‘सीएसआयआर’ म्हणजेच काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे देण्यात येणाऱ्या संशोधनपर फेलोशिपसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
फेलोशिपनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे –
० सीनिअर रिसर्च फेलोशिप : अर्जदारांनी एमएस्सी, बीई, बीटेक् पात्रता ५५ टक्के गुणांसह, एमटेक्, एमई पात्रता
६० टक्के गुणांसह अथवा एमबीबीएस, बीडीएस पात्रता
६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पीएचडी पात्रताधारक असावेत.
० सीनिअर रिसर्च फेलोशिप (विस्तारित): ज्या उमेदवारांनी आपल्या संशोधनपर पीएचडीसाठीचा शोधप्रबंध सादर केला आहे असे उमेदवार या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत.
० रिसर्च असोसिएटशिप : अर्जदारांनी विज्ञान वा अभियांत्रिकी विषयातील पीएचडी अथवा एमडी, एमएस, एमडीएस, एमई, एमटेक, एमव्हीएससी यांसारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह पूर्ण केलेली असावी.
वयोगट : उमेदवाराचे वय ३२ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता, संशोधन कार्य, अनुभव आदींच्या आधारे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल आणि त्यात यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
पाठय़वृत्ती : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संशोधन कालावधीसाठी दरमहा २२ हजार ते २४ हजार रु. संशोधनपर पाठय़वृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना या कालावधीदरम्यान आकस्मिक खर्चापोटी २० हजार रु. देण्यात येतील.
अधिक माहिती : योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘सीएसआयआर’ची जाहिरात पाहावी अथवा सीएसआयआरच्या www.csirhrdg.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले अर्ज सायंटिस्ट इन्चार्ज, ईएमआर- १, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ग्रुप, सीएसआयआर कॉम्प्लेक्स, लायब्ररी अॅव्हेन्यू, पूसा, नवी दिल्ली ११००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर असून संगणकीय पद्धतीने सीएसआयआरच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख
२ सप्टेंबर २०१४ आहे.