मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीएस्सी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांला आहे. कोणत्या विषयावर लक्ष केंद्रित करावे, याबाबत द्विधा मन:स्थितीत आहे. मला पुढे नागरी सेवांमध्ये जायचे आहे. मी काय करू?
– विवेक निमसरकर     
जर तुम्हाला देशाच्या सर्वोच्च नागरी सेवेमध्ये जायचे असल्यास असे गोंधळून कसे चालेल? आपल्या उद्दिष्टांविषयी जर स्पष्टता नसेल तर नागरी सेवाच नव्हे तर जीवनातील इतर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणं कठीण जातं. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय करायचंय हे आधी मनात पक्कं करा. त्यानुसार आपल्या प्रयत्नांची दिशा ठरवा. नागरी सेवा परीक्षांना बसण्यासाठी कोणत्याही विषयातील पदवी ही किमान अर्हता असते. त्यामुळे तुम्ही आपल्या पदवी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करा. ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक असणारे सामान्य अध्ययन, गणित, इंग्रजी भाषा आदी बाबींच्या  अभ्यासाला प्राधान्य द्या.
 
 मी बीएस्सी फिजिक्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांला शिकत आहे. मला एमएस्सी पूर्ण करायचे आहे. एमएस्सी फिजिक्स केलेल्या उमेदवाराला कोणत्या संधी मिळू शकतात? बीएस्सीनंतर एमएस्सी वगळता इतर कुठले अभ्यासक्रम पूर्ण करता येतील का? एमएस्सी कुठल्या विद्यापीठातून करणे उचित ठरेल?
-अनुप गिरम, बार्शी
 उद्योगांमधील नवे तंत्रज्ञान, विकासाच्या पद्धती आणि संशोधनासाठी भौतिकशास्त्रज्ञ कार्य करते. दूरध्वनी, दूरचित्रवाणी, रेडियो तंत्रज्ञान, संदेशवहन भौतिकशास्त्र तज्ज्ञांची गरज भासते. कच्च्या खनिज तेलावरील प्रक्रियांसाठी हे तज्ज्ञ आपली सेवा देतात. भौतिकशास्त्रात सखोल ज्ञान प्राप्त करणाऱ्यांना रिन्यूएबल एनर्जी मॅनेजर, सोलर एनर्जी फिजिसिस्ट, ग्रॅव्हिटी रिसर्चर, साऊंड इंजिनीअिरग, वेदर फोरकास्टर, पार्टकिल फिजिसिस्ट,  अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट, मटेरिएल सायंटिस्ट, पायरोटेक्निशिएन, कटिंग एज टेक्नॉलॉजी, पार्टकिल फिजिसिस्ट, अंतराळवीर, सॅटेलाइट इंजिनीअर, अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट, मेडिकल फिजिसिस्ट, फोरेन्सिक तज्ज्ञ, कोस्टल सायंटिस्ट, आइस सायंटिस्ट, सोलर एनर्जी फिजिसिस्ट, रडार प्रोजेक्ट मॅनेजर, मटेरिअल सायंटिस्ट, लेसर फ्युजन सायंटिस्ट, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आदी विविध वैशिष्टय़पूर्ण क्षेत्रांत करिअर करण्याची संधी मिळू शकते.

मी मेकॅनिकल इंजिनीअिरगच्या पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गाला आहे. मला अर्थशास्त्रात एमए करायचे आहे. मला अर्थशास्त्रात कोणते करिअर करता येईल? अर्थशास्त्रात एमफील, पीएचडी करण्यासाठी काय करावे लागेल? एमए करण्यासाठी पुण्यातील महाविद्यालय सुचवाल का?
    स्वप्निल सोनवलकर, सातारा<br />अर्थशास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना इंडियन इकॉनॉमिक सíव्हस ही परीक्षा देऊन केंद्र सरकारच्या अर्थ विभागात उत्तम दर्जाची नोकरी मिळू शकते. अर्थशास्त्रज्ञांना करिअरच्या पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात- अ‍ॅसेट मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट बँकर, कॉस्ट एस्टिमेटर, इकॉनॉमिस्ट अ‍ॅनालिस्ट, रिडेव्हलपमेंट स्पेश्ॉलिस्ट, पब्लिक युटिलिटिज मॅनेजर, अर्बन प्लॅिनग रिसर्च असिस्टंट, वित्तीय सल्लागार, सिक्युरिटिज अ‍ॅनॅलिस्ट, ऑपरेशन अ‍ॅनॅलिस्ट, बिझनेस अ‍ॅनॅलिस्ट, मॅनेजमेंट कन्सल्टंट, ट्रस्ट ऑफिसर, इक्विटी ट्रेडर, बजेट अ‍ॅनॅलिस्ट, पब्लिक सेक्टर अ‍ॅनॅलिस्ट, ट्रेड पॉलिसी अ‍ॅनॅलिस्ट, रिसर्च असोसिएट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असिस्टंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट को-ऑíडनेटर, रिजनल आणि अर्बन प्लानर, प्रोग्रॅम अ‍ॅनॅलिस्ट, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह अ‍ॅनॅलिस्ट, पॉलिसी को-ऑíडनेटर, रिअल इस्टेट व्हॅल्युएशन असोसिएट, प्रॉपर्टी मॅनेजर, अर्बन प्लॅिनग रिसर्च असिस्टंट, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट रिसर्चर, अ‍ॅक्विझिशन अ‍ॅनॅलिस्ट, अर्थविषयक सल्लागार, फायनान्शिअल प्लानर, स्टॉक ब्रोकर, पॉलिसी अ‍ॅनॅलिस्ट, डेमोग्रॉफर, अर्थपत्रकारिता, संशोधक, संख्या विश्लेषक.
   एम.फिलला प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. पीएच.डी करायची असल्यास आपण पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. पुणे विद्यापीठात वर्षांतून दोनदा पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुढील अर्हता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही- संबंधित विषयातील एम.फील./ सेट/ नेट उत्तीर्ण विद्यार्थी, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, गेट (GATE) मधील सुयोग्य गुण.

