मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजपला घेऊन सत्ता स्थापन करणार नाही असेच काहीसं चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना भाजपमध्ये चढाओढ निर्माण झालीय. मॅजिक फिगर गाठण्याइतपत शिवसेनेने संख्याबळ जमवण्यास सुरूवात केल्याने मुंबईत शिवसेनेचाच महापौर होऊ शकेल असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. मात्र त्यानंतर राज्यातील सत्तेला सुरूंग लागू शकतो अशी रणनीती शिवसेनेकडून आखली जाऊ शकते असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना भाजपला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही असे वक्तव्य केले आहे. त्याविषयी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी “जय महाराष्ट्र” असे म्हटले. ठाकरे यांच्या प्रतिक्रियेतच भाजपची साथ त्यांना नको हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेना भाजपशी युती न करताच सत्ता स्थापन करणार असाच अर्थ ठाकरे यांच्या प्रतिक्रियेतून निघतोय. महापालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने दोन्ही पक्षांकडून सत्तेसाठी बेरीज वजाबाकीची गणित जुळवली जात आहेत. मात्र सध्या तरी सत्तेच्या बाजूनेच शिवसेनचं पारंड झुकल्याचे दिसून येतयं.

मुंबई महापालिकेची मुदत येत्या ८ मार्चला संपणार आहे त्यामुळे त्या अगोदरच महापौर निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे नियमानुसार त्या अगोदरच महापौरपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे ६ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे आधी महापौर बसवू नंतर सत्ता पाडू असाच विचार शिवसेनेत शिजल्याचे समजते. त्यामुळे राज्याला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावं लागणार असेच चिन्ह दिसून येत आहे.
कसा असू शकतेा आकडयांचा खेळ
शिवसेनेच्या बाजूने …

शक्यता १
शिवसेनेला काँग्रेसने पाठींबा दर्शविल्यास सहजपणे शिवसेनेचा महापौर बसू शकतो.

शिवसेना + अपक्ष + काँग्रेस
८४ + ३ + ३१ = ११८

शक्यता २

शिवसेना + अपक्ष + मनसे + { काँग्रेस तटस्थ }
८४ + ३ + ७ = ९४

शक्यता ३

शिवसेना + अपक्ष + मनसे + काँग्रेस
८४ + ३ + ३ + ३१ = 125

शक्यता ४

शिवसेना + अपक्ष + {मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा सगळेच तटस्थ राहिल्यास }
८४ + ३ = 87

भाजपच्या बाजूने …

शक्यता १
भाजप + अपक्ष + राष्ट्रवादी काँग्रेस {मनसे तटस्थ }
८२ + १ + ९ = ९२

शक्यता २
भाजप + अपक्ष + मनसे + {राष्ट्रवादी तटस्थ }
८१ + २ + ७ = ९०

शक्यता 3
भाजप + अपक्ष + राष्ट्रवादी काँग्रेस + मनसे
८२ + १ + ९ + ७ = ९९

शक्यता ४
भाजप + अपक्ष { मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा सगळेच तटस्थ राहिल्यास }
८२ + १ + = ८३

काय आहे सपाची भूमिका ..
महापालिकेचे सपाचे सहा नगरसेवक आहेत. सपा शिवसेना व भाजपला पाठींबा देणार नाही अशी भूमिका सपाचे आमदार अबू आझमी यांनी मांडली आहे. त्यामुळे सपा तटस्थ राहणार हे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसला काय वाटतयं ..
शिवसेना राज्यात सत्तेत असेपर्यंत महापालिकेत पाठींबा नाही असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. शिवाय भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसशी युतीबाबत चर्चा करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे काँग्रेसचा पाठींबा शिवसेनेला मिळू शकतो.

राष्ट्रवादीच काय म्हणणं आहे?
राष्ट्रवादीचे अवघे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलीय. तरी सुध्दा राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा मिळू शकतो.