कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील पीएच.डी. प्रवेश पात्रता परीक्षा येत्या ३१ जुलैला आहे. २०१६-१७ करता विद्यापीठाच्या संस्कृत भाषा तसेच साहित्य, पाली, शिक्षण, योग्य, ज्योतिष, संस्कृत व्याकरण, वेद, कीर्तन, फाईन आर्टस् आणि दर्शन या विषयांमध्ये पीएच.डी. पदवीला प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश पात्रता परीक्षा रविवार, ३१ जुलैला आहे. पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, नागपूर सुधार प्रन्यास संकूल, मोरभवन बस स्टँडच्या बाजूला, सीताबर्डी या केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येईल. पीएच.डी. प्रवेश पात्रता परीक्षेसाठी आवेदनपत्र कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, परीक्षा विभाग, कस्तुरबा भवन, बजानगर येथे उपलब्ध आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ जून राहील.