मी बारावी पूर्ण केले असून मुंबई विद्यापीठात बीए करत आहे. ‘बीए’नंतर एमबीए करू शकेन का? त्याचा मला करिअरसाठी काय फायदा होईल?
    – दर्शना भाना
 तुम्ही बीएनंतर एमबीए करू शकता. एमबीए प्रवेशासाठी राज्य सरकार सामायिक प्रवेश चाचणी घेते. त्याचबरोबर जीमॅट, मॅट, सीमॅट या परीक्षांमधील सुयोग्य गुणांवर आधारित खासगी संस्थांच्या एमबीएमध्ये प्रवेश मिळू शकतो. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेमार्फत  सामायिक प्रवेश चाचणी कॅट (CAT) घेतली जाते. या परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास देशातील दर्जेदार आणि नामवंत बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही आतापासूनच चांगली तयारी करा. आपल्याकडे एमबीएचे शिक्षण देणाऱ्या असंख्य संस्था आहेत. त्यामुळे प्रवेश मिळणे सोपे आहे. मात्र, दर्जेदार संस्थेमधून एमबीए केल्यासच बाजारपेठेमध्ये चांगली संधी मिळू शकते; अन्यथा नाही.

 मी सध्या स्थापत्यशास्त्राच्या पदवीच्या तृतीय वर्षांला शिकत आहे. मला पदव्युतर पदवी  HYDRAULICS मध्ये मिळवायची आहे.  महाराष्ट्रात अथवा महाराष्ट्राबाहेरील कोणत्या महाविद्यालयातून मला हा अभ्यासक्रम शिकता येईल? हा अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या  महाविद्यालयांची माहिती कुठल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे का?
    – अमोल राणे
 एसआरएम युनिव्हर्सटिीत हा अभ्यासक्रम करता येईल. वेबसाइट- http://www.srmuniv.ac.in   शिवाय आयआयटी- रुरकीमध्ये हा अभ्यासक्रम करता येईल. वेबसाइट- http://www.iitr.ac.in    

 मी एलएल.बी.चे दुसरे वर्ष १९७८ मध्ये पूर्ण केले आहे. एलएल.बी. तिसरे वर्ष आता पूर्ण करता येईल का?
    – प्रमोद प्रभू, मुंबई
आपण साधारणत: ३६-३७ वर्षांपूर्वीच एलएल.बी.ची दुसऱ्या वर्षांची परीक्षा दिलेली आहे. या कालावधीत अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात आपण विद्यापीठातील कायदा महाविद्यालयांशी थेट संपर्क करणे सयुक्तिक ठरेल.
माझे वय २६ असून मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए करीत आहे. मला मुंबई विद्यापीठातून एमए, एलएलबी किंवा एमबीए करता येईल का? तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासंदर्भात आपले मार्गदर्शन हवे आहे.
    – वैभव घरत
आपण मुंबई विद्यापीठातून एमए, एलएलबी किंवा एमबीए करूशकता. आपल्याला कोणती स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, हे आधी निश्चित करा. म्हणजे त्यानुसार तयारी करणे सोयीचे जाईल. राज्य आणि केंद्रीय नागरी सेवा परीक्षेद्वारे उच्च शासकीय पदे भरली जातात. ही परीक्षा देण्यासाठी किमान अर्हता कोणत्याही विषयातील पदवी आहे. तथापि, या परीक्षेतील स्पर्धा आणि आवाका खूप मोठा असल्याने चौफेर आणि सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्या विषयासोबतच सामान्य अध्ययन,
विज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, इंग्रजी, काळ-काम-गतीचे गणितं सोडवणे शक्य होईल असे गणिताचे ज्ञान, दैनंदिन घडामोडी आदींचा अभ्यास आवश्यक आहे.