विद्यापीठांची प्रतवारी तेथील परीक्षांच्या विश्वासार्हतेऐवजी बाहेरील देशांमध्ये किती विद्यापीठांशी करार केले आहेत, यावर ठरू लागली आहे. हे चिंताजनकच आहे. परीक्षा घेणे हे विद्यपीठांचे महत्त्वाचे काम आहे. त्यामध्ये हेळसांड म्हणजे गुणवत्तेशीच प्रतारणा केल्या सारखेच. पण ती करून विद्यपीठे नको नको त्या उद्योगांत लक्ष घालू लागली आहेत. त्यानिमित्ताने कुलगुरुंचे परदेश दौरे वाढण्याव्यतिरिक्त काय होते, हाही प्रश्नच आहे. तेव्हा नावात विद्यसागर असलेल्या कुलपती राव यांनी विद्यपीठांच्या कारभारात अधिक लक्ष घालावे आणि आपल्या नावास जागावे. विद्यसागराच्या नाकाखालीच अशी अविद्य वाढणे बरे नाही, असे मत मांडणारा गुरुवारी प्रसिद्ध झालेला ‘विद्यासागरातील अविद्या’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.  हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenc या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘विद्यासागरातील अविद्या’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे.  स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.