01vijayमेष जी कामे तांत्रिक कारणांमुळे लांबली होती त्यांना वेग यायला लागल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल, पण साध्या आणि सरळ वाटणाऱ्या कामात गुंतागुंत झाल्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल. व्यापार-उद्योगात मोठे निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींशी सल्लामसलत करा. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना काम मिळू शकेल. चालू नोकरीमध्ये वरिष्ठ विविध प्रकारची कामे तुम्हाला सांगून तुमच्या संयमाची परीक्षा बघतील. घरामध्ये थोडेसे तडजोड करण्याचे धोरण ठेवले, तर सगळ्यांचा आनंद वृद्धिंगत होईल.

वृषभ दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य तुम्हाला दाखवावे लागेल. व्यापारी वर्गाला गिऱ्हाईकांच्या बदलणाऱ्या आवडीनिवडी सांभाळण्याकरिता कामाच्या पद्धतीत लवचीकता ठेवणे भाग पडेल. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करावेसे वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची अपेक्षा असेल की तुम्ही एकाच वेळेला वेगवेगळ्या प्रकारची कामे हाताळावी. त्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. घरामध्ये मुलांच्या वागण्यामुळे, मागण्यामुळे तुम्ही थोडेसे विचारात पडाल.

मिथुन नेहमीची धावपळ थोडीशी कमी झाल्यामुळे तुम्ही आता तुमच्या पद्धतीने काम करायचे ठरवाल. व्यापार-उद्योगात बाजारातील घडामोडी आणि काळाची गरज या दोन्हींचा एकंदर आढावा घेऊन काही तरी वेगळे आणि नावीन्यपूर्ण केले पाहिजे असे तुम्हाला वाटेल. नोकरीमध्ये कामातला तोचतोचपणा नकोसा वाटेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नांना गती द्यायचे ठरवाल. घरामध्ये तुमचे विचार तुमच्या दृष्टीने योग्य असतील, पण बुजुर्ग व्यक्तींना ते अव्यवहारी वाटल्यामुळे त्यांच्याकडून नकारघंटा ऐकायला मिळेल.

कर्क नेहमीच्या कामाचा सहजगत्या कंटाळा येईल. त्यापेक्षा काही वेगळे असेल तर त्यात लक्ष घालायला ताबडतोब तयार व्हाल. व्यापार-उद्योगात चालू कामाव्यतिरिक्त एखाद्या नवीन कार्यपद्धतीविषयी माहिती करून घ्याल. त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा मोह होईल, पण निष्णात व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय घाईने निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये भरपूर काम करण्याची तुमची तयारी असेल. घरामध्ये नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्याशी हितसंबंध चांगले ठेवण्यासाठी पशाची उधळ उसनवारी करू नये.

सिंह अनेक चांगली कामे करूनही तुमच्यावर टीका ऐकायला लागल्यामुळे तुम्ही चिथावून जाल. व्यवसाय-उद्योगात कोणाकडून पसे उधार घेतले असतील तर त्याची परतफेड करा, नाही तर संबंधित व्यक्तींशी गरसमज होतील. जागेचे नूतनीकरण, साफसफाई वगरे गोष्टींना तुम्ही महत्त्व द्याल. नोकरीमध्ये संस्थेत काय चालले आहे याच्याकडे जास्त लक्ष न देता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. घरामध्ये जी गोष्ट इतरांना प्रेमाने समजेल, ती धाकाने सांगितलीत तर आवडणार नाही.

कन्या इतर वेळेला तुम्ही शांतपणाने आणि तुमच्या पद्धतीने काम करता त्यामुळे कामाचा दर्जा उत्तम राहतो. या आठवडय़ातही तुम्हाला त्याच पद्धतीने काम करण्याची इच्छा असेल. व्यापार-उद्योगातील कमाईमध्ये थोडीफार वाढ होण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीमध्ये एखादे काम पूर्ण करण्याकरिता तुमची शक्ती-युक्ती तुम्ही पणाला लावाल. त्यात यशाची खात्री वाटेल. घरामध्ये एकंदर वातावरण जरी समाधानकारक असले तरी इतर सदस्यांनी वेडय़ावाकडय़ा कारणाकरिता पसे खर्च केलेले तुम्हाला आवडणार नाही.

तूळ इतर वेळी तुम्ही कोणताही निर्णय घेताना खूप विचार करता. पण या आठवडय़ात मात्र व्यवहारापेक्षा भावनेला जास्त महत्त्व देऊन तुम्ही काम करायला प्रवृत्त व्हाल. व्यापार-उद्योगात एखादा नवीन आकर्षक प्रस्ताव तुमच्यापुढे मांडला जाईल. पण नीट आकडेमोड केल्यावर हा प्रकार म्हणजे भूलभुलया असण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमच्या मर्यादा न ओलांडता जेवढे आणि जसे काम होईल त्यात समाधान माना. घरामध्ये जोडीदाराच्या वागण्या-बोलण्यामुळे किंवा प्रकृतीमुळे चिंता वाटेल.

वृश्चिक ‘गूढ रास’ असे तुमच्या राशीचे वर्णन केले जाते. ज्या वेळी तुम्ही शांत असता त्या वेळी तुमच्या मनात अनेक विचार चालू असतात. व्यापार-उद्योगात सणासुदीकरिता विशेष बेत तुम्ही ठरवाल. त्याला आवश्यक असणाऱ्या पशाची आणि साधनसामग्रीची तयारी करण्याकरिता बरीच मेहनत घ्याल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याशी सल्लामसलत करून कामाच्या स्वरूपात थोडेसे फेरफार करतील. त्यामुळे तुमची धावपळ होईल. घरामध्ये तुम्ही आवश्यक त्या व्यक्तीला योग्य सल्ला व साथ देऊन उपकृत कराल.

धनू एखादी गोष्ट तुम्हाला आपुलकीच्या व्यक्तींनी सांगितली तर ती तुम्हाला पटत नाही, पण तीच गोष्ट बाहेरच्या माणसांनी सांगितली तर ती लगेच मान्य करता. व्यवसाय-उद्योगात थोडीशी फुरसत मिळाल्यामुळे सध्याच्या कार्यपद्धतीत थोडेफार बदल करण्याचे विचार तुमच्या मनात येतील. नोकरीमध्ये भरपूर काम करण्याची तुमची तयारी असेल, पण वरिष्ठ मात्र वेगवेगळी कामे सांगून तुमचा गोंधळ उडवतील. घरामध्ये तुमच्या-कडून बऱ्याच अपेक्षा असतील, पण तुम्ही मात्र नतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल.

मकर ज्या वेळेला तुम्ही स्वस्थ आणि शांतपणे बसलेले दिसता त्या वेळी तुमच्या मनात खळबळ चालू असते. व्यापार-उद्योगात काही महत्त्वाकांक्षी कल्पना अमलात आणाव्याशा वाटतील. त्याकरिता कदाचित सध्याची कार्यपद्धती बदलावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ संस्थेची आणि त्यांची व्यक्तिगत गरज या दोन कारणांकरिता तुमच्या कामाच्या पद्धतीत अचानक फेरफार करतील, जे तुम्हाला आवडणार नाहीत. घरामध्ये किरकोळ कारणावरून तुमचा रागाचा पारा वर जाईल. जुने आजाराकडे लक्ष ठेवा.

कुंभ बरेच प्रयत्न करूनही ज्या कामाला काही गती येत नव्हती त्यातील यशाविषयी असलेली साशंकता आता दूर होईल. व्यापार-उद्योगात एखाद्या नवीन कामाविषयी तुम्हाला बरेच आकर्षण वाटेल. परंतु नंतर दुरून डोंगर साजरे असा प्रकार असल्यासारखे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी सरळ असलेल्या कामात तुम्ही वेगळी पद्धत अवलंबल्यामुळे त्यात विनाकारण गुंता निर्माण होईल आणि तुम्हाला तो निस्तरावा लागेल. घरामध्ये इतरांशी काही तात्त्विक प्रश्नावरून मतभेद होतील. तुम्ही हा प्रश्न उगीचच ताणाल.

मीन आपण एखादा बेत ठरवितो, पण आयत्या वेळेला जी परिस्थिती निर्माण होते त्या वेळेला आपल्याला बेत बदलणे भाग पडते. व्यापार-उद्योगात बाजारातील चढ-उताराचा नीट विचार करा. स्पर्धकांच्या तयारीचा अंदाज घेऊन तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीत फेरफार करावेसे वाटतील. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील. त्यामुळे तुमची स्थिती या टेबलावरून त्या टेबलावर झाल्यास आश्चर्य नाही. घरामध्ये मोठय़ा व्यक्ती त्यांचे विचार तुमच्यावर लादतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com