careermantraमी इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. मला इतिहास हा विषय खूप आवडतो. तसेच मला चारचाकी वाहनांचीही आवड आहे. या दोन्ही विषयांतील अभ्यासक्रम आणि देश-विदेशातील करिअर संधींविषयी माहिती द्याल का?
    – सिद्धराज गंगावणे
इतिहास आणि गाडय़ांची आवड हे दोन वेगवेगळे विषय आहेत. एकाच वेळी दोन्ही विषयांत करिअर करणे शक्य होत नाही. शिवाय सध्या तू दहावीमध्ये शिकत आहेस, त्यामुळे आधी बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. इतिहास विषयात करिअर करायचे असल्यास अकरावीला कला शाखेत प्रवेश घ्यावा लागेल. पुढे इतिहास विषयात बीए, एमए, पीएच.डी करणे सोयीचे होईल. गाडय़ांच्या विषयात करिअर करायचे असल्यास अकरावीला गणित विषयासह विज्ञान शाखा निवडावी लागेल. बारावीनंतर ऑटोमोबाइल इंजिनीअिरग अभ्यासक्रम करता येऊ शकतो.

मी सध्या बारावीत आहे. मला बीव्हीएसस्सी- पशुवैद्यक शास्त्रात शिकायचे आहे. या विषयातील संधी आणि प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती द्यावी.
    – अमित काटे
पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधरांना करिअरच्या उत्तम संधी मिळतात. राज्य सरकारच्या पशुवैद्यक दवाखान्यांमध्ये नोकरी मिळू शकते. खासगीरीत्याही व्यवसाय करता येऊ शकतो. पाळीव प्राण्यांच्या देखभाल-तंदुरुस्तीकडे लोक काटेकोरपणे लक्ष देतात. त्यामुळे चांगल्या पशुवैद्यकांना उत्तम करिअर करता येऊ शकते. पशुवैद्यक राज्य सेवा परीक्षा आणि केंद्रीय नागरी सेवांद्वारे अनुक्रमे राज्य आणि केंद सरकारी प्रशासकीय नोकऱ्या मिळू शकतात. कृषी प्रकिया उद्योग, मोठे दुग्धप्रकिया उद्योग आदी क्षेत्रांतही संधी मिळू शकते.
राज्यात पाच वर्षांचा पशुवैद्यक अभ्यासक्रम कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डॉक्टर पदवी मिळते. यात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि पीएच.डी. अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. बारावी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘सीईटी’मार्फत प्रवेश दिला जातो.
 
मी बारावी विज्ञान शाखेत शिकत असून अंतराळ विषयातील अभ्यासक्रम शिकवणाऱ्या देशातील महत्त्वाच्या संस्थांची आणि तिथल्या प्रवेशप्रकियांची माहिती हवी आहे. एरोनॉटिक्स, एरोस्पेस आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये नेमका काय फरक असतो?
    – रेवती मुथा
आपल्या देशात थिरुवनंतपुरम येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेत बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोस्पेस इंजिनीअिरग या अभ्यासक्रमात अवकाशयान निर्मिती, अवकाश अंतराळात धाडण्यासाठी लागणारी वाहनांची निर्मिती, स्पेसक्राफ्ट, उड्डाण तंत्र आदी  विषय शिकवले जातात. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एविऑनिक्स या अभ्यासक्रमात इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग या विषयाशी निगडित नियंत्रण पद्धती, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सिस्टीम यांसारखे विषय शिकवले जातात. अंतराळ वाहन प्रक्रिया, उपग्रह निर्मिती प्रक्रियेवर भर देण्यात येतो. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फिजिकल सायन्स या अभ्यासक्रमात अंतराळ संशोधनाला विशेष प्राधान्य दिले जाते. अंतराळ तंत्रज्ञान आणि अवकाशास्त्राशी निगडित अप्लाइड मॅथेमॅटिक्स, क्लासिकल आणि मॉडर्न फिजिक्स, रिमोट सेिन्सग यासारखे विषय शिकवले जातात. पत्ता- द चेअरमन, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरम- ६९५५४७, केरळ.  वेबसाइट- http://www.iist.ac.in/admission/under-graduate
आयआयटीमध्ये एरोस्पेस इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स्ड’ ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
एरोनॉटिक्स या शास्त्रात आकाशात उडू शकणाऱ्या यंत्रांचा (विमाने/ हेलिकॉप्टर) अभ्यास, डिझाइन, निर्मिती आणि अशा यंत्रांच्या अंतराळातील उड्डाण तंत्रांचा समावेश होतो. पृथ्वीच्या वातावरणात आणि पृथ्वीबाहेरच्या वातावरणात उडू शकणाऱ्या विमान आणि अवकाश यानांचे तंत्र, कौशल्य, निर्मितीशास्त्र एरोस्पेस या विषयात शिकवले जाते. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स ही अ‍ॅस्ट्रोनॉमी या विषयाची शाखा असून यामध्ये अवकाशातील विविध घटकांच्या गुणधर्माचा अभ्यास केला जातो.

