‘वर्षभर केवढा अभ्यास केला, आता विश्रांती घेऊ या,’ असं म्हणून आपण सुटीत काही न करण्याचं समर्थन करतो खरं; पण त्यासोबत आपण निवडीचे पर्यायही संपवत असतो..  आपल्याला सुटीकडून काय हवंय, अनुभव की आळस, ते ठरवायला हवं. रुटीनमध्ये करता न येण्याजोगं काहीतरी नवं करण्यासाठी सुटी ही चांगली संधी असते.
सुट्टय़ांचे दिवस सुरू झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. विद्यापीठीय परीक्षा लवकरच संपतील. विद्यार्थ्यांना चक्रातून सुटल्यासारखं वाटत असेल. मोठी सुट्टी समोर आहे. वर्षभर किंवा शेवटचे दोन महिने फक्त अभ्यास आणि अभ्यास केला, आता फक्त धमाल. टीव्ही, सिनेमा, चॅटिंग, व्हॉट्सअॅप, हॉटेिलग, जे आवडेल ते करायचं, या मूडमध्ये सगळे असतील. ते तर करायचंच असतं, पण ते अगदीच नॉर्मल आणि नेहमीचं झालं. वेगळं काय करता येईल सुट्टीत? मजा करता-करताही या सुट्टीला एक ‘संधी’ म्हणून वापरता येतं का? ते पाहायला हवं. सिनेमा, हॉटेिलग, मॉल्स, फार तर एखादी सहल एवढीच मजा आपल्याला माहीत असते. यावेळी त्यात काही बदल करता येईल का, ते तपासायला हवं.
एखादा टप्पा पुरा करताना थोडं मागे वळून पाहिलं तर बरंच काही मिळालेलं जाणवतं. टीव्हीवरची एक संगीत स्पर्धा आठवते. छोटय़ा स्पर्धकांच्या गाण्यानं अनपेक्षित अशी जबरदस्त उंची गाठली होती, मुलं गाजत होती. त्या वेळी उपउपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या सात गायकांची मुलाखत एका कार्यक्रमात पाहिली होती. संवादकांनी मुलांना काही प्रश्न विचारले, ‘आज तुम्ही एक जागतिक पातळी गाठलीय. न भूतो न भविष्यती अशी प्रसिद्धी मिळवलीत. आता तुम्हाला या स्पध्रेतून काय मिळालं असं वाटतं? तुमच्यातला कोणीतरी एकच जण पहिला येणार आहे. त्या तुमच्यातल्या स्पध्रेबद्दल काय वाटतं? तुमच्या गाण्याबद्दल काय वाटतं? आणखी दहा वर्षांनी तुम्ही स्वत:ला कुठे पाहता?’
मुलांनी दिलेली उत्तरंदेखील अतिशय प्रगल्भ होती.
‘एरवी जेवढं गाणं शिकायला आम्हाला तीन-चार र्वष लागली असती, तेवढं गाणं आम्ही या स्पध्रेच्या निमित्तानं सहा महिन्यांत केलं. आपल्या तोडीस तोड स्पर्धकांसोबत कमी पडायचं नाही या प्रेरणेतून जो फोकस मिळाला तो आता आमच्यासोबत कायम असणार.’
‘दहा वर्षांनंतर नक्की कुठं असू ते सांगता येणार नाही. पण रस्ता स्पष्ट आहे. प्रयत्न केल्यावर सहा महिन्यांत आपण एवढे वाढू शकतो हे आता कळलंय. पुढच्या पाच-सहा वर्षांत शास्त्रीय संगीताच्या स्वतंत्र मफिली करता येण्याएवढं गाणं वाढायला हवं.’
‘शास्त्रीय संगीताचा रियाज चालू राहीलच, पण मला पॉप संगीत समजून घेण्यासाठीदेखील एक-दोन र्वष द्यायची आहेत.’
खरं तर स्पर्धा शेवटच्या टप्प्यात होती. पण स्पध्रेकडे शिकण्याचं माध्यम म्हणून पाहिल्याबरोबर स्पध्रेला एकदम वेगळं परिमाण मिळालं. या स्पर्धकांना या स्पध्रेनं दिलेल्या प्रसिद्धी आणि बक्षिसांपेक्षाही महत्त्वाचं असं काहीतरी आयुष्यभरासाठी दिलं. स्वत:च्या क्षमतेची स्पष्ट जाणीव, वेळेची किंमत, फोकस केल्यानंतर शिकण्याला आलेला वेग आणि दिशा हे तर होतंच, शिवाय तुल्यबल स्पर्धकांच्या सोबतीमुळे आपण आणखी लवकर वाढलो, हे भान दिलं. या गोष्टी एरवी एवढय़ा खोलवर कळल्या नसत्या. त्या प्रसंगातून त्या मुलांनी जे घेतलं, ती नजर आपापल्या वाढण्याच्या संदर्भात आपण घेऊ शकतो का? अभ्यासापलीकडच्या आपल्या पॅशनला न्याय देऊ शकतो का, हे पाहायला हवं.
