मुंबई महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात भाजप संपूर्ण ताकदीने उतरला आहे. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मध्ये भाजपने सर्वात श्रीमंत उमेदवार असलेले पराग शहा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्रवीण छेडा यांचा पराभव केला आहे. मुंबईत भाजपने काँग्रेसला दिलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शतप्रतिशतचा नारा देत भाजपने विजयाचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी अधिकाधिक जागांवर तगडे उमेदवार रिंगणात उतरवले होते. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मध्ये भाजपने पराग शहा यांना उमेदवारी दिली. पराग शहा हे मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरलेले सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पराग शहा यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रवीण छेडा यांचा त्यांनी पराभव केला आहे.

 

दरम्यान, पराग शहा हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेले सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांना भाजपने प्रभाग क्रमांक १३२ मधून उमेदवारी दिली. त्यांनी भाजपचा विश्वास सार्थही ठरवला आहे. काँग्रेसचे प्रवीण छेडा यांचे आव्हान त्यांनी पार करून विजयाला गवसणी घातली आहे. पराग शहा यांच्या विजयाने घाटकोपरमध्ये ‘कमळ’ फुलले आहे. पराग शहा यांच्याकडे तब्बल ६८९ कोटी ९५ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. पराग शहा हे बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. पराग शहा यांनी प्रतिज्ञापत्रात तब्बल ६८९ कोटी ९५ लाख २ हजार ३२७ रुपयांची संपत्ती असल्याचे दाखवल्याचे बोलले जाते. त्यांच्या नावावर कोणत्याही स्वरुपाचे कर्ज नाही. यात पराग शहा यांच्या नावावर ३०१ कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावावर २३८ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे.