मुंबई महापालिकेत ८४ जागांवर समाधान मानावे लागलेल्या शिवसेनेने आता सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरु केली आहे. पक्षातील बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न शिवसेनेने सुरु केले असून वॉर्ड क्रमांक १२३ मधून निवडून आलेल्या सेनेच्या बंडखोर उमेदवार स्नेहल मोरे आणि दिंडोशीतील बंडखोर तुळशीदास शिंदे यांची मनधरणी सुरु झाली आहे. या दोघांनीही पुन्हा सेनेला साथ दिण्याची तयारी दर्शवली असून या दोघांच्या  पाठिंब्यामुळे शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ ८६ वर पोहोचू शकेल.

महापालिकेच्या सत्तेसाठी मुंबईकर मतदारांनी शिवसेना आणि भाजप या दोघांनाही समान संधी दिल्याने या दोन्ही पक्षांत सत्तास्थापनेसाठी चुरस सुरू झाली आहे. शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागांवर विजय मिळाला आहे. २२७ सदस्यसंख्या असलेल्या महापालिका सभागृहातील पूर्ण बहुमतासाठी आवश्यक असलेला ११४ जागांचा आकडा गाठण्यात दोन्ही पक्षांना अपयश आले आहे. त्यामुळे आता अपक्ष आणि पक्षातील बंडखोर नगरसेवकांची मनधरणीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
thackeray Shiv Sena, Vijay Devane , Lakhs of Kolhapur Public , Spokespersons for Shahu Maharaj, Defeat Sanjay Mandlik, kolhapur lok sabha seat, lok sabha 2024, maha vikas aghadi,
लाखो जनताच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते; तेच मंडलिकांना पराभूत करतील -विजय देवणे
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा
Buldhana
बुलढाण्यात महायुतीत महाफूट, भाजप लोकसभा प्रमुखांचे बंड; उमेदवारी अर्ज दाखल

महापालिका निवडणुकीत विक्रोळीतील प्रभाक क्रमांक १२३ मध्ये माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती. वहिनी स्नेहल मोरे यांना उमेदवारी मिळावी अशी सुधीर मोरे यांची मागणी होती. मात्र सेनेने उमेदवारी नाकारल्याने सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात सुधीर मोरे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण निवडणुकीत स्नेहल मोरे यांना विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेलाही सत्ता कायम राखणे गरजेचे आहे. त्यामुळे स्नेहल मोरे यांच्या मनधरणीचे सेनेचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे. यात सेनेला यश आले असून मोरे यांनी पक्षवापसीची तयारीही दर्शवली आहे. तर दिंडोशीतील तुळशीदास शिंदे यांनीही स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय आणखी एक अपक्ष नगरसेवक सेनेच्या गळाला लागल्याचे वृत्त आहे. या तीन नगरसेवकांच्या पाठिंब्याच्या आधारे शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ ८७ वर पोहोचू शकेल.