राज्यातील भाजप नेते आणि कार्यकर्ते ‘एकला चलो रे’ साठी आग्रही असताना युती गरजेची असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल (गुरुवारी) राज्यातील पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीबद्दल आग्रही असल्याचे दिसून आले. युती फुटल्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये, यासाठी युती आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नगरपालिका निवडणुकीत भाजप राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. मात्र या निवडणुकात काँग्रेसने भाजप पाठोपाठ दुसरे स्थान पटकावले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे फारसे नुकसान झाले नाही. त्यामुळे युती फिस्कटल्यास त्याचा थेट फायदा काँग्रेसला होऊ शकतो. राज्यात काँग्रेसला कमजोर करायचे असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती गरजेची असल्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
ratnagiri sindhudurg lok sabha constituency marathi news
रत्नागिरी – सिंधुदुर्गात उमेदवारीसाठी किरण सामंत अजूनही आशावादी

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस आणि भाजपला मिळालेल्या जागांमध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे ‘एकला चलो रे’ म्हणून वेगवेगळे लढून काँग्रेसचा फायदा होण्यापेक्षा युती करणे योग्य असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महापालिकांमध्ये युती करताना २०१२ च्या निकालाच्या आधारे युती करणार नसल्याचेदेखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पालिका निवडणुकीनंतर झालेल्या २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपच्या वाढलेल्या ताकदीच्या आधारे जागावाटप करण्यात यावे, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी पक्षनेत्यांसोबच्या बैठकीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत भाजप स्वबळावर लढल्यास भाजपला शंभरपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज पक्षाच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. उलट युती केल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होईल आणि महापौरपदही शिवसेनेलाच मिळेल, अशी शक्यता भाजपच्या नेत्यांकडून वर्तवली जाते आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत युती करुन १०० जागा लढवण्यापेक्षा स्वबळ आजमवून १०० पेक्षा जागा जिंकाव्यात, असे मानणारा वर्ग भाजपमध्ये आहे. यामुळे भाजप महापालिकेतील क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा या वर्गाचा दावा आहे. मात्र शिवसेनेला थेट शिंगावर घेतल्यास राज्यातील सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.