‘लिमिटेड’ माणुसकी!

तज्ज्ञांना काय वाटते?

एकही प्रतिक्रिया नाही

विद्यार्थ्यांना काय वाटते?

JAPKAR KUMAR

JAPKAR KUMAR ARJUN

& ip;.. तर भुतलावर प्राणीच शिल्लक राहणार नाहीत! आपली भारतीय संस्कृती ही जगातील अन्य संस्कृतींप्रमाणेच श्रेष्ठ किंबहुना काही बाबतीत ती त्यांपेक्षाही अधिकच श्रेष्ठ ठरते. कारण भारतीय संस्कृतीत मनुष्य, सर्व प्राणिमात्र, झाडे-झुडपे, पशुपक्षी या सर्वांनाच सामान लेखले गेले आहे. आज भारतीय घटनेत ‘माणसा-माणसांतील समानता’ नमुद असली तरी आपल्या संस्कृतीने ‘कुणा एका प्रजातीची नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीस समानता बहाल केली आहे. हे कोठे नमुद नसले तरी आजच्या घटनेच्या काही संकेतांप्रमाणेच ते आहे. या संकेतांप्रमाणेच मनुष्य प्राणी व इतर प्राणिमात्र प्राचीन काळापासून साथ संगतीने जगत आले आहेत. या संपूर्ण सजीव सृष्टीत निसर्गाने मानवालाच इतरांपेक्षा विचारी, बुद्धिमान असा मेंदू बहाल केला आहे कारण त्याने सर्व प्राणी मात्रांचे संरक्षण करावे ही अपेक्षा त्यामागे असणार! आपल्या संत महात्म्यांनीही मानवाला ‘सर्व प्राणी मात्रांवर दया दाखवण्याची शिकवण’ दिली आहे. तसेच ‘तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या’ ही त्यांचीच शिकवण. परंतु आजकाल घडणाऱ्या काही घटना पाहता ही शिकवण खरेच भारतातील संत महात्म्यांनी दिली आहे का ? हा प्रश्न पडावा. कारण पुण्यासारख्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक दृष्ट्याही पुढारलेल्या शहरात. याच पुण्यातील विचारी जणांच्या कृतीतून २० कुत्र्यांचा बळी जावा आणि त्यातही काहींना जिवंतपणे जाळण्यात यावे. यापेक्षा हीन दुसरे काय असू शकते? तसेच भूतदयेवर मनुष्य प्राण्याचे यापेक्षा जास्त अतिक्रमण काय असू शकते? ही कृती कुणीही करो पण ती करणारा शेवटी दोन पायांचा, सर्वप्राणिमात्रांत बुद्धिमान, हुशार मनुष्य प्राणीच ना! गेल्या काही दशकातील लोकसंख्येच्या भरमसाठ वाढीमुळे लोकांनीच आपल्या वसाहती स्थापनेसाठी या प्राणिमात्रांच्या अधिवासावर अतिक्रमण केले. त्यामुळे ‘सर्व प्राणीमात्रांना बरोबर घेउन जगण्याच्या आपल्या संस्कृतीत’ मनुष्य व प्राण्यांमध्ये संघर्ष होणे तसे अटळच. वाघ किंवा बिबट्या यांचा मनुष्य वस्तीत वाढत चाललेला वावरही त्याचेच द्योतक. या वाघांसारख्या प्राण्यांची गोष्ट निराळी, कारण वाघ हा राष्ट्रीय प्राणी. आता राष्ट्रीय असलातरी पूर्वी त्यास मारण्यात पुरुषार्थ समाजाला जाई. त्यामुळे त्या विरोधात कडक कायदे-कानून तयार झाले. परंतु दुसऱ्या प्राण्यांचे काय? घटनेत यांचे संरक्षण, संवर्धन करण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वांत (कलम- ४८A) व मूलभूत कर्तव्यात (कलम- ५१A) काही संक्षिप्त तरतुदी आहेत, संसदेनेही त्यांच्या संरक्षणासाठी काही कायदे तयार केलेले आहेत. परंतु ते किती पोकळ आहेत, हे सध्याच्या ‘कुत्र्यांच्या हत्याकांडातूनच’ दिसून येत आहे. एकीकडे नरभक्षी म्हणून एका वाघिणीला मृत्युदंड दिला जातो (टी२७ या वाघिणीला वन विभागाने मृत्युदंड दिला आहे) तसेच त्याचे (मानवी) न्यायालयाकडूनही स्वागतच केले जाते. आणि दुसरीकडे ‘एक नाही दोन नाही तब्बल २० कुत्र्यांची हत्त्या केली जाते. मग हे प्राणी न्याय मागणार कुणाकडे? त्यांना वाली कोण? हे त्यांच्या समोरील न सुटणारे प्रश्नच! (सभ्य) माणसांनी दिलेले ते अन्न खाताना त्या मुक्या प्राण्यांनी अन्नदात्याचे किती आभार मानले असतील? परंतु या अन्नात विष कालवलेले असून त्यामुळे आपले अस्तित्वच पुसले जाऊ शकेन, याचा विचारही त्यांनी केला नसणार. तसेच जिवंतपणी अंगावर ज्वाला झेलणाऱ्या त्या जीवाची आर्त हाक कुणाच्याच हृदयाला पिघळु शकली नाही? की सभ्यतेच्या नावाखाली ‘या विचारी (सभ्य) जनांनी ’संवेदनशीलतेचा, माणुसकीचा, भूतदयेचा खरेच त्याग केला आहे ? हे मात्र कळण्यास मार्ग नाही. आता या सगळ्यात आपल्या पोलीस तसेच न्याय यंत्रणेची भूमिका काय ? ही घटना घडल्यानंतर सर्वच बाजूंनी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देषदिले गेले. परंतु मानवी समाजातीलच ‘आरुषी नामक एका कोवळ्या जिवाच्या हत्येस जबाबदार असलेल्यांना पकडण्यात आपली पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा अपयशी ठरल्याचे’ ताजे, ज्वलंत उदाहरण समोर असताना, ‘मनुष्यापेक्षा शुल्लक, हीन मानले गेलेल्या’ या मूक जीवांच्या हत्येच्या घटनेचे काय होणार हे सर्वश्रुतच! एकीकडे गोरक्षकांच्या पुण्याईतून देशात गोमातांना चांगले दिवस आलेले असताना, दुसरीकडे याच संस्कृतीतील कुत्र्यांसारख्या प्राण्यांवर ही वेळ यावी. हे घृणास्पदच. एरवीही गाडीखाली येऊन किंवा तत्सम कारणांनी त्यांचे जीव जातच होते. त्यांची वाढलेली संख्या नियंत्रणात ठेवणे निश्चितच आवश्यक, त्याकरता इतर नसबंदी सारखे मार्ग आहेतही. परंतु त्यासाठी रॉकेल ओतून जिवंतपणी पेटवून देण्याची वृत्ती माणुसकीच्या कुठल्या कक्षेत बसते, हे भूतदया हरवल्याचे लक्षण नव्हे तर दुसरे काय? संवेदनशीलता खरेतर मनुष्य जिवंत असल्याचे लक्षण, परंतु ती आज इतकी रसातळाला का जावी ? या ‘सभ्य शहरी संस्कृतीने’ खेडूत म्हणून उपमा दिलेल्या ग्रामीण भागात ती बऱ्यापैकी शिल्लक आहे. परंतु याचा शहरी भागातील ‘सभ्य’ लोकांकडे लवलेशही नसावा? ग्रामीण भागात बऱ्यापैकी ‘भूतदया असणारे संवेदनशील मेंदू’ शिल्लक आहेत. परंतु शहरांचे काय? या सभ्यतेच्या नावाखाली दुसऱ्या कुणालाच जगण्याचा अधिकार नाही? स्वतःच्या प्रजातीच्याच घटकाला ते गाडीखाली चिरडण्यास मागेपुढे पाहत नाही, तर दुसऱ्या शुल्लकांची काय मजाल? अशाच प्रकारच्या ‘ज्वराची’ लागण जर सभ्य, हुशार आणि विचारी जणांच्या मेंदूला होत असेल तर आजच्या ग्लोबल युगात त्याचे सार्वत्रिकीकरण होण्यास कितीसा वेळ लागणार! या ज्वरावर जर योग्यवेळी उपचार झाला नाही तर या पृथ्वीतलावरून एकही प्राणी शिल्लक राहणार नाही हेही तितकेच खरे! अधिक वाचा

