( BMC ) मुंबई आणि ( PMC )पुणे महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामासाठीचा प्रचार संपल्यानंतर आज (मंगळवार) निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी जोरदार चुरस असून मतदार ‘परिवर्तन’ घडविणार की सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारडय़ात मते टाकणार हेही मतदानावर अवलंबून राहणार आहे. मुंबईची सुभेदारी शिवसेनेकडेच ठेवायची, की तिथे दुसऱ्या कुणाला संधी द्यायची, ठाण्यातील किल्लेदार कायम ठेवायचे की नव्या सरदारांना किल्लेदार करायचे, पुण्याचे सुभे कुणाच्या हाती सोपवायचे, नाशिकमधील सत्तेचा कुंभ कुणाच्या हाती सुपूर्द करायचा, नागपुरातील सत्तेच्या चाव्या कुणाकडे द्यायच्या, जिल्हा परिषदांमध्ये कुणाला कारभारी करायचे, पंचायत समित्यांचे सुकाणू कुणाच्या हातात द्यायचे.. याबाबतचा निर्णय घेण्याची संधी आज, मंगळवारी राज्यभरातील सुमारे पावणेचार कोटी मतदारांना मिळणार असून, त्या निमित्ताने निदान आज तरी मतदार हा ‘राजा’च्या भूमिकेत असेल.
मुंबई, ठाण्यासह दहा महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी हा कौल आजमावला जाईल. मतदान न करता घरी बसण्याचा किंवा सुट्टीची संधी साधत पर्यटनाला जाण्याचा विचार सोडून हिरीरीने मतदानास उतरणे ही जबाबदारी आता मतदारांची आहे. मतदान वाढावे, यासाठी राज्याच्या निवडणूक यंत्रणेने जनजागृतीच्या साऱ्या मार्गाचा पुरेपूर अवलंब केला. आता पुढाकार मतदारांनी घ्यायचा आहे.

मराठी कलाकारांनीही मतदान करण्यास सुरुवात केली आहे. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि मालिकांमध्ये विविध शहरातील कलाकार कार्यरत आहेत. कलाकारांनी पुणे, नागपूर, मुंबई येथील आपल्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केल्याचे पाहायला मिळत आहे.

काहे दिया परदेस फेम अभिनेत्री सायली संजीव हिने मतदानाचा हक्क बजावला.

sayali-sanjeev

निगडी प्राधिकरण येथील सिधुनगर, मतदान केंद्रात सोनाली कुलकर्णी हिने मतदानाचा हक्क बजावला.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही मतदान केले.

salil kulkarni

अभिनेत्री श्रुती मराठे हिनेदेखील मतदानाचा हक्क बजावला असून #votekarmaharashtra या हॅशटॅगने तिचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.

16864419_10210654489730840_4281502417690272036_n

पुष्कर श्रोत्री, सुकन्या मोने, जयवंत वाडकर यांनीही मतदान केले.

16864602_10208623992180861_8437550863164065985_n

रेणुका शहाणे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

अभिनेता सुनील बर्वे यांनीही मतदान केले.

sunil-barve

आज ज्या बोटावर शाई नसेल ते बोट उद्या कोणाचेही दोष दाखवण्यासाठी उचलण्याचा आपल्याला अधिकार नाही. सुजाण नागरिक म्हणून मी मतदान केलंय, तुम्हीही न चुकता करा- शिल्पा नवलकर

unnamed

अभिनेत्री स्मिता गोंदकरने आपला मतदानाचा अधिकार बजावला.

smita-gondkar