नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘सेंटर फॉर एअर अ‍ॅण्ड स्पेस लॉ’ मधील उपलब्ध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
अभ्यासक्रमांचा तपशील
० एव्हिएशन लॉ अ‍ॅण्ड एअर ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी. (कालावधी- दोन वर्षे)
०  स्पेस अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन विषयातील पदव्युत्तर पदवी.(कालावधी- दोन वर्षे)
०  एव्हिएशन लॉ अ‍ॅण्ड एअर ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम. (कालावधी- एक वर्ष)
०  जीआयएस अ‍ॅण्ड रिमोट सेंन्सिग लॉ विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम. (कालावधी- एक वर्ष)
शैक्षणिक अर्हता – अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी अथवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंगमधील पदविका अथवा इंजिनीअरिंगमधील पदवी प्राप्त केलेली असावी.
निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षा, समूह चर्चा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क – अर्जदारांनी अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून हैदराबाद येथे देय असलेला एक हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट ‘रजिस्ट्रार, नालसार- सीएएसएल ए/सी’ यांच्या नावे  पाठवणे आवश्यक आहे.
अधिक महिती – अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या http://www.nalsar.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याची मुदत – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले, आवश्यक तो तपशील, कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, जस्टीस सिटी, शमीरपेठ, आर. आर. डिस्ट्रिक्ट, हैदराबाद- ५००१०१ या पत्त्यावर १५ मे २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.