विजयी नऊपैकी आठ महिला

निवडणुकीआधी आव्हान संपुष्टात आल्याची चर्चा सुरू असलेल्या राष्ट्रवादीने अनपेक्षितरीत्या नऊ जागा खिशात घातल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच्या घडय़ाळाची किल्ली फिरवून ते सुरू ठेवण्याचे काम नगरसेविकांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या नऊपैकी आठ जागा महिला उमेदवारांनी निवडून दिल्या. यापैकी पाच महिला मुस्लीम असून कप्तान मलिक यांनीही यासोबत राराष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील आव्हानाविषयी यावेळी प्रश्नचिन्हच उपस्थित होते.ष्ट्रवादीची जागा राखली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील आव्हानाविषयी यावेळी प्रश्नचिन्हच उपस्थित होते. पाच वर्षांपूर्वी मुंबई पालिकेत राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक निवडून आले होते. मात्र पाच वर्षांत पक्षाकडून कोणतीही विशेष कामगिरी केली गेली नसल्याने अनेक नगरसेवकांनी निवडणुकीआधी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आव्हानाविषयीही चर्चा रंगली होती. मात्र गुरुवारी निकाल हाती आल्यावर राष्ट्रवादीने ९ जागा मिळवल्याचे स्पष्ट झाले. प्रभाग ४२ मधून धनश्री भराडकर, प्रभाग ७८ मधून नाजिया सोफी, प्रभाग ११९ मनीषा रहाटे, प्रभाग १२४ मधून ज्योती हरून, प्रभाग १३१ राखी जाधव, प्रभाग १४० मधून नादिया शेख, प्रभाग १६८ मधून डॉ. सईदा खान, प्रभाग १७० मधून कप्तान अब्दुल मलिक आणि प्रभाग १८८ मधून रेश्माबानो खान निवडून आले. डॉ. सईदा खान यांनी सेनेच्या डॉ. अनुराधा पेडणेकर यांचे आव्हान परतवून लावत धक्कादायक विजयाची नोंद केली.