लागेल.

मीन गेल्या दोनतीन आठवडय़ात तुमचे जीवन काही कारणाने बेचव झाले असेल, तर ते आता पुन्हा सक्रिय हाईल. व्यापार-उद्योगात आपल्या मालाची विक्री वाढवण्यासाठी एखदी नवीन युक्ती अमलात आणाल. त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये कामाचा तणाव पडणार नाही. एखादी अवघड जबाबदारी पार पाडाला. घरामध्ये लांबलेल्या एखाद्या कार्यक्रमाचे फेरनियोजन होईल. लांबच्या प्रवासाचे बेत ठरतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com