दहावीची परीक्षा दिलेल्यांसाठी तर ही सुट्टी म्हणजे पर्वणीच. एवढी मोकळी आणि मोठी सुट्टी पुढे कधीच मिळत नाही. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘वाय डी’ झाल्यामुळे सक्तीची सुट्टी मिळाली असेल, त्याचा मनस्ताप होत असेल त्यामुळे मजा करता येत नसेल. काहींना चालू नोकरीत, कामात काही कारणानं ब्रेक मिळाला असेल, तेही अस्वस्थ असू शकतात. तरीही एक खरं, की ही सुट्टी आपल्याला काही देणार आहे? की आपल्या आयुष्याला कंटाळवाणं करणार आहे? ते तिच्याकडे पाहण्याचा आपला अॅप्रोचच ठरवतो. सक्तीची असो की आनंदाची, ही सुट्टी वेगळं काहीतरी मिळवण्यासाठी वापरता येऊ शकते. जे घडलंय ते असंही आता ४ल्ल िहोणार नसतं, किंवाीि’ी३ी ही होणार नसतं. मग काय करणं शक्य असतं? तर वस्तुस्थिती स्वीकारणं. ती स्वीकारली की, आपल्या मनातली बोच काढली की कुठलीही सुट्टी मजेची करता येते.
उत्तीर्ण होऊन किंवा नोकरी चालू राहून पुढच्या वर्षांच्या रहाटगाडग्यात अडकणं हे तर अपेक्षित होतं. त्याऐवजी अनपेक्षितपणे थोडा वेळ मिळालाय, तो दु:खात, चिडचिडीत काढण्याऐवजी एक फ्रेश करणारा बदल म्हणूनही त्याकडे पाहता येऊ शकतं. एरवी ज्यासाठी वेळ मिळत नव्हता अशा छंदांसाठी यातला काही वेळ वापरता येऊ शकतो. उद्या कुठेही गेलो किंवा काहीही केलं तरी उपयोगी पडू शकणारी ‘जीवनकौशल्ये’ मिळवणं तर अगदीच शक्य आहे. तर मग कशासाठी वापरणार आहोत आपण हे दोन, तीन, सहा किंवा १२ महिने?
 हा वेळ किती महत्त्वाचा आणि कशासाठी?
हा वेळ वापरला पाहिजे तो वेगवेगळे अनुभव मिळवण्यासाठी. दोन-तीन र्वष लागली असती ते सहा महिन्यांतही आपण मिळवू शकतो हे भान घ्यायचं. भटकंती, प्रवास, टेकडीवर रोज फिरायला जाणं, ट्रेकिंग या गोष्टी अवश्य करायच्या. निसर्गाच्या जवळ जाण्यात एक वेगळा आनंद असतो. फोटोग्राफी, गाणं, नाच, चित्रं काढणं, पोहणं अशा कला-कौशल्यांमध्ये ज्यांना रस आहे, त्यांनी त्या त्या गोष्टीला सुरुवात केलीच असेल. कौशल्यं आत्मविश्वास देतात आणि आयुष्यभर कधीही कुठेही उपयोगी पडतात. अॅपलचे स्टीव्ह जॉब्ज यांना त्यांच्या कॅलिग्राफीच्या कौशल्यानं हात दिला होता, हे तर सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिकलेली कुठलेली गोष्ट लहान आहे की मोठी आहे, ते त्या गोष्टीवर नसतंच. आपल्या विचारांवर आणि तिचा उपयोग करण्याच्या क्षमतेवर असतं. कौशल्य मिळवण्यासाठी.
वेगानं पुढे जाण्यासाठी फोकस लागतो. शिकण्यासाठी जाणीवपूर्वक दिलेला विशिष्ट काळ आणि त्यापुढे एक परीक्षा असं असेल तर तो फोकस लवकर येतो. नुसतंच पोहायचं, नुसतंच चित्रं काढत बसायचं यातूनही आपण पुढे जातोच, पण ते गांभीर्य येत नाही. त्यासाठी पुढे जाण्याचा एक टप्पा देणारा कोर्स घ्यायचा आणि त्या अभ्यासक्रमासोबत राहून जोडीला आपल्याला वाटेल ते करायचं. कोर्सच्या शेवटी परीक्षा असेल तर आपण किती पुढे आलो आहोत ते मोजता येतं. ‘नुकतीच अभ्यासाची परीक्षा दिलीय, आता पुन्हा परीक्षा नको’ असा एक सूर मनातून नक्की उमटेल, पण त्याकडेही वेगळ्या नजरेनं पाहायला हवं. परीक्षेतले मार्क किंवा सर्टििफकेट्स महत्त्वाची नसतात, तर त्यासाठी केलेली मनापासूनची तयारी आपल्याला पुढे नेते, हे लक्षात आलं की, परीक्षा मैत्रीण बनू शकते. परीक्षा हे साध्य नसतं, तर साधन असतं. हे स्पष्ट असेल तर ती नकोशी होत नाही. एखाद्या  विषयासाठी असा बांधलेला कोर्स उपलब्ध नसेल तरीही एवढय़ा वेळात अमुक एवढं मिळवायचंच असं लक्ष्य समोर ठेवायचं.
