संरक्षण उत्पादन विभाग- खडकी, पुणे येथे कुशल कामगारांच्या १४ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी एक्झामिनर, टर्नर, मशिनिस्ट, एन्ग्रेव्हर, ग्राइंडर, पेंटर यांसारख्या विषयातील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत, वयोमर्यादा ३६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी, एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते ९ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण उत्पादन विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक
ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज कंट्रोलरेट ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स (एएमएन), खडकी, पुणे ४११००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
१ डिसेंबर २०१२.
आयुध निर्माणी- अंबाझरी, नागपूर येथे खेळाडूंसाठी स्टोअर कीपरच्या ४ तर कनिष्ठ कारकुनांच्या ३ जागा : अर्जदारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ५०० मीटर्स धावणे, थाळी फेक, उंच व लांब उडी, शॉट पुट यांसारख्या क्रीडा प्रकारात राज्य वा राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ ३ ते ९ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी, अंबाझरी- नागपूरची जाहिरात पाहावी. अथवा http:\www.ofajadmin.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज केल्यावर अर्जाची प्रत जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी- नागपूर ४४००२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
२ डिसेंबर २०१२.
ओएनजीसीमध्ये मॅनेजर- मटेरियल म्हणून १० जागा : अर्जदारांनी इंजिनीअरिंगमधील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यानंतर त्यांनी मटेरियल मॅनेजमेंट एमबीए केलेले असावे आणि त्यांना संबंधित कामाचा १० वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा
४४ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित
झालेली ‘ओएनजीसी’ची जाहिरात पाहावी अथवा ओएनजीसीच्या http://www.ongcindia.com अथवा http://www.ongcreports.net या संकेतस्थळांना भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर) रिक्रुटमेंट, ओएनजीसी, बीएस नेगी भवन, कॉर्पोरेट आर अ‍ॅण्ड पी, तेल भवन, देहराडून- २४८००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१२.
सैन्यदलात बारावी उत्तीर्णासाठी ८५ जागा : अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन व कमीतकमी ७०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोगट १६.५ वे १९.५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करून त्याच्या २ प्रति अ‍ॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल ऑफ स्क्रिटिंग (आरटीजी-६), टीईएस सेक्शन, वेस्ट ब्लॉक ३, आर. के. पुरम, नवी दिल्ली-११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१२.
केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील कार्यालयांमध्ये २६६ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http:sconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने कर्मचारी निवड आयोगाच्या http:\www.ssconline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०१२.
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- २०१३ अंतर्गत ५०९ जागा : अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
इंडियन मिलिटरी अकादमी व ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी : कुठल्याही विषयातील पदवीधर.
इंडियन नेव्हल अकादमी : इंजिनीअरिंगमधील पदवीधर.
एअरफोर्स अकादमी : अर्जदारांनी गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून त्यानंतर इंजिनीअरिंगमधील पदवी घेतलेली असावी.
अर्जदार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असून त्यांचे वयोगट पुढीलप्रमाणे असावेत-
इंडियन मिलिटरी अकादमी : १७ ते २२ वर्षे.
एअरफोर्स अकादमी : १७ ते २१ वर्षे.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (महिला व पुरुष) : १७ ते २३ वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ नोव्हेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०१३ ची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१२.

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Exam fee waiver for students of class 10th 12th Pune news
मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने
How Much Expenditure on Salary of Retired Contract Teachers
सेवानिवृत्त निवृत्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर किती खर्च? जाणून घ्या सविस्तर…