निश्चलनीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर पहिल्यांदाच सादर होणा-या २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ च्या वर्षअखेरीस देशवासियांशी संवाद साधताना केलेल्या विविध घोषणांनंतर अर्थमंत्री अरूण जेटलींच्या सुटकेसमधून नवीन काय बाहेर पडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कर, तुटीचे गणित, काय स्वस्त आणि काय महाग होणार, प्रत्येक क्षेत्रासाठी केली जाणारी आर्थिक तरतूद, पहिल्यांदाच स्वतंत्रपणे सादर न होणा-या रेल्वेच्या वाट्याला काय येणार हे थोड्याच वेळात सादर होणा-या अर्थसंल्पानंतर निश्चित होणार आहे. नोटाबंदीने विकास मंदावल्याचे सूतोवाच अर्थसंकल्पपूर्व सर्वेक्षण अहवालात करण्यात आल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात विकासदरालाही खीळ बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, देशात आर्थिक सुधारणा वेगात घडाव्यात असा आग्रहसुध्दा सर्वेक्षणात धरण्यात आल्याने जेटलींच्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष असेल हे निश्चित.

Union Budget 2017 LIVE Updates 

Live Updates
10:11 (IST) 2 Feb 2017
मी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही- शुभा राऊळ
10:07 (IST) 2 Feb 2017
शिवसेनेचे अनेक विद्यमान नगरसेवक आज अर्ज भरणार, शिवसेनेकडून रात्री उशीरा १५० एबी फॉर्मचे वाटप- टीव्ही रिपोर्ट
10:01 (IST) 2 Feb 2017
कोणताही राजकीय पक्ष आणि उमेदवार ३ आणि ४ फेब्रुवारीला वर्तमानपत्रात जाहिरात देऊ शकणार नाही: निवडणूक आयोग
09:03 (IST) 2 Feb 2017
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या (शुक्रवार) शेवटचा दिवस
08:59 (IST) 2 Feb 2017
मुंबई: महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ १६६ उमेदवारांचे अर्ज दाखल; उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
03:34 (IST) 2 Feb 2017
मुंबईची ५ स्थानके कात टाकणार! केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वेबाबत घोषणा करताना १.३१ लाख कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख
03:26 (IST) 2 Feb 2017
सेनेविरोधात फलकयुद्ध; चारही पक्षांनी शहरातील चौकाचौकांमध्ये मोठे फलक लावले आहेत.
20:54 (IST) 1 Feb 2017
भारत ६ बाद २०२, इंग्लंडसमोर २०३ धावांचे आव्हान
18:35 (IST) 1 Feb 2017
भारत वि. इंग्लंड तिसरा ट्वेन्टी-२० सामना; नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
13:46 (IST) 1 Feb 2017
स्वच्छता अभियानाअंतर्गत देशातील ६० टक्के गावांमध्ये शौचालये उभारली गेली. – अरूण जेटली
12:59 (IST) 1 Feb 2017
अर्थमंत्री अरूण जेटली यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपले. भाषणाचा कालावधी तब्बल १ तास ५५ मिनिटे.
12:57 (IST) 1 Feb 2017
राजकीय पक्षांसाठी आरबीआयमध्ये इलेक्टोरल बॉन्डची सुविधा; आरबीआयकडून हे बॉन्ड विकत घेता येणार. - अरूण जेटली
12:55 (IST) 1 Feb 2017
'जीएसटी'च्या पार्श्वभूमीवर अबकारी कर आणि सीमाशुल्कात कुठलाही बदल नाही. - अरूण जेटली
12:54 (IST) 1 Feb 2017
राजकीय निधीसाठी नवीन बॉन्ड येणार; २० हजाराहून अधिक निधी घेतल्यास राजकीय पक्षांना हिशेब द्यावा लागणार. - अरूण जेटली
12:52 (IST) 1 Feb 2017
'८० सी' पूर्णपणे वापरल्यास साडेचार लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तिला प्राप्तीकर नाही. - अरूण जेटली
12:50 (IST) 1 Feb 2017
अडिच लाख ते पाच लाख उत्पन्नासाठी पाच टक्के प्राप्तीकर. - अरूण जेटली
12:46 (IST) 1 Feb 2017
राजकीय पक्षांना फक्त २००० रुपयांपर्यंतची देणगी रोखीनं स्वीकारता येणार - अरुण जेटली
12:44 (IST) 1 Feb 2017
५० कोटींच्या वर उलाढाल असलेल्या कंपन्यांना करात ५ टक्के सूट मिळणार. - अरूण जेटली
12:42 (IST) 1 Feb 2017
यापुढे ३ लाख रूपयांवरील व्यवहार रोखीने करण्यावर बंदी. - अरूण जेटली
12:41 (IST) 1 Feb 2017
जमिन अधिकरणाच्या मोबदला रकमेवर कर लागणार नाही. - अरूण जेटली
12:40 (IST) 1 Feb 2017
अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जातींसाठी ५५ हजार ३९३ कोटींची तरतूद. - अरूण जेटली
12:38 (IST) 1 Feb 2017
नोटाबंदीनंतर ३४ टक्के करदाते वाढले आणि आयकराच्या महसुलामध्ये १७ टक्क्यांनी वाढ. - अरूण जेटली
12:37 (IST) 1 Feb 2017
८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात १.०९ कोटी खात्यांमध्ये सरासरी पाच लाखाहून अधिक रुपये जमा. - अरूण जेटली
12:35 (IST) 1 Feb 2017
सुरक्षा दलातील जवांनांना रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. तिकीटं बुक करण्यासाठी स्वतंत्र सिस्टीम राबवणार.
