आजचे जग आंतरशाखीय अभ्यासाचे आहे. एका विषयातील सखोल ज्ञान ही मूलभूत गरज असली तरी आजच्या जगात इतर विषयांचे ज्ञान किंवा आणखी एका विषयातील निपुणता ही गरज आहे. बौद्धविद्या (बुद्धिस्ट स्टडीज) हा एम. ए.चा अभ्यासक्रम याच विचारातून झाला. आज देशात दिल्ली विद्यापीठ, जम्मू विद्यापीठ, मगध विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ अशा मोजक्याच विद्यापीठांत हा अभ्यासक्रम शिकवला जातो. गेल्या वर्षीपासून मुंबई विद्यापीठानेही हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी बौद्ध तत्त्वज्ञान मांडले. त्यात नागार्जुन, दिङ्नाग, असंग, वसूबंधू, धर्मकीर्ती अशा अनेक तत्त्वज्ञांनी योगदान देऊन ते भरभराटीला आणले. सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन अशा अनेक भारतीय राजांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. त्याचा आवाका वाढत जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार भारतातच नव्हे, तर आशिया खंडातील इतर देशांतही मोठय़ा प्रमाणावर झाला. जपान, चीन, तिबेट, कोरिया, मंगोलिया, भूतान, श्रीलंका, बर्मा, थायलंड यांसारख्या देशांत बौद्ध हा एक प्रमुख धर्म आहे. भारताच्या या देशांशी असलेल्या राजकीय आणि आíथक संबंधात आजही बौद्ध धर्म हे एक महत्त्वाचे सूत्र आहे.
बुद्धविद्य्ोच्या या अभ्यासक्रमाचा साचा हा धर्म आणि तत्त्वज्ञान यांचे अध्ययन इतका मर्यादित नसून सांस्कृतिक अध्ययन या व्यापक स्वरूपाचा आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय संस्कृती या अभ्यास मंडळाने या गोष्टींचा विचार करूनच धर्म- तत्त्वज्ञानाबरोबर कला, स्थापत्य, व्यापार, इतिहास, पाली, तिबेटी व बौद्ध- संस्कृत अशा भाषा, बौद्ध धर्माचा जगातील सामाजिक व राजकीय प्रभाव, भारताचे इतर देशांशी असलेले आíथक व राजकीय संबंध आणि बौद्ध धर्माचे त्यातील योगदान, बौद्ध धर्माचा आशिया खंडातील प्रसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे समकालीन जगातील इतर देशांतील समाजप्रबोधक आणि बौद्ध धर्म अशा अनेक पलूंचा या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.
हा संपूर्ण अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या इतर एम. ए.च्या अभ्यासक्रमांसारखाच दोन वर्षांचा (चार सत्रे) आहे. प्रत्येक सत्रात चार अशा एकूण १६ विविध विषयांचा यात समावेश होतो. कोणत्याही शाखेचा पदवीधर हा अभ्यासक्रम करू शकतो.
आज जगात बौद्ध धर्मावर तसेच बौद्धांच्या प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांवर फार मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू आहे. बौद्धांची पाली, तिबेटी, बौद्ध-संस्कृत, चिनी अशा अनेक भाषांतील हस्तलिखिते आज संशोधकांची प्रतीक्षा करत आहेत. बौद्ध कला, मूर्तीशास्त्र, तत्त्वज्ञान, बौद्ध संस्कृतीचा इतिहास अशा अनेक विषयांवर आज संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत. या संशोधनासाठी फार मोठय़ा प्रमाणावर अर्थसाहाय्यही उपलब्ध आहे. पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय संबंधांसारख्या बहुआयामी विषयांच्या अध्ययनात आज बौद्धविद्य्ोच्या अभ्यासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळाची पावले ओळखून केंद्र तसेच राज्य   पर्यटन खात्याने बौद्ध-पर्यटनावर (Buddhist Tourism) लक्ष केंद्रित केले आहे. पर्यटन क्षेत्रातही आज बौद्धविद्य्ोच्या अभ्यासकाला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. इतर विषयांतील पदव्युत्तर पदवीधरांप्रमाणेच शिक्षणक्षेत्राबरोबरच वस्तुसंग्रहालयांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
प्रवेशप्रक्रिया
हा अभ्यासक्रम विलेपाल्रे (पूर्व) येथील साठय़े महाविद्यालयात आयोजित केला जातो.
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर.
व्याख्यानाच्या वेळा : गुरुवार सायं. ६ ते ८, शुक्रवार सायं. ४ ते ८, शनिवार दु. २ ते रात्री ८, रविवार सकाळी १० ते २.
अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती :  http://www.sathayecollege.com/PG.html
संपर्क: sathayecollege@gmail.com,
हर्षदा दिवेकर – ९८३३९१८८८१ 

Growing digital divide in education
शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान