मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले असून, दिल्ली ते गल्लीपर्यंत फक्त मुंबईचीच चर्चा आहे. भाजपने शतप्रतिशत विजयाचा नारा दिला असताना, शिवसेनेची भगवी लाट मुंबईच्या किनाऱ्यावर जोरदार धडकली आहे. शिवसेनेने आतापर्यंत आघाडी घेतली आहे. शतकी वाटचाल सुरू झाली आहे. तर भाजपनेही अर्धशतकी वाटचाल केली आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत जोरदार धावलेल्या मनसेचे इंजिन यावेळी काहीसे धीम्या गतीने धावत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. शिवसेनेची भगवी वाटचाल सुरू असताना काही धक्कादायक निकाल लागले आहेत. मनसे, शिवसेनेसह काँग्रेस आणि भाजपच्या तगड्या उमेदवारांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मतदारांनी नाकारलं!

amol kolhe marathi news, shivajirao adhalarao patil marathi news
“उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले!”, ‘त्या’ विधानावरून अमोल कोल्हेंचा टोला
Yavatmal Lok Sabha seat, mahayuti, lok sabha 2024, maha vikas aghadi, Candidate, Lack of Local, Performance Record, wrath of citizens, yavatmal politics news, washim politics news, washim news,
लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उणीदुणी; जनतेचे मनोरंजन! उमेदवारांनी विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा
bachchu kadu navneet rana
“१७ रुपयांची साडी वाटून…”, बच्चू कडूंचा नवनीत राणांवर हल्लाबोल; महायुतीतलं वातावरण तापलं
Pankaja Munde Mahadev Jankar
“बारामतीतून सुरू झालेला प्रवास परभणीत येऊन थांबला…”, पंकजा मुंडेंचा जानकरांना मिश्किल टोला

– तृष्णा विश्वासराव (शिवसेना, पालिकेतील सभागृह नेत्या)

– मंगेश सांगळे (भाजप, मनसेचे माजी आमदार)

– स्वप्ना देशपांडे (मनसे, संदीप देशपांडे यांच्या पत्नी)

– यशोधर फणसे (शिवसेना, स्थायी समिती अध्यक्ष)

– विनोद शेलार (भाजप, आशिष शेलार यांचे बंधू)

– तेजस्वीनी आंबोले (भाजप, नाना आंबोले यांच्या पत्नी)

– प्रवीण छेडा ( काँग्रेस, विरोधी पक्षनेते)

– कामिनी शेवाळे (शिवसेना, खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी)

– देवेंद्र आंबेरकर (शिवसेना,माजी विरोधी पक्षनेते)

– मीनल जुवाटकर (शिवसेना, नगरसेविका)