01vijay1मेष नवीन आणि जुन्या पद्धतीचा योग्य समन्वय साधून तुम्हाला तुमची कामे करून घ्यावी लागतील. शनीने गेल्या दोन वर्षांत तुम्हाला बऱ्याच अडथळ्यातून चक्रावून टाकले. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी झाला.  व्यवसायातील अवघड प्रश्नावर तोडगा निघेल. नोकरीतले गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लागतील. व्यक्तिगत जीवनात दिलासा देणाऱ्या घटना नजरेच्या टप्प्यात येतील. या आठवडय़ाच्या सुरुवातीला अडथळे असतील.

वृषभ ग्रहमान तुम्हाला स्वयंभू बनवणारे आहे. व्यापार-उद्योगात जादा पसे देणारी एखादी मोहमयी संधी निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी जास्त काम करून घेण्याकरिता वरिष्ठ एखादे आमिष दाखवतील. घरामध्ये नवीन व्यक्तीच्या सहवासामुळे किंवा आगमनामुळे चांगला बदल होईल. तुम्हाला अपेक्षित आणि अनपेक्षित अशा दोन्ही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याचा विचार करा. व्यापारउद्योगात अतिपशाचा मोह आवरा. प्रकृतीची काळजी घ्या.

मिथुन शनीने गेल्या दोन वर्षांत तुमच्यामागे अनेक चिंता लावल्या. त्याचे नेमके स्वरूप कसे असणार आहे याची आता कल्पना आल्यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने नियोजन करणे सोपे जाईल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात स्पर्धा आणि बाजारातील चढ-उतार याचा विचार करून तुम्हाला तुमची सध्याची कार्यपद्धती बदलावी लागेल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांनी एखादे आश्वासन दिले असेल तर त्याची आता पूर्तता होण्याची शक्यता आहे.  सांसारिक जीवनातील एखाद्या तणावातून तुम्ही बाहेर पडाल.

कर्क एखाद्या अवघड प्रश्नावर तुम्ही युक्तीने तोडगा शोधून काढाल. सोप्या प्रश्नांमध्ये मात्र तुम्हाला कोडय़ात पडल्यासारखे होईल. शनी राशीबदल करून षष्ठस्थानात प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील अडीच वष्रे राहील. या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. तरीही गुरूचे भ्रमण तुम्हाला अनुकूल असणार आहे. व्यापार, उद्योग आणि नोकरी या तिन्ही क्षेत्रांत स्पर्धा तीव्र होईल. जुने आजार असतील तर त्याच्या पथ्यपाण्यावर दुर्लक्ष करू नका.

सिंह ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची तुमची इच्छा असते. पण या आठवडय़ात तुम्हाला एकटय़ाने काम करावे लागेल. शनीने गेल्या दोन ते अडीच वर्षांत तुमच्या घरगुती जीवनात व करिअरमध्ये अनेक अडचणी आणल्या होत्या. व्यापार-उद्योगात आठवडय़ाचा मध्य तुमच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. नोकरीमध्ये गुंतागुंतीचा प्रश्न तुम्ही हिकमतीने सोडवून दाखवाल.

कन्या शनी राशीबदल करून चतुर्थस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील अडीच वष्रे असेल. हा शनी तुमची नतिक जबाबदारी वाढविणारा आहे. घरातल्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. त्याचा करिअर आणि प्रकृतीवरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. पण यादरम्यान गुरूचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे तुमचे मनोधर्य चांगले राहील. या आठवडय़ात व्यापार-उद्योगात एखादा नवीन विचार तुम्हाला प्रभावित करेल. नोकरीमध्ये कामाचा तणाव कमी असल्यामुळे तुम्ही चांगले काम करू शकाल.

तूळ ग्रहमान म्हणजे तुमच्या दृष्टीने खट्टा-मीठा आहे. व्यापारउद्योगाच्या क्षेत्रात एखादा अवघड प्रश्न तुम्ही तुमच्या अक्कलहुशारीने सोडवून दाखवाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या शब्दाला मान देतील. साडेसातीतून जवळजवळ तुमची मुक्तता झाली असे समजायला हरकत नाही. व्यापार, नोकरीमध्ये मनाप्रमाणे घटना घडू लागतील. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची अडचण समजून घेतील. घरामधल्या अवघड प्रश्नावर तोडगा निघेल. तुमचे मन हलके होईल.

वृश्चिक तुमच्या सभोवतालचे वर्तुळ काही कारणाने बदलायची शक्यता आहे. त्याविषयी तुमच्या मनात अनेक शंकाकुशंका असतील. शनीसारखा कर्मठ ग्रह राशीबदल करून धनस्थानात येणार आहे. या शनीने गेल्या दोन वर्षांत तुम्ही ठरवलेले सर्व बेत उधळून लावले. आता हळूहळू परिस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता दिसू लागेल. व्यापार-उद्योगात पूर्वीचे ऋणानुबंध पुन्हा एकदा जोडले जातील. नोकरीमध्ये तणाव कमी करणाऱ्या घटना घडतील. कौटुंबिक जीवनात अडथळे कमी होतील.

धनू ग्रहमान एका वेगळ्या वैचारिक वळणावर तुम्हाला नेऊन ठेवेल. शनीसारखा कठोर ग्रह राशीबदल करून तुमच्याच राशीत प्रवेश करणार आहे. साडेसातीचा हा मध्यभाग सुरू झालेला आहे. त्याला घाबरून न जाता ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असा पवित्रा ठेवा. शनीचे भ्रमण  साधारण दोन वष्रे राहील. यादरम्यान नोकरी आणि व्यवसायात जास्त मोठा धोका पत्करू नका. घरामध्ये भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या.

मकर ग्रहमान संमिश्र आहे. तुमची रास स्वयंभू आहे. कोणत्याही कामाकरिता तुम्ही इतरांवर अवलंबून राहत नाही. पण या आठवडय़ामध्ये स्वत:चा मतलब साध्य करण्याकरिता जिभेवर साखर पेरावी लागेल. साडेसातीची ही सुरुवात आहे. त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही. कारण तुम्हाला गुरूचे भ्रमण अनुकूल आहे. मात्र नोकरी, व्यापार-उद्योग या क्षेत्रांत भलतेच धाडस करू नका. पशाचा आणि अधिकाराचा वापर योग्य कारणाकरिता करा. घरामध्ये भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व असते याची आठवण ठेवून सर्व निर्णय घ्या.

कुंभ ग्रहमान तुमच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. व्यापारउद्योगात जे काम पूर्ण करून पसे मिळत नव्हते ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने वेगळ्या वातावरणात काम करावे लागेल. घराकरिता तुम्ही फारसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे इतरांची चिडचिड होईल. शनी राशीबदल करून लाभस्थानात अडीच वष्रे राहील. यादरम्यान नोकरी, व्यापार आणि उद्योग यामध्ये खूप काम करण्याची इच्छा निर्माण होईल.

मीन जवळजवळ दोन वर्षांच्या कालावधीनंतर शनी राशीबदल करून दशमस्थानात येणार आहे. तेथे तो आता अडीच वष्रे राहील. शनीचे हे भ्रमण तुमच्यातील महत्त्वाकांक्षा जागृत करणार आहे. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रांत काही तरी भव्य-दिव्य करण्याचा बेत आखाल. नोकरीमध्ये हातातोंडाशी आलेल्या पण हुकलेल्या संधी पुन्हा एकदा नजरेच्या टप्प्यात येतील. घरामध्ये लांबलेले शुभकार्य निश्चित होण्याची चिन्हे दिसतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com