अनेक लोकांना स्वत:च्या जवळ असलेली संधी दिसत नाही. ती संधी पकडण्याची ताकद त्यांच्यात नसते. फळाप्रमाणे संधीसुद्धा पिकावी लागते. संधी पिकेपर्यंत थांबण्याची अनेकांची तयारी नसते. त्यांना वाटते की पिकलेले फळ एकदमच पदरात पडावे. जगात असे अनेक तरुण आहेत ज्यांच्यासमोर संधी होती. त्या संधीने त्यांना वैभव, कीर्ती दिली असती. पण ती संधी त्यांनी हातातून निसटू दिली. संधी पकडण्यासाठी सतत सावध राहायला हवे.

माणसाच्या आयुष्यात विशेषत: तारुण्यात सगळेच दिवस सोनेरी असतात. प्रत्येक पावलाला संधी वाट पाहात असते. ती तुम्ही घेतली पाहिजे. जशी शेतात बियाणांची पेरणी योग्य वेळीच होणे आवश्यक असते. नाही तर ते वाया जाते. माणसाच्या आयुष्याला कधी आणि कसं वळण मिळेल सांगता येत नाही. हा काळ खूप थोडा असतो फक्त तो योग्य वेळी ओळखावा लागतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की, त्या क्षणामुळे त्याचे भवितव्य ठरते. क्षण अनुकूल असो वा प्रतिकूल ती संधी किंवा प्रसंग काही क्षणापुरताच असतो. उदाहरणच द्यायचे तर, समजा एखाद्याला राग आला त्या रागाच्या भरात त्याने कुणाचा तरी खून केला. राग आला क्षणापुरता. पण त्याच्या आयुष्यातली किती वर्षे वाया गेली? कदाचित जन्मठेपेची चौदा किंवा आजन्म कारावास. आयुष्यच पणाला लागले.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

मुलाखतीसाठी फक्त पाचच मिनिटे पुरतात. त्यावर उमेदवाराची नोकरी ठरते. त्या थोडय़ाच काळात तो मुलाखतकर्त्यांवर जी छाप पाडतो त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. कुठल्या प्रकारच्या मुलाखतीला एखादी व्यक्ती जाते, किंवा कुठल्या परीक्षेला बसते त्यावर त्याच्या जीवनाचे ‘स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग’ अवलंबून असते. तो उच्च अधिकारी होणार की सामान्य कारकून राहणार हे ठरते.

आयुष्यात संधी पुष्कळ आल्या तरी बसल्या जागी त्या तुमच्या गळ्यात येऊन पडत नाहीत. संधी घ्यावी लागते. इंग्लंडमध्ये थॉमस नावाचा लेथवर काम करणारा एक कारागीर होता. एकदा त्याला मद्यपानच्या निषेध संमेलनासाठी लिसेस्टर या गावी पंधरा मैल चालत जावे लागले. चालत जाताना त्याच्या मनात विचार आला की अशा संमेलनासाठी जर काही व्यवस्था आपण केली तर लोक जाऊ  शकतील. आणि त्याने प्रवाशांच्या सुखसोयीसाठी, त्यांच्या तिकिटांची व्यवस्था करणारी एक कंपनी सुरू केली. ही प्रवासी कंपनी आज ‘थॉमस कुक’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांची मोठमोठी जहाजेही आहेत.

एक तरुण मुलगा एकदा खूप आजारी पडला. पडल्या पडल्या त्याला काय करावे सुचत नव्हते. मग एक दिवस त्याने एक लाकूड मागवले. ते खूपच मऊ  होते. ते त्याने चाकूने कापले त्याच्यात कोरून त्याने लहान मुलासाठी एक खेळणे बनवले. ते खेळणे आजूबाजूच्या मुलांना इतके आवडले की त्या सगळ्यांनी त्याच्याकडे तशाच खेळण्याची मागणी केली. आजारातून बरा झाल्यानंतर त्याने खेळणी बनवण्याचाच व्यवसाय सुरू केला. त्याची खेळणी बच्चे लोकांना खूपच आवडायला लागली.

वयाच्या चौदाव्या वर्षी रेल्वेत गोळ्या आणि वृत्तपत्रे विकणारा एडिसन, याने जवळजवळ १३०० च्या वर शोध लावले. आणि कोटय़वधी डॉलर्स मिळवले. वाशबर्न नावाचा एक छोटा मुलगा लोहाराच्या हाताखाली काम शिकत होता. तो अतिशय लाजाळू होता. पण त्याची बुद्धी मात्र तीव्र होती. तो सतत विचार करत असे. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की पियानोसाठी ज्या तारा वापरतात, त्या अमेरिकेत कुठेच बनत नाहीत. इंग्लंडमध्येच एक कारखाना आहे. तो कारखाना जगभरच्या पियानोसाठी तारा पुरवतो. त्याचा एकाधिकारच स्थापन झाला आहे. वॉशबर्नने ठरवले की पियानोसाठी दर्जेदार तारा मीच बनवीन आणि त्याने तो व्यवसाय सुरू केला. त्या तारेला अनेक ठिकाणाहून मागणी वाढत गेली. आता त्याच्या कारखान्यात हजारांवर कामगार काम करतात.

समोर आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा प्रत्येकाने करून घेतला पाहिजे. मनात येणारे विचार, कल्पना, प्रकल्प यांना मूर्त स्वरूप देणे केवळ तुमच्याच हातात आहे. सतत आपली पंचेंद्रिये उघडी ठेवून, दक्ष राहून काम करीत चला. उत्कर्ष तुमचाच आहे. जे लोक डोळे उघडून जग पाहतात, विचार करतात, आपल्या कल्पना व्यवहारात उतरवतात, त्यांच्या हातात व्यापार, व्यवसायाच्या, कारखानदारीच्या नाडय़ा असतात. अर्थातच त्यांच्या हातातच उत्कर्षांच्याही दोऱ्या असतात.

