कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर जे. जे. कला महाविद्यालयामध्ये, इंटेरिअर डेकोरेशन विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘रेस्टोरंट’ हा विषय डिझाइन विथ ब्रिक या संकल्पनेवर आधारित आहे. या विषयाचे तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे मास्टर ऑफ ब्रिक ‘लॉरी बेकर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी लक्षणीय प्रतिसाद दिला.

आधुनिक तंत्रज्ञान व पिढी, सामाजिक अर्थव्यवस्था, आíकटेक्ट लॉरी बेकर व त्यांचा जीवनप्रवास या वेळी विद्यार्थ्यांना त्यांच्याच मुखातून ऐकता आला. त्याबरोबर त्यांच्या दक्षिण भारतातील विशिष्ट शैलीमध्ये बांधलेल्या वास्तू अशा विविध विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला. या व्याख्यानाला महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सर्व विभागातील शिक्षक तसेच माजी विद्यार्थी यांनी आवर्जून उपस्थिती लावली.