शिक्षकभरतीवर बंदी असतानाही सात हजार शिक्षकांची बेकायदेशीर भरती करण्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी राज्यभर गाजले. या भरतीप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी शालेय शिक्षण विभागाने बघ्याची भूमिका घेतली. विभागाच्या या आंधळ्या कारभाराबरोबरच शिक्षण व्यवस्थेला लागलेल्या किडीवर भाष्य करणाऱ्या ६ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘गुरूजी तुम्हीसुद्धा..?’ या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘गुरूजी तुम्हीसुद्धा..?’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

लक्षात ठेवावे असे..

  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
  • ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’ blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.