देशातील पहिली सबकुछ महिला बॅंक येत्या वर्षांत सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यासाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
येत्या ऑक्टोबरमध्ये ही बॅंक कार्यान्वित होईल, असे चिदंबरम यांनी सांगितले ते म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रातील सबकुछ महिला असलेली ही पहिली बॅंक असेल. बॅंक सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यक परवाने मिळाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ती सुरू होईल. या बॅंकेच्या माध्यमातून प्राधान्याने महिलांनाच आर्थिक सहाय्य करण्यात येईल. महिला बचत गटांसाठीही ही बॅंक आर्थिक सहाय्य करेल. बॅंकेमध्ये प्राधान्याने महिलांनाचा रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
लोकसभेतील महिला खासदारांनी बाके वाजवून चिदंबरम यांच्या घोषणेचे स्वागत केले.