मुंबई, ठाण्यासह दहा महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदान झाले. यापैकी सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC Election 2017) निवडणूकीत यंदा आजवरचे विक्रमी मतदानाची नोंद झाली. अंतिम आकडेवारीनुसार मुंबईत ५२.१७ टक्क्यांच्या मतदानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी ठरली आहे. याआधीच्या निवडणुकीत एकूण ४४.७५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गुरूवारी २३ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

वाचा: निकालाची घटिका समीप; मुंबईकर ‘औकात’ दाखवणार!

percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
Awaiting declaration for Lok Sabha election of three candidates from Ratnagiri Satara Thane Mumbai
महायुतीमधील पेच कायमच; रत्नागिरी, सातारा, ठाणे, मुंबईतील तीन उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा
navi mumbai, cctv camera, navi mumbai cctv camera
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच
mumbai, bmc, deficit 2100 crore, three days, left, tax collection, financial year end,
मालमत्ता करवसुलीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे केवळ तीन दिवस शिल्लक, करवसुलीत २१०० कोटींची तूट

मुंबईतील २ हजार २७५ उमेदवरांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मुंबईच्या महासंग्रामात शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरली आहे. दुपारी साडेतीनच्या आकडेवारीनुसार मुंबईत ४१.३२ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे अंतिम आकडेवारी मागील निवडणुकीच्या आकडेवारीपेक्षा चांगली असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि तो अगदी योग्य ठरला. यंदाची निवडणूक शिवसेना आणि मनसे या स्थानिक पक्षांसाठी अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे. तर आक्रमक प्रचार आणि सुनियोजित रणनीती यांच्या जोरावर भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाचा: मुंबईचे ११ लाख घटलेले मतदार कुणाच्या पथ्यावर?

राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भारतीय जनता पक्ष (BJP) व शिवसेना (Shivsena) यांच्यातील तुटलेली युती, प्रचारादरम्यान या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर केलेली अतिशय तिखट टीका, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही ठिकाणी झालेली आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढे केलेला विकासाचा मुद्दा अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज शहरात मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय समीकरणे बदलली असून गेली २५ वर्षे एकमेकांच्या हातात हात घालून निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने परस्परांशी काडीमोड घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आणखी रंगत आली. गेली २० वर्षे फडकणारा महानगरपालिकेवरील शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकणार की, भाजपचे कमळ फुलणार याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदार राजा आज कोणाच्या पारड्यात वजन टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या पाच वर्षात मुंबईची लोकसंख्या साडेचार लाखाने वाढली असली तरी सुमारे ११ लाख मतदारांची संख्या घटली आहे. त्यामुळे हे घटलेले मतदार कोणाच्या पथ्यावर पडतात याकडे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी दोन हजार २७५ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई महानगरपालिकेतील आजपर्यंतच्या मतदानाचा इतिहास पाहता मतदानाची टक्केवारी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही. गेल्या तीन वर्षातील मतदानाची सरासरी ४४ टक्के एवढीच राहिली आहे. सन २००२च्या निवडणुकीत ४३ टक्के, सन २००७ मध्ये ४६ टक्के, सन २०१२ मध्ये ४५ टक्के अशी मतदानाची टक्केवारी होती. कमी मतदान शिवसेसाठी फायदेशीर ठरते, असा आजवरचा अनुभव आहे.

Live Updates:

५.३० : मतदानाची वेळ संपली, तरीही मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा. मतदान केंद्राच्या आत असलेल्या सर्वांना मतदान करता येणार. फक्त मतदानासाठी नव्याने रांग लावता येणार नाही.

५.१० : चेंबूरमध्ये पी.एल.लोखंडे मार्गावरील मतदान केंद्रावर मतदानासाठी प्रचंड गर्दी. चार तास झाले तरी मतदार केंद्राबाहेर उभेच. मतदान यंत्राच्या तुटवडामुळे मतदारांचे झालेत हाल.

४.४० : मुंबईत अभिनेता शाहरुख खानने बजावला मतदानाचा हक्क

४.३५ : मुंबईत साडेतीन वाजेपर्यंत ४१.३२ टक्के मतदान

४.३० : मतदानासाठी शेवटचा एक तास, नागपाड्यात अजूनही लांबच रांगा

mumbai_voting

 

३.५२ : २०१४ साली निडवणूक आयोगाकडून बोगस मतदान रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या सर्वेतून रितसर ११ लाख नावं कमी करण्यात आली होती.  

३.५०: मतदार यादीत ११ लाख नावं गायब झाल्याची माहिती चुकीची- निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

३.४५: मतदार यादीत ११ लाख नावे गायब झाल्याचे वृत्त

मस्जिद बंदरमध्ये दुकाने आणि रहदारी बंद
मस्जिद बंदरमध्ये दुकाने आणि रहदारी बंद

 

 २३ टक्के मतदान. मुस्लिमबहुल मतदारांचा वॉर्ड; नावाचा घोळ कायम, कडक पोलीस बंदोबस्त
२३ टक्के मतदान. मुस्लिमबहुल मतदारांचा वॉर्ड; नावाचा घोळ कायम, कडक पोलीस बंदोबस्त

३.0५: मस्जिद बंदर येथील अतिसंवेदनशील असलेल्या वॉर्ड क्र. २२४ मध्ये उत्साह कमी
२.५५:
डोंगरीत मतदारांचा उत्साह; दुपारी अडीचपर्यंत एका बूथ वर ३९% तर दुसऱ्या बुथवर ५०% मतदान
२.४५:
मुंबईत दीड वाजेपर्यंत ३१.१० टक्के मतदानाची नोंद
२.३०:
मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे मतदान; मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज व्यक्त केला
२.१५
राज्यातील दहा महापालिकांसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत एकूण  सरासरी १७.०७ टक्के मतदान 
२.००:
दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावला


१.४५:
प्रतीक्षानगरमधील १७२ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये कर्मवीर भाऊराव शाळेतील मतदान केंद्रात मतदानासाठी मतदारांची मोठी गर्दी
१.३०:
वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ पूर्वमध्ये दुपारी १२.३० पर्यंत सरासरी १८ टक्के मतदान
१.२२:
सायन मध्ये मतदार चिठ्ठ्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे केंद्रावर शोधाशोध करावी लागत आहे.
१.२१:
दिंडोशीत मतदार यादीत गोंधळ; न्यू दिंडोशी म्हाडा इमारत क्रमांक २ व ३ मधील प्रभाग क्रमांक ४० मधील ८० मतदारांची नावे प्रभाग क्रमांक ४१ मध्ये टाकण्यात आली.
१.०१:
घाटकोपर: मतदारांच्या चार तास रांगा, मतदान पुन्हा घेण्याची मागणी
१.००:
घाटकोपरच्या वॉर्ड क्रमांक १२७ मधील सर्वोदय विद्यालयातील मतदार यादीत घोळ

मतदानानंतर राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसह काढला सेल्फी.
मतदानानंतर राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसह काढला सेल्फी.
परळमध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कुटुंबियांसहित भगवे वस्त्र परिधान करून मतदान
परळमध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कुटुंबियांसहित भगवे वस्त्र परिधान करून मतदान

१२.४५: मुंबईत सकाळी ११.३० पर्यंत १६.४० टक्के मतदान
१२.२५: 
दादरच्या शिवाजी पार्कमधील प्रतिष्ठेची लढाई असलेल्या वॉर्डमधील पॉप्युलर निकेतन इमारत मतदार यादीतून गायब; ३०मतदारांची नावे यादीत नाहीत

माहीम परिसरात मतदारांचा उत्साह
माहीम परिसरात मतदारांचा उत्साह

११.५०: माहीममध्ये ११.३०पर्यंत १९.६६% मराठी बहुल प्रभाग, सर्वाधिक मतदान


११.४५:
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वांद्रे येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानासाठी दाखल

धारावीत सव्वाअकरापर्यंत १०.५९ % मतदान
धारावीत सव्वाअकरापर्यंत १०.५९ % मतदान

 

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे मतदान.
भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे मतदान.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचे मुंबईत मतदान
अभिनेत्री श्रद्धा कपूर मतदानासाठी रांगेत उभी असताना.

११.१५: भाजप खासदार पुनम महाजन आणि राहुल महाजन यांनी वरळीत बजावला मतदानाचा हक्क
११.०५:
मुंबईत सकाळी ९.३० पर्यंत ८.०७ टक्के मतदान
११.००: मुंबईच्या २३ विभागांपैकी ७ भागातील मतदानाची आकडेवारी जाहीर
मालाड ८.५५ %
बोरीवली ९.९१%
गोरेगाव ८.६८ %
भांडूप ७.८८ %
घाटकोपर ४.६० %
वरळी  ८.०२ %
वांद्रे पूर्व ८.४३ %

धारावीत मतदारांचा चांगला प्रतिसाद
धारावीत मतदारांचा चांगला प्रतिसाद

१०.५५: चारकोपमध्ये निवडणूक आयोगाकडून वाटण्यात आलेल्या पावत्यांवर बुथ क्रमांक टाकण्यात न आल्यामुळे मतदारांचा गोंधळ
१०.५४:
निवडणुकीनंतर कोणीही कोणासोबत जाऊ शकतं – शिवसेना नेते मनोहर जोशी
१०.५०:
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने बजावला मतदानाचा हक्क

नवरी-नवरदेवाने लग्नापूर्वी केले मतदान
नवरी-नवरदेवाने लग्नापूर्वी केले मतदान

.. या मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

शिवसेना नेते रविंद्र वायकर यांचे सपत्नीक मतदान
शिवसेना नेते रविंद्र वायकर यांचे सपत्नीक मतदान

१०.३०: दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचे नाव गहाळ. मत न देता परतले

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केले मतदान
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केले मतदान

 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केले मतदान
अभिनेता सुनील बर्वेने केले मतदान
ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी महापालिकेने अशी सोय केली आहे. कांदिवली येथे ७५ वर्षीय महिलेला मतदानासाठी नेतानाच प्रसंग
ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी महापालिकेने अशी सोय केली आहे. कांदिवली येथे ७५ वर्षीय महिलेला मतदानासाठी नेतानाच प्रसंग

 

शरद पवारांच्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही!, मतदान कोणाला केलं?