संधी घेणं महत्त्वाचं
निवांतपणे सुट्टी घालवणं हा अनेकदा कम्फर्ट झोन असतो. ‘मी अमुकतमुक करायचं ठरवलंय’ असं आपण अनेकदा सुट्टी संपेपर्यंत घोकत राहतो. कारण बाहेर पडून चार ठिकाणी चौकशा करण्याचा कंटाळा येतो. पटकन पुढे व्हायला नको वाटतं. खरं तर सुट्टीत वेगवेगळ्या प्रकारची कामं करून पाहण्यातून जगाचा अनुभव येतो. त्याकडे संधी म्हणूनच पाहिलं पाहिजे. फक्त पॉकेटमनी मिळवण्यासाठी काम केलं तरीही अनुभव मिळतो, पण मजा येईलच याची खात्री नसते. डोक्यात कायम पशांची आकडेमोड चालू असते. शिकण्यासाठी काम करताना मात्र मजा नक्की येते, कारण तेव्हा तुमचा मेंदू नुसती आकडेमोड करीत नाही, तर प्रत्येक अनुभवातून तुम्ही काहीतरी उचलत जाता.  
गाण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांचं उदाहरण पुन्हा एकदा घेऊ या. भारतातल्या प्रत्येक चांगलं गाणाऱ्या मुलासाठी अशा स्पर्धामार्फत संधी उपलब्ध असते. समोर आलेली संधी ओळखून आपण किती पटकन ती उचलू शकतो यावर पुढचं बरंच काही ठरतं. मनातल्या ‘जमेल ना?’वर मात करून धाडसानं पुढे होऊन नाव नोंदवणं ही पहिली पायरी स्पर्धकांनी ओलांडली नसती तर पुढचं काहीच घडलं नसतं. हे समजून घेणं आणि आपल्या पातळीवर आपल्याला थांबवणाऱ्या मर्यादांमधून बाहेर पडण्यासाठी संधी शोधलीच पाहिजे.
एखाद्या प्रदर्शनात आठ-दहा दिवसांसाठी काऊंटर विक्रेत्याचं काम केलं तरीही अनेक जीवनकौशल्यं हातात येऊ शकतात. अनोळखी माणसांशी बोलण्याची भीड चेपते. दोन दिवसांत बोलण्यात स्पष्टता आणि नेमकेपणा येतो. माणसांचे खूप नमुने बघायला मिळतात, त्यांची गरज ओळखता यायला लागते, सर्व प्रकारच्या माणसांशी वागता येणं जमायला लागतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं फोकस धरून विक्री वाढवणं नुसतं जमत नाही, अंगवळणी पडतं. अशा कामातून मिळालेल्या आíथक लाभापेक्षाही या गोष्टी ‘जीवनकौशल्यं’ आहेत. गरजेपुरता चांगला स्वयंपाक करायला शिकणं हीसुद्धा सुट्टीनं दिलेली अतिशय उपयुक्त मिळकत असू शकते. मिळालेल्या प्रत्येक सुट्टीत नवीन काहीतरी शिकलं तर आपल्याकडे निवड करण्याची क्षमता आपोआप चालत येते. पुढे निर्णय घेण्यातही या ‘फर्स्ट हॅण्ड एक्पिरिअन्स’चा उपयोग होतो.
तर मग आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत. रुटीनमध्ये न मिळणारं काहीतरी सुरू करून टाकायचं, अनेक अनुभवांनी समृद्ध व्हायचं किंवा टीव्ही, सिनेमे पाहत, उनाडत सुट्टी संपवून टाकायची. केवढा अभ्यास केला दोन महिने, आता विश्रांती घेऊ दे, असं म्हणून आपण स्वत:ला जस्टिफाय करतो खरं, पण त्यासोबत आपण निवडीचे जवळजवळ सगळे पर्याय संपवत असतो आणि आनंदाच्या नावाखाली निवड कशाची करीत असतो कळतंय ना, बौद्धिक आळसाची. आता आपण ठरवायचं सुट्टीकडून आपल्याला काय हवंय,
अनुभव की आळस?                                                                     
http://www.neelimakirane.com