संत झेव्हियर्स महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ मुंबईतील महाविद्यालयांमधील सर्वात जुने मराठी भाषेसाठी काम करणारे मंडळ म्हणून ओळखले जाते. मंडळाला ९३ वर्षांची मराठी संस्कृती जोपासण्याची परंपरा लाभली आहे. मराठी वाङ्मय मंडळातर्फे दर महिन्यात काहीना काही उपक्रम महाविद्यालयात राबवण्यात येतात. मंडळाचा वार्षिक महोत्सव ‘आमोद’ या वर्षीदेखील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘आमोद’ या महोत्सवात लोकनृत्य स्पर्धा, कार्टून फॅक्टरी, काव्य नाटुकली, चार ओळींची गोष्ट इत्यादी स्पर्धा पार पडणार आहेत. हा महोत्सव १९ ते २१ जानेवारी या कालावधीत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.