(1) (0)
Dadasaheb Vhalgule

Dadasaheb Vhalgule

फ्रेंच राज्यक्रांतीचा उदगाता रुसो म्हणाला होता की प्राचीन,नवाश्मयुगीन मानवाचं जिवन हे आत्ताच्या जिवनापेक्षा कैकपटींनी चांगलं होतं कारण त्या काळातील मानवाला शेतीचा शोध लागला होता, एकमेकांमध्ये सहकारपुर्ण संबंध होते, प्रत्येकाला एकमेकांवर अवलंबुन रहावं लागत होतं, समुहासमुहात प्रेमभाव होता, जिवन प्रामाणिक होतं, सुसह्य होतं पण तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्यामधुन नेतृत्व उदयास आले, हळुहळु परिस्थिती असंवेदनशीलतेला अनुकुल होत गेली, स्पर्धा वाढीस लागली, प्रत्येकजण आपापला स्वार्थ बघु लागला, मानवानेच तयार केलेले काल्पनिक नातेसंबंध तो पायदळी तुडवु लागला, भावनिक आणि भोळ्या विचासरणीची जागा संकुचित विचारांनी घेतली, मध्ययुगात तर युरोपियन प्रबोधनाचं थोडं कार्यक्षेत्र वगळता या विचारांनी कळसच गाठला, मध्यपुर्वेत तर अशी काही संस्कृती उदयास आली की तेथे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक अशांततेचे अराजकच माजले, प्रत्येकजण आपल्या हितसंबंधाच्या अधीन राहुन वागु लागला आणि आधुनिक युगाने यात आणखी भरच टाकली. रुसोचे हे विधान जगातील सद्यःपरिस्थितीशी तुलना करता एका अर्थाने अगदी योग्य वाटते. बदल हा काळानुसार होतच राहतो. त्याला आजुबाजूची परिस्थिती जेवढी कारणीभूत असते तेवढीच स्ववैचारिकताही कारणीभूत असते. त्यामुळे जसा माणुस प्रगतशील होत आहे तसं त्याचं इतरांवरचं अवलंबित्वसुद्धा हळुहळु लोप पावत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर तर मानवाने इतकी प्रगती साध्य केली की तो वैश्विकतेचे भानच हरपुन गेला. आपलं या जगात स्थान काय या वास्तवरुपी काल्पनिकतेचा विचारही त्याच्या मनाला स्पर्श करेनासा झाला. तो आधुनिक प्रोपगंडाच्या काळात स्वची ओळखसुद्धा विसरला. विचारसरणीही हळुहळु उदासीन होत गेली. स्पर्धेच्या मृगजळमय विळख्यात तो पृथ्वीवरच्या पर्यावरणाच्या नाशासही कारणीभूत ठरला. हे सर्व इतकं होत आहे आणि कधीतरी याचा अतिरेक होईल याचंसुद्धा सोयरसुतकही त्याला नाही. माणसाचे माणुसकीवर्तन हे त्याच्या विचारातुन जन्म घेत असते. आजच्या संकुचित विचारांचा परिपाक हीच मानवाच्या माणुसकीच्या अतिरेकाचे सर्वात गंभीर आणि दखल घेण्याजोगे लक्षण आहे. अशा संकुचित विचारांचा आणि अश्लाघ्य वर्तनाचा अनुभव समाजात सर्रास येतच असतो. पुण्यातील जमावाने क्षुल्लक त्रासापायी भटक्या कुत्र्यांना जिवंत जाळण्याच्या आणि अन्नातुन विष घालुन मारल्याच्या या घटनेकडे असेच पहावे लागेल. भटकी कुत्री त्रासदायक असतात मात्र त्यांना मारुन टाकणे हे आजच्या समाजव्यवस्थेतील सहिष्णुता संपुष्टात येण्याचे निदर्शक अधिक त्रासदायक आहे. कारण यावरुन आपल्याला मानवाच्या समाजातील पुढच्या आवृत्तीची आणि परिस्थितीची जाणीव होते. केवळ पर्यावरणाचा, वसुंधरा रक्षणाचा, प्राणीमात्रांच्या संरक्षणाचा आणि पर्यायाने या पृथ्वीवरील जैवविविधतेच्या जाणीवेचा डांगोरा पिटुन काहीही होणार नाही त्यासाठी कृतीतत्परता महत्वाची असते. हे अफ्रीकेच्या जंगलामधील गोरिला संवर्धनासाठी जीव ओतुन कार्य करणार्या डियान फॉसी या महिला व्यक्तीने दाखवुन दिले आहे. प्रासंगिकतेच्या वेळी या व्यक्तीने स्वतः चा जीवही धोक्यात घातला पण हाती घेतलेले कार्य मात्र सोडले नाही. जगाच्या पाठीवर अजुनही अशी सहानुभूतिपूर्वक कृतीशील विचारसरणी अजुनही जिवंत आहे. पण काळाच्या ओघात ती नष्ट होईल हीसुद्धा एक भिती आहे. अशी विचारसरणी नष्ट होणे हे आपल्याला मानवशुन्यातेकडे नेणारे आहे. नुकताच अमेरिकेने पेरिस करारातुन घेतलेली माघार आणि अम्नेस्टी इंटरनेशनल या संस्थेचा अहवालही मानवतावादी दृष्टीने अस्वस्थ करणारा आहे. जग बदलते आहे आणि जगासोबत स्पर्धाही वाढत आहे पण कुठेतरी माणुसकी म्हणुन आपण या गोष्टींना थोपवणे हे गरजेचे असुन अनिवार्य आहे. अधिक वाचा

(1) (1)