प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे व्यवसाय केला पाहिजे. म्हणजे त्याच्यात रस असला की जीव ओतला जातो. आणि काम अत्यंत कुशलतेने होते. तडीस नेले जाते. केवळ शालेय शिक्षण हेच आयुष्याचे ध्येय असते असेही नाही. सचिन तेंडुलकर हा बारावीत नापास झाला होता. क्रिकेटविश्वात तो अनभिषिक्त सम्राट झाला. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा एक माणूस धीरूभाई अंबानी, रिलायन्स विश्व त्याने उभे केले. सगळ्यांच्या बुद्धीची कुवत सारखीच नसते. कुणाला शालेय शिक्षणात गोडी असेल तर कुणाला कुठल्या कलेमध्ये रस असेल. ज्याच्या-त्याच्या आवडीप्रमाणे त्याने क्षेत्र निवडावे आणि संधी आली की ती त्याने पकडावी.

प्रत्येकाचे कौशल्य वेगळे. ते फक्त ज्याने-त्याने ओळखले पाहिजे.  अनेक लोकांना स्वत:च्या जवळ असलेली संधी दिसत नाही. ती संधी पकडण्याची ताकद त्यांच्यात नसते. फळाप्रमाणे संधीसुद्धा पिकावी लागते. संधी पिकेपर्यंत थांबण्याची अनेकांची तयारी नसते. त्यांना वाटते की पिकलेले फळ एकदमच पदरात पडावे. जगात असे अनेक तरुण आहेत ज्यांच्यासमोर     संधी होती. त्या संधीने त्यांना वैभव, कीर्ती दिली असती. पण ती संधी त्यांनी हातातून निसटू दिली. संधी शोधायला तुमचे गाव सोडून एखाद्या महानगरात यायची गरज नसते. मात्र ती पकडण्यासाठी सतत सावध राहायला हवे.

एक गमतीदार गोष्ट म्हणून सांगण्यात येते. एक माकड घर बांधायचे ठरवतो. कारण रात्र झाली की त्याला जाणवायचे की आपल्याला झोपायला निवारा नाही. पण दिवस सुरू झाला की या झाडावरून त्या झाडावर उडय़ा मारण्यात त्याचा दिवस कसा निघून जायचा ते कळायचेही नाही. रात्र झाली की पुन्हा त्याला आठवायचे अरे घर बांधायचे राहिलेच. उद्या नक्की बांधू या, असं तो ठरवायचा. पण ते कधीच घडले नाही. कित्येक वेळा माणूस ठरवतो मी हातातले काम उद्या करीन पण त्याचा काहीच फायदा होत नाही. उद्या घराचा विमा उतरवीन असे म्हणत म्हणत दिवस पुढे जातात आणि एके दिवशी घराला आग लागते. कुणी म्हणतो, माझ्या खूप आजारी मित्राला उद्या भेटीन. पण आजच तो वारल्याची बातमी येते. तुटलेले कुंपण उद्या दुरुस्त करू म्हणून शेतकऱ्याने टाळलेले असते. त्यातून बाहेरची गुरे येऊन शेतीची नासधूस करतात. एवढय़ाशा दिरंगाईने बरेच मोठे नुकसान होते. ‘स्टिच इन टाइम, सेव्ह नाइन’ अशी इंग्रजीत म्हण आहे. वेळेवर जर फाटलेले शिवले नाही तर ते खूपच उसवत जाते.

अनेक तरुण उद्योजक जनसमुदायापुढे बोलायला, भाषण द्यायला घाबरतात. त्यांचे विचार त्यामुळे लोकांपुढे येत नाहीत. सार्वजनिक कामातही भाग घेणे ही एक संधीच असते. त्यामुळे विविध प्रकारच्या स्वभावाच्या लोकांशी संपर्क येतो आणि परिस्थिती कशी हाताळावी हे समजते. उद्योगी माणसाला रोजचीच एक नवीन संधी असते. त्यातले कोणते काम ताबडतोब केले पाहिजे, कोणते काम महत्त्वाचे हे समजून घेता आले पाहिजे. आता लगेच निर्णय नको, नंतर बघू, असा विचार बरेच जण करतात.

माझ्याकडेही चांगले गुण होते किंवा आहेत पण ते दाखवायला कधी संधी मिळाली नाही, असे लोक तक्रार करीत असतात. पण संधी कधी आपणहून येत नाही तर ती हासील करावी लागते. कधी कधी संधी येऊनही ती साधता येत नाही. याचे कारण म्हणजे तुमचे मन शांत नसते, योग्य वेळी योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ  शकत नाही. तुमचे मन संभ्रमित अवस्थेत असते. निर्णयशक्ती नसल्याने ती सुवर्णसंधी निसटून जाते आणि आयुष्यभरासाठी खंत मात्र राहते. बऱ्याच वेळेला कारण सापडले नाही तर माझ्या नशिबात नव्हते, असे म्हणून माणूस गप्प बसतो. नशिबावर हवाला ठेवणे म्हणजे आळशीपणाला मदत करणे आहे. कित्येक वेळा संधीने ठोठावलेला दरवाजा तुम्हाला ऐकू येत नाही. स्वत:साठी संधी निर्माण करणे तुमच्या हातात असते. त्यासाठी फक्त सतत सावध रहाणे. ‘आज’ मध्ये जगणं महत्वाचे असते.

(रिया पब्लीकेशनच्या ‘हाऊ टू बिकम सक्सेसफुल या पुस्तकातून साभार)

सविता नाबर  savitanabar@gmail.com