१०.१५:
मुंबईत राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि मनोहर जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क
१०.०५:
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बजावला मतदानाचा हक्क

९.५५: मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला
९.३६:
मुंबईच्या पेडर रोड परिसरातील वॉर्ड क्रमांक २१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मतदान

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

९.३५: भाजप खासदार किरीट सोमय्या यांचे सहकुटुंब मतदान; नील सोमय्या वॉर्ड क्रमांक १०८ मधून रिंगणात
९.३०: मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी बजावला मतदानाचा हक्क
९.०४:
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विलेपार्लेच्या दीक्षित रोडवरील महानगरपालिका शाळेत बजावला मतदानाचा हक्क
९.०४:
मुलूंडच्या तरूण उत्कर्ष मतदान केंद्रावर नागरिकांचा गोंधळ
९.०४:
मुलूंडमधील मतदान केंद्रावर संथ गतीमुळे नागरिक संतापले

८.५८: बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही बजावला मतदानाचा हक्क

चारकोपमध्ये मतदार यादीत गोंधळ; शिवसेना उमेदवार शुभदा गुडेकर यांची तक्रार
चारकोपमध्ये मतदार यादीत गोंधळ; शिवसेना उमेदवार शुभदा गुडेकर यांची तक्रार

८.४९: जुन्या आणि नव्या यादीत बुथ क्रमांक मिळत नसल्याची तक्रार
८.४९:
चारकोपमध्ये मतदार यादीत गोंधळ; शिवसेना उमेदवार शुभदा गुडेकर यांची तक्रार
८.४५:
मुंबईच्या गोरेगाव परिसरातील मतदान केंद्रांवर मोठी गर्दी
८.४०:
अभिनेत्री शुभा खोटे यांनीही बजावला मतदानाच हक्क
८.३९:
सकाळच्या सत्रातील मतदानात ज्येष्ठ नागरिकांचा टक्का अधिक
८.३८:
गीतकार गुलजार यांनी मुंबईत केले मतदान
८.३७:
अभिनेत्री रेखा यांनी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क
८.३६:
विशाल ददलानी दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील मतदान केंद्रावर करणार मतदान
८.३५:
रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यारी रोड परिसरातील केंद्रावर मतदान करणार
८.३४: 
बॉलीवूड तारे-तारकाही मतदान करणार; वरूण धवन जुहूमध्ये करणार मतदान

८.२६: कुलाबा परिसरातील मतदान केंद्रावर टीना अंबानी यांचे मतदान
८.२५:
चारकोप परिसरात महापालिकेतर्फे वाटण्यात आलेल्या पावतीवर बूूथ क्रमांक नसल्याने मतदारांमध्ये गोंधळ.
८.२०:
मतदान केंद्रावर गर्दी असल्यामुळे नागरिकांना अर्धा तास करावी लागत आहे प्रतिक्षा
८.१५:
चारकोप, कांदिवलीमध्ये सकाळीच मतदानाचा उत्साह. मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा
८.१०: 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पेडर रोडच्या वॉर्ड क्रमांक २१४ मध्ये मतदान करणार, मात्र, वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवार नाही, पवारांच्या मतदानाबद्दल उत्सुकता

७.५४: मुंबई महानगपालिकेतील राजकीय पक्षांचे सध्याचे बलाबल (एकुण जागा २२७) : शिवसेना ७५, भाजप ३२, काँग्रेस ५२, राष्ट्रवादी काँग्रेस १३, मनसे २८, समाजवादी पक्ष ७, अखिल भारतीय सेना २, भारिप १, आरपीआय (आठवले गट) १, शेकाप १, अपक्ष १५
७.५०:
मुंबईत सुरक्षेसाठी दंगल नियंत्रण पथकाच्या दहा तुकड्या तैनात
७.३५:
सकाळच्या वेळेत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी
७.३०:
मुंबईतील मतदानाला सुरुवात
७.२१:
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कुटुंबासह सकाळी १०:३० वाजता वांद्रे येथे मतदान करणार आहेत.
७.१५:
राज्य निवडणूक आयुक्त श्री. ज. स. सहारिया सकाळी १०.१५ वाजता के. सी. महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई येथे मतदान करणार आहेत.
७.०३:
७ हजार ३०४ मतदान केंद्र, ४५ हजार कर्मचारी, अधिकारी तैनात
७.०२:
२२७ प्रभागांसाठी दोन हजार २७५ उमेदवार रिंगणात
७.०१:
सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ
७.००:
सकाळी ७.३० वाजता मतदानाला होणार सुरूवात
६.५७ :
‘मिनी विधानसभा’ समजल्या जाणाऱ्या मुंबई, ठाणे, उल्हासनगरसह राज्यातील दहा महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान