४४-वर्धापनदिन विशेष अंक

01vijayमेष या आठवडय़ामध्ये एखादी स्वप्नमयी कल्पना तुम्हाला आकर्षति करेल. पण नंतर ती व्यवहार्य नाही या निष्कर्षांला याल. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. ज्या पद्धतीने तुम्हाला यश मिळते तीच अमलात आणा. नोकरीच्या ठिकाणी चित्त विचलित होऊ देऊ नका. नवीन कामात घाईघाईने लक्ष घालू नका. घरात फटकून वागाल. नंतर तुम्हालाच वाईट वाटेल. अनपेक्षित खर्चाकरिता हातात पसे ठेवा.

वृषभ एका विशिष्ट पद्धतीने काम करणे तुम्हाला आवडेल. व्यापार-उद्योगात बाहेरून दिसायला काम भरपूर असेल. परंतु त्यातून उत्पन्न म्हणावे तसे नसेल. त्यामुळे तुम्ही थोडेसे नाराज असाल. एखादा चाकोरीबाहेरचा मार्ग अवलंबण्याचा विचार तुमच्या मनात येईल. नोकरीच्या ठिकाणी ‘मानलं तर समाधान’ आशी तुमची स्थिती असेल. वरिष्ठ आणि सहकारी यांचा कल बघून तुम्हाला कामाची पद्धत ठरवायला लागेल. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधता बांधता तुमचे स्वतकडे दुर्लक्ष होईल.  मुलांचे उपद्व्याप जाणवतील.

मिथुन व्यवसाय-उद्योगात ज्या कामाकरिता तुम्ही बरेच दिवस प्रयत्न करत होतात ते काम नजरेच्या टप्प्यात येईल. उत्साह वाढेल. कारखानदारांना परदेशातील तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी नवीन करार करावेसे वाटतील. नोकरीच्या ठिकाणी जादा अधिकाराकरिता किंवा बढतीकरिता तुमची निवड होईल. मात्र तुमच्या वागण्याबोलण्यात अहंकार येऊ देऊ नका. सांसारिक जीवनातील एखादा सुखद क्षण अनुभवाल. तुमचे मूड इतरांनी सांभाळल्यामुळे तुम्ही खूश असाल.

कर्क व्यापार-उद्योगातील कामकाज चांगले होण्यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत थोडेसे फेरफार करा. स्पर्धकांना चकवा देण्यासाठी वेगळी युक्ती किंवा मार्ग शोधून काढाल. जोडधंदा आहे त्यांना नवीन पद्धतीचे काम करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी जास्त अधिकार दिल्यामुळे तुमची कॉलर ताठ असेल. काहीजणांना परदेशी जाता येईल. एखाद्या समारंभाच्या निमित्ताने लांबच्या मित्रांशी गाठभेट होईल. त्यांच्याबरोबर छान कार्यक्रम ठरवाल.

सिंह व्यापार-उद्योगात अगदी हातातोंडाशी आलेली पशाची कामे लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयत्या वेळी धावपळ होईल. पर्यायी व्यवस्था करून ठेवणे चांगले. नोकरीच्या ठिकाणी चालू असलेले काम बरेच धावपळीचे असेल. त्यातच वरिष्ठ एखादे नवीन काम सांगतील. त्याचा मनस्ताप होईल. घरामध्ये नको असलेल्या व्यक्तीची हजेरी लागेल. कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा हवामानामुळे प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे.

कन्या कधी कधी वाकडी वाट करून आपले उद्दिष्ट गाठावे लागते. व्यापार-उद्योगात पसे मिळूनही तुमचे समाधान होणार नाही. तुमची गरज वाढल्यामुळे संपूर्ण आठवडा थोडासा तणावात जाईल. पण आपली शारीरिक क्षमता ओलांडू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुम्ही एखादे आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करणे अवघड  होईल. त्यासाठी जादा काम करावे लागेल. घरामध्ये तुमचा एखादा सल्ला इतरांना पटणार नाही. त्याकरिता जास्त आग्रह धरू नका. खर्च बजेटबाहेर जाण्याची शक्यता आहे.

तूळ कमी झालेली कामातील गती वाढविण्यासाठी युक्तीचा वापर कराल. व्यापार-उद्योगातील अवघड काम पूर्ण करण्याकरिता मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. अनपेक्षित पसे लागल्याने पर्यायी व्यवस्था करावी लागेल. अनोळखी व्यक्तीवर एकदम विश्वास ठेवू नका. नोकरीच्या ठिकाणी ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हा कानमंत्र उपयोगी पडेल. पूर्ण झालेले काम पुन्हा तपासून पाहा. घरामध्ये एखाद्या प्रश्नावर राग उफाळून येईल. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा.

वृश्चिक परंपरा वगरेबाबत तुम्हाला गरज नसते त्या वेळी त्याचा विचारही करत नाही. या आठवडय़ात स्पर्धकांना नामोहरम करण्यासाठी एखाद्या नवीन युक्तीचा अचानक वापर कराल. अनपेक्षित मार्गाने थोडे पसे हाती पडतील. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांनी कमी लेखलेले चालणार नाही. ते चांगले काम करून वरिष्ठांचे मत बदलण्याचा प्रयत्न करतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी प्रत्यक्ष विरोध न करता वेगळा डावपेच लढवाल. लांबलेले कार्यक्रम निश्चित झाल्याने सर्वाना बरे वाटेल.

धनू व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता एखादे वेगळे तंत्रज्ञान आत्मसात कराल. त्यांना ते आवडेल. तातडीच्या कामाकरिता नोकरदार मंडळींना छोटा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. कामामधला वेग वाढविण्याकरिता एखादी नवीन युक्ती ते शोधून काढतील. घरामध्ये कोणाला काय वाटते याचा तुम्ही फारसा विचार करणार नाही. एकंदरीत ‘माझे तेच खरे’ असा प्रकार असेल.

मकर माणसे हाताळण्याचे तुमच्यात उत्तम कौशल्य आहे. या आठवडय़ात शक्ती आणि युक्तीचा उत्तम वापर करून तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करू शकाल. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी रात्रंदिवस काम कराल. शॉर्टकट न घेता नेहमीच्या पद्धतीने काम केले तर त्याचा उपयोग होईल. नोकरीमध्ये एखाद्या अवघड कामाकरिता तुमची निवड होईल. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल, पण कष्ट वाढतील. घराकरिता तुम्ही फारसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे इतरांची चिडचिड होईल.

कुंभ एकाच वेळी अनेक कामे हाताळावी लागतील. नेहमीच्या पद्धतीने काम केले तर काम जास्त चांगले होईल. व्यापार-उद्योगात सगळी कामे एकटय़ाने हाताळू नका. योग्य व्यक्तींची योग्य कारणाकरिता निवड करा. पशाच्या कामाला प्राधान्य द्या. नोकरीमध्ये नेहमीच्या कामाव्यतिरिक्त एखादे वेगळे कामही करावे लागेल. त्यामुळे चिडचिड होईल. मन शांत ठेवा म्हणजे चुका होणार नाहीत. घरामध्ये एखादा जुना प्रश्न डोके वर काढेल. त्यातून काहीही निष्कर्ष निघणार नाही.

मीन परंपरा पाळणे तुम्हाला आवडते. या आठवडय़ात मात्र तुम्ही रूढी सोडून वागाल. व्यापार-उद्योगात आíथक बाजू मनाप्रमाणे राहील. त्यात अधिक सुधारणा करण्याकरिता एखादा वेगळा मार्ग स्वीकाराल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या विशेष सवलतीकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये सर्वाना आपुलकीने मदत कराल. त्यांनी तुमच्या शब्दाला मान द्यावा अशी तुमची अपेक्षा असेल. पूर्वी ठरलेला एखादा कार्यक्रम लांबवावा लागेल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com