रोजच्या जगण्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असतानाही बोजड भाषेमुळे सर्वसामान्य माणसाचे अर्थसंकल्पाकडे सहसा दुर्लक्ष होते. त्यामुळे थोड्याच वेळात सादर होत असलेला केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या भाषेत उलगडण्याचा ‘लोकसत्ता’चा प्रयत्न आहे.  पायाभूत क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक दातार, भाजपचे अभ्यासू आमदार देवेंद्र फडणवीस, करविषयक सल्लागार तज्ज्ञ अमित भिडे, शेअर बाजार विश्लेषक अजय वाळिंबे आणि उद्योग/बांधकाम क्षेत्रातील अभ्यासक मोहन देशमुख या मान्यवरांची ‘टीम’ अर्थसंकल्पाचे विश्लेषण करेल. याशिवाय, वाय. एम. देवस्थळी, शरद जोशी, डॉ. रूपा रेगे-नित्सुरे, अरुण फिरोदिया, माधव गाडगीळ, डी. एस. कुलकर्णी, विनय फडणीस, कॉ. अजित अभ्यंकर, दीपक घैसास, प्रदीप आपटे, संदेश किरकिरे, कौस्तुभ विकास आमटे, खासदार राजू शेट्टी,  अजित रानडे, अमर अंबानी अशा विविध क्षेत्रांतील ख्यातनाम मान्यवर अर्थसंकल्पावर अभ्यासू विवेचन करतील.
लोकसत्ता लाइव्ह
केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण
थेट प्रक्षेपण : सकाळी अकरा वाजल्यापासून http://www.youtube.com/Loksatt  आणि indianexpress-loksatta.go-vip.net
‘लाइव्ह ब्लॉग’ : indianexpress-loksatta.go-vip.net
लाइव्ह अपडेट : http://www.twitter.com/LoksattaLive आणि  http://www.facebook.com/
LoksattaLive