शेतीच्या वाढत्या उत्पन्नामुळे शेतीविषयक तंत्रज्ञानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या क्षेत्राशी संबंधित कृषी अभियांत्रिकी या विद्याशाखेतील अभ्यासक्रमाचा आढावा आपण घेऊयात.
हरित क्रांतीपासून जे काही बदल होण्यास आपल्याकडे सुरुवात झाली त्याच वेळी व्यापार आणि व्यवसाय झपाटय़ाने वाढायला लागला. त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला गेल्या २० वर्षांत दिसून येत आहेत. हरितक्रांतीसोबत कृषी क्षेत्रामधील तंत्रज्ञान, रसायन आणि बी-बियाणे यांत होणाऱ्या प्रगतीचा रोख प्रामुख्याने कृषी तंत्रज्ञानाशी निगडित आहे. गेल्या काही वर्षांत शेती करताना तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होताना दिसतो. हे लक्षात घेत युवावर्गाने कृषी तंत्रज्ञानातील करिअरच्या नवनवीन संधी जाणून घ्यायला हव्यात.
कृषीविषयक विविध शिक्षणक्रमांत शेती निगडित व्यवस्थापन तंत्र, पिकांचे नियोजन व पुरवठा अशा विविध गोष्टींचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
अभ्यासक्रम –  ० बी.ई/ बी.टेक्. – बॅचलर ऑफ इंजिनीअिरग इन अॅग्रिकल्चरल/  बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन अॅग्रिकल्चरल इंजिनीअिरग.
० एम.ई/ एम.टेक्.- मास्टर ऑफ इंजिनीअिरग इन अॅग्रिकल्चरल/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन अॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग.
० बॅचलर ऑफ इंजिनीअिरग इन बायोइनफॉरमेटिक्स/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन बायोइनफॉरमेटिक्स.
० मास्टर ऑफ इंजिनीअिरग इन बायोइनफॉरमेटिक्स/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन बायोइनफॉरमेटिक्स.
 अर्हता – या विषयीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उमेदवार विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असावा. मात्र, बारावीमध्ये त्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
निवडप्रक्रिया – उमेदवार जेईई मेन्स ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतो. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (मास्टर्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अॅग्रिकल्चरल इंजिनीअिरग) ॅअळए ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. पदव्युत्तर शिक्षणानंतर इच्छुक उमेदवार याच विद्याशाखेत पीएच.डी. प्राप्त करू शकतात.
करिअर संधी- यात सरकारी क्षेत्रातच नव्हे तर खासगी क्षेत्रातसुद्धा प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्रामध्ये शिक्षण प्राप्त केलेल्या व्यक्ती राज्य सरकारच्या किंवा  केंद्र सरकारच्या कृषी विभागामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करू शकतात. याच क्षेत्रामध्ये पिकांचे नियोजन, पाण्याच्या पातळीचा अभ्यास आणि शेतीमध्ये वापरली जाणारी रसायने व औषधनिर्मिती या विषयीचे संशोधन करण्याची संधीसुद्धा प्राप्त होऊ शकते. मोठमोठय़ा अॅग्रो सीड्स कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळते. शेतीविषयक सल्लागार म्हणून काम करता येते. याशिवाय सरकारी किंवा खासगी क्षेत्रामध्ये कृषी विकास संघटनांमध्ये पदाधिकारी, कृषी विद्यापीठामध्ये प्राचार्य, प्रयोगशाळेमध्ये लॅब तंत्रज्ञ, कृषी सहकारी संस्थांमध्ये साहाय्यक, खत सिंचन कंपनीमध्ये साहाय्यक, उपकरण उत्पादन कंपन्या,  खासगी – स्वयंसेवी संस्था तसेच साखर, तांदूळ इत्यादी उद्योग सेवा संस्थांमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात.

शिक्षणसंस्था   
कृषी क्षेत्रामध्ये शेतीविषयी प्रशिक्षण देणाऱ्या अनेक उत्तम शिक्षणसंस्था आपल्या देशात अस्तित्वात आहेत. त्यातील काही प्रमुख शिक्षण संस्था खालीलप्रमाणे आहेत-
० इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर
० आसाम विद्यापीठ, आसाम
० बाबू बन्सारीदास विद्यापीठ, लखनौ
० तामिळनाडू अॅग्रिकल्चरल विद्यापीठ
० शोभित विद्यापीठ, दिल्ली
० आर. के. विद्यापीठ, राजकोट
० लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब
० आचार्य एन. जी. रांगा अॅग्रिकल्चरल विद्यापीठ, हैदराबाद
वेतन
या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तींचे सुरुवातीचे मासिक वेतन १० ते १५ हजारांपर्यंत असते. पुरेशा अनुभवानंतर ते सुमारे ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये या क्षेत्रातील अनुभवी व उच्च श्रेणीतील उमेदवारांना विदेशातही दर्जेदार वेतनाच्या संधी मिळू शकतात. तुम्ही जर विज्ञान शाखेत शिक्षण घेत असाल तर अॅग्रिकल्चरल इंजिनीअिरग करून कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची संधी उमेदवारांना मिळू शकते.