26 June 2017

News Flash

ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी कराच!

शिवसेनेचे खुले आव्हान

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 22, 2017 2:59 PM

शिवसेनेचे खुले आव्हान

केंद्रात व महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यास तुम्हाला कोणी रोखले आहे, असा रोखठोक सवाल करत, उगाच बदनाम करण्याचे ‘किरटे’ उद्योग यापुढे सहन केले जाणार नाहीत, असा सज्जड दम शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिला.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोपसत्र सुरू आहे. ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर करावी अशी मागणीही सोमय्या यांनी केली असून त्याला पत्रकार परिषदेत उत्तर देताना केंद्रात व राज्यात तुमचीच सत्ता असताना ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यास तुम्हाला कोणी रोखले, असा सवाल राहुल शेवाळे यांनी केला. संपत्तीच जाहीर करायची असेल तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही संपत्ती जाहीर करा. अमित शहा यांनी आमदार असतानाची संपत्ती घोषित केली असली तरी त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या काळात किती संपत्ती बनवली याची माहिती त्यांनी जाहीर केलेली नाही, असा टोलाही शेवाळे यांनी लगावला. नोटाबंदी लादताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीस दिवसांत भाजपच्या सर्व मंत्री, खासदार, आमदार यांची संपत्ती जाहीर करण्यास सांगितले होते.

‘गडकरींना अडचणीत आणण्यासाठी..’

भाजप नेते नितीन गडकरी यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होऊ नये यासाठी पूर्ती घोटाळा बाहेर काढण्यात आला होता, असा आरोप शेवाळे यांनी केला.

First Published on February 17, 2017 1:53 am

Web Title: bmc election 2017 nitin gadkari shiv sena
 1. P
  Prakash Thakurdesai
  Feb 17, 2017 at 5:19 am
  घाबरायचं कशाला....उलट अभिमानाने सांगा कि आम्ही आहोत करोडपती किंवा अब्जोपती, त्यात काय, राजकारण हा आमचा धंदा आहे आणि या धंद्यात सुद्धा जो प्रोफेशनल आहे तोच कमावू शकतो? आणि प्रश्न विचारणारा कोण आहे, याची काय लायकी आहे ?? आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे सोडले तर बाकी कर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत कि काय? अमित शहा ची पण काढा संपत्ती, मोदी पंतप्रधान झाल्या नंतर RSS ची संपत्ती किती पटीने वाढली त्याची पण चोकशी करा आणि त्याचे स्रोत पण जाहीर करा, आहे का हिम्मत?? राजकारणात सगळे सारखे असतात, सगळेच !
  Reply
  1. P
   Prakash Thakurdesai
   Feb 17, 2017 at 5:32 am
   तमाम मराठी नागरिकांस कळले पाहिजे कि आपण आपल्या नेत्यानंविरुद्ध जी आरोप सत्रे करतो ती थांबवली पाहिजेत कारण राजकारणात सगळेच तसे असतात. आज ते अमित शहा आणि अन्य परप्रांतीय नेते कोठे पोचले, कारण त्यांचा समाज त्यांना काही बोलत नाही कारण त्यांना माहिती असते कि राजकारणात हे करावे लागते, आपण मात्र उगाच बोंबलत बसतो आणि आपल्याच नेत्यांना खाली खेचतो. शरद पवार यांच्या विरुद्ध खूप माहोल झाला, पण तेच शरद पवार गुरु समान आहेत हे खुद्द मोदी बोलले आणि त्यांना सर्वोच्च पुरस्कार पण प्रदान केला...मग मूर्ख कोण..?
   Reply
   1. S
    Santosh Rane
    Feb 17, 2017 at 11:53 am
    *Public transport 🚩मुंबई ची स्वतःची public transport आहे. आणि यात गारेगार AC बसेस सुद्धा आहेत. तोट्यात असताना देखील, दररोज 4700 बसेस (total no. of buses) सेवा देतात. सेवेत कधीही खंड पडलेला नाही. *BEST (Electricity supply) 🚩मुंबईतील सर्वात जुनी आणि स्वस्त दरात ग्राहकांना वीज सेवा.
    Reply
    1. S
     Santosh Rane
     Feb 17, 2017 at 11:45 am
     03:42PM - मुंबई - मुंबईत संघटना बांधण्यात जेवढे शिवसेनेला यश आले, तेवढे कुणाला आले नाही- सुप्रिया सुळे
     Reply
     1. S
      sudhir
      Feb 17, 2017 at 2:28 pm
      आता मालद्यामध्ये २००० च्या डुप्लिकेट नोटा पकडल्या. आता पुन्हा रांगा लावायच्या का A TM बाहेर. काहीही निर्णय घायचे . बी जे पी ने नोटबंदी आणून व्यापारी लोकांचे चांगभले केले. मोदी अडाणी च्या विमानात फिरले प्राचारासाठी मग त्याचा खर्च नको का द्यायला . तो नोटबंदी च्या रूपाने माघारी दिला. खरंच भंपक पक्ष आहे हा.
      Reply
      1. उर्मिला.अशोक.शहा
       Feb 17, 2017 at 1:25 am
       वंदे मातरम - सेने चे प्रवक्ते सगळ्यावर आरोप करतात पण आम्ही उद्धव ठाकरे ची संपत्ती वेबसाईट वर जाहीर करू असे का म्हणत नाहीत त्यांना कश्या ची भीती वाटते? सोमय्याने फक्त संपत्ती जाहीर करण्या चे आवाहन केले तर एव्हडा राग याय चे कारण काय? आपण जर स्वछ असाल तर संपत्ती जाहीर करायला हरकत नसावी. वेडी वाकडी वळणे घेऊन संपत्ती जाहीर करण्या चा मुद्दा सेना नेते टाळीत आहेत या चा अर्थ जनते च्या लक्षात आला आहे म्हणून कदाचित सेने ला सत्ता हवी आहे ३७०० कोटी चे आकर्षण आहे सावधान जनता जागली आहे जा ग ते र हो
       Reply
       1. U
        umesh
        Feb 17, 2017 at 11:12 am
        मोदी लाट नसती तर शेवाळे मानखुर्दच्या पुढे जाऊ शकले नसते. त्यांनी आव्हान द्यावे म्हणजे फारच झाले. बाकी संपत्ती website वर टाकायला हरकत नाही. त्याऐवजी उगाच प्रतिआव्हान देत सुटले आहेत. याचा अर्थ संपत्ती ज्ञात उत्पन्नाच्या पेक्षा कितीतरी जास्त आहे. संपत्ती जाहीर केली तर उद्धवची शशिकला होणार हे शिवसेनेच्या सर्व कावळ्यांना माहित आहे. म्हणून हि नाटके.
        Reply
        1. वाघ साहेबराव
         Feb 17, 2017 at 11:40 am
         चौकशी कशाला, स्वतः जाहीर करा.
         Reply
         1. Load More Comments