12:33 (IST) 1 Feb 2017
देशातील ५२ लाख लोकांनी ५ ते १० लाख उत्पन्न दाखवलं तर फक्त २० लाख व्यापा-यांनी दाखवलं ५ लाख उत्पन्न. - अरूण जेटली
12:30 (IST) 1 Feb 2017
देशात कररूपाने मिळणा-या उत्पन्नाचा आकडा अत्यंत कमी. - अरूण जेटली
12:29 (IST) 1 Feb 2017
काले धन को भी बदनला पडा आज अपना रंग.. जेटलींची नोटाबंदीवर कविता.
12:27 (IST) 1 Feb 2017
पासपोर्ट आता मुख्य पोस्ट कार्यालयातही मिळणार. - अरूण जेटली
12:26 (IST) 1 Feb 2017
घोटाळे करून परदेशी पळालेल्यांसाठी नवा कायदा आणणार.
12:24 (IST) 1 Feb 2017
वैद्यकीय आणि आयआयटीच्या प्रवेश परीक्षांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणार. - अरूण जेटली
12:24 (IST) 1 Feb 2017
भीम अॅपच्या माद्यमातून कॅशलेस व्यवहारांची सुविधा, तसंच व्यापाऱ्यांसाठी कॅशबॅकची योजना. - अरुण जेटली
12:22 (IST) 1 Feb 2017
संरक्षण क्षेत्रासाठी २ लाख ७४ हजार कोटींची तरतूद. - अरुण जेटली
12:19 (IST) 1 Feb 2017
पुढील ५ वर्षासाठी रेल्वेच्या सुरक्षेसाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद. - अरूण जेटली
12:14 (IST) 1 Feb 2017
२०१९ पर्यंत रेल्वेतली सर्व शौचालयांचं रूपांतर बायोटॉयलेटमध्ये करण्यात येणार. - अरूण जेटली
12:13 (IST) 1 Feb 2017
अधारकार्डद्वारे आता खरेदी शक्य होणार. आधार कार्डाचा डेबिट कार्डप्रमाणे वापर करता येणार. - अरूण जेटली
12:08 (IST) 1 Feb 2017
वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी २५००० नवीन जागा. - अरूण जेटली
12:08 (IST) 1 Feb 2017
झारखंड आणि गुजरातमध्ये नवीन मेडिकल सेंटर्सची उभारणी केली जाणार. - अरूण जेटली
12:07 (IST) 1 Feb 2017
नवीन मेट्रो रेल धोरणामुळे युवकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. - अरूण जेटली
12:05 (IST) 1 Feb 2017
देशातील ७ हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार. - अरूण जेटली
12:04 (IST) 1 Feb 2017
देशात ३५०० किलोमीटर लांबीच्या नवीन लोहमार्गाची बांधणी करण्यात येणार. - अरूण जेटली
12:02 (IST) 1 Feb 2017
पीपीपी मॉडेलद्वारे छोट्या शहरांमध्ये विमानतळांची उभारणारणी करण्यात येणार. - अरूण जेटली
12:00 (IST) 1 Feb 2017
माध्यमिक शिक्षणासाठी कल्पकता निधी उभारणार आणि भारतभरात एकूण १०० स्किल सेंटर्सची निर्मिती करणार. - अरूण जेटली
11:58 (IST) 1 Feb 2017
रेल्वेचे ई-तिकिट खरेदी केल्यास सर्व्हिस चार्ज लागणार नाही. - अरूण जेटली
11:57 (IST) 1 Feb 2017
गर्भवती महिलांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार. - अरूण जेटली
11:56 (IST) 1 Feb 2017
तिर्थक्षेत्रे आणि पर्यटन यांच्यासाठी रेल्वेची स्वतंत्र योजना. - अरूण जेटली
11:55 (IST) 1 Feb 2017
ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारावर आधारीत हेल्थ कार्ड देणार. - अरूण जेटली
11:51 (IST) 1 Feb 2017
आगामी वर्षात रेल्वेसाठी १ लाख ३१ हजार कोटींची तरतूद. - अरूण जेटली
11:49 (IST) 1 Feb 2017
२०२५ पर्यंत देशातून टीबी रोगाचा पूर्णपणे नायनाट करू. - अरूण जेटली
11:48 (IST) 1 Feb 2017
ठिबक सिंचनासाठी अतिरिक्त ५००० कोटींची तरतूद - अरूण जेटली
11:47 (IST) 1 Feb 2017
मनरेगातून ५५ टक्के महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार. - अरूण जेटली