मी सध्या बीएस्सी तृतीय वर्षांत शिकत असून मला ‘एथिकल हॅकिंग’मध्ये करिअर करायचे आहे.
    – चतन्य पंचमहालकर
जीवनाच्या सर्व क्षेत्रांत संगणकाचा वापर मोठय़ा प्रमाणावर  वाढला आहे. त्याचबरोबर संगणकीय माहितीप्रणाली विस्कटून टाकण्याचे, बिघडवून टाकण्याचे प्रमाणही वाढत आहे. ही एक प्रकारची बौद्धिक डाकूगिरीच आहे. या अपप्रकाराला शह देण्यासाठी या क्षेत्रातील बुद्धिमान तज्ज्ञांची गरज वाढत आहे. साधारणत: या विषयामध्ये संगणकाची सुरक्षितता, नेटवìकगची सुरक्षितता, ई-मेल सुरक्षितता, पोर्ट स्कॅिनग सिक्युरिटी, इंटलेक्चुएल प्रॉपर्टी सिक्युरिटी, पासवर्ड क्रॅकिंग, सायबर लॉ, बँक लॉगिन हॅकिंग यांसारख्या विषयांचा समावेश होतो. अशा तज्ज्ञांची गरज आगामी काळात वाढणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे या विषयात करिअर करता येणे शक्य आहे. या विषयाशी निगडित काही अभ्यासक्रम-  
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ.
* मास्टर ऑफ सायन्स इन सायबर लॉ अँड इन्फम्रेशन सिक्युरिटी- पत्ता- नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सिटी भोपाळ आणि राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय, केरवा डॅम रोड, भोपाळ-४६२०४४.
 वेबसाइट- http://www.nliu.ac.in)   * मास्टर ऑफ सायन्स इन सायबर लॉज अँड इन्फम्रेशन सिक्युरिटी- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, देवघाट, अलाहाबाद- २११०१२.
मेल-anurika@iiita.ac.in  वेबसाइट- http://www.iiita.ac.in
* सायबर लॉज अँड इंटलेक्चुएल प्रॉपर्टी राइटस्- असिस्टंट रजिस्ट्रार, सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन, युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद, गोल्डन थ्रीशोल्ड, एबीआयडीएस, नामपल्ली स्टेशन रोड, हैदराबाद- ५००००१. वेबसाइट-www.uohyd.ernet.in  
* सर्टििफकेट कोर्स इन सायबर लॉज. पत्ता- द इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट, भगवानदास रोड, न्यू दिल्ली-११०००१ इमेल-e_cyber@ ildelhi.org  किंवा मेल-ili@ili.ac.in, वेबसाइट- http://www.ildelhi.org
* डिप्लोमा इन सायबर लॉ- शासकीय विधी महाविद्यालय, ए रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०  
ईमेल-  info@asianlaws.org
वेबसाइट- http://www.glc.edu आणि एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ वेबसाइट-www.asianlaws.org अर्ज व माहितीपत्रक वेबसाइटवर आहे.
* एम एस इन सायबर लॉ अँड सिक्युरिटी- नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, बरकतपुरा, हैदराबाद-२७,  
मेल-admission@nalsar.org  वेबसाईट : http://www.nalsar.ac.in  * डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी- गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, सेक्टर-१८, ए, डीएफएस- पोलीस भवन, गांधीनगर.
वेबसाइट- ww.gfsu.edu.in

माझी पुतणी अकरावी विज्ञान शाखेत असून तिला सन्यात करिअर करायचे आहे.
    – संकेत िशगाटे
लष्कराला विविध विषयांचे तज्ज्ञ (अभियंते/ वैमानिक/ विधी/ शिक्षक/ नìसग/ डॉक्टर) यांची गरज भासते. त्यासाठी ‘शॉर्ट सíव्हस कमिशन’द्वारे महिलांची भरती केली जाते. मात्र, त्यासाठी संबंधित विषयातील पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. यांत पुढील संधी मिळू शकतात-
* शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन अतांत्रिक (महिला )- दर वर्षी दोनदा १७५ जागा भरल्या जातात.  अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.  * शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन (महिला ) तांत्रिक- वर्षांतून दोनदा जाहिरात दिली जाते.  अर्हता- संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी.  * एनसीसी स्पेशल एन्ट्री (महिला)- अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी आणि ५० टक्के गुणांसह एलएलबी किंवा एलएलएम, एनसीसी सीनियर डिव्हिजन आर्मीमधील दोन वर्षांची सेवा आणि ‘सी’ सर्टििफकेट परीक्षेमध्ये किमान ‘बी’ ग्रेड.  *  युनिव्हर्सटिी एन्ट्री स्कीम- प्रत्येक अभ्यासक्रमाला एकूण ६० तरुणींना प्रवेश दिला जातो. अर्हता- अभियांत्रिकीच्या अंतिम आणि तिसऱ्या वर्षांला असणाऱ्या विद्यार्थिनी.  
संपर्क : *  अ‍ॅडमिशनल डायरेक्टर जनरल ऑफ रिक्रुटिंग, आरटीजी- ६/ एजी ब्रँच वेस्ट ब्लॉक- ३, आर के पुरम, न्यू दिल्ली- ११००६६              
* ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स/अदर रँक्स एन्ट्री ६ ऑफिसर्स एन्ट्री. ईमेल- dircoodimail@gmail.com

मी बीएस्सी केले आहे. मला कायद्याचे शिक्षण घेऊन बॅरिस्टर व्हायचे आहे.  
    – प्रमोद कुलट
याकरता तीन वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा. एलएलबी केल्यानंतर वकिलीचा व्यवसाय करता येतो. काही वर्षांच्या अनुभवानंतर उच्च न्यायालयात अधिक उत्तम संधी मिळू शकते. ‘एलएलबी’नंतर एक वर्ष वा अधिक कालावधीचे स्पेशलायझेशन विषयक अभ्यासक्रमही आता सुरू झाले आहेत. स्पेशलाइज्ड वकील म्हणूनही आता करिअर करता येणे शक्य आहे. राज्य सेवा परीक्षेद्वारे कनिष्ठ न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून संधी मिळू शकते.

मी बीटेक फूड टेक्नालॉजी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मला फूड इन्स्पेक्टर बनायचे आहे. बीटेकनंतर नोकरी कुठे मिळू शकेल?
    – प्रशांत हेंद्रे
आपल्याला रिसर्च सायंटिस्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट, फूड इंजिनीअर्स, ऑर्गनिक केमिस्ट, बायोकेमिस्ट, अ‍ॅनालिटिकल केमिस्ट आदी संधी मिळू शकतात. ही संधी आपल्याला अनेक अन्नपदार्थ बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये मिळू शकते. याशिवाय मोठी कॉर्पोरेट रुग्णालये, अन्न प्रक्रिया संशोधन प्रयोग शाळा, कॅटिरग कंपन्या, मोठी पंचतारांकित हॉटेल्स आणि उपाहारगृहे यातही संधी मिळू शकते. केंद्र सरकारच्या सेवेतही दाखल होता येईल. यासाठी या करिअरमधील संधींचा शोध सातत्याने वृत्तपत्रांमधून आणि ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या द्वारे घ्यावा लागेल.                         
(आपले करिअरविषयीचे प्रश्न career.vruttant@express.com या पत्त्यावर पाठवा.)