पुण्यात चार कुत्र्यांना जमावाने जिवंत जाळले आणि सोळा कुत्र्यांना अन्नातून विष घालून ठार मारले. माणसाने समोर ठेवलेले अन्न विश्वासाने त्या कुत्र्यांनी घशाखाली घातले असेल, तेव्हा ज्यांच्या सावलीत आपण जगतो आहोत त्यांच्याकडून आपले अस्तित्व असे पुसले जाईल असा विचारदेखील त्या मुक्या जनावरांना शिवला नसेल. जिवंतपणी अंगावर ज्वाळा झेलत मरणाला कवटाळणाऱ्या त्या चार कुत्र्यांना अखेरचा श्वास सोडताना माणसाविषयी काय वाटले असेल या विचाराने अस्वस्थ होण्याची आपली संवेदनशीलता संपलीच असेल, तर या भूतलावर जगण्याचा हक्क माणसाखेरीज कुणालाच उरणार नाही, हेच खरे मानावयास हवे. जगण्याच्या हक्काचे कागदावरचे कायदे कायमचे पुसून टाकण्याची हीच वेळ आहे, यात शंका नाही! असे मत ‘लिमिटेड माणुसकी’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यर्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.