भारतीय संस्कृतीचा इतिहास समृद्ध व वैविध्यपूर्ण आहे. सिंधू संस्कृतीचा उदय व अस्त, आर्याचे स्थलांतर, ग्रीक, पíशयन,  शक, पहलव, कुशाण, हूण यांची प्राचीन काळातील आक्रमणे व त्यांचे भारतीयीकरण तसेच मध्ययुगीन काळातील इस्लामिक आक्रमणे व त्यांचे भारतीयीकरण या प्रक्रियेमधून भारतीय संस्कृती समृद्ध व वैविध्यपूर्ण झाली. हा संपूर्ण सांस्कृतिक प्रवास राजकीय, सामाजिक, आíथक, धार्मिक मन्वंतरांमधून घडतो, उत्क्रांत होतो. या मन्वंतरांच्या संदर्भासहित संस्कृतीचा केलेला अभ्यास अधिक सयुक्तिक ठरतो.
संस्कृतीचा अभ्यास म्हणजे नेमका कोणत्या घटकांचा अभ्यास हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. संस्कृतीमध्ये भाषा व साहित्य, वास्तुकला तसेच संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला यांसारख्या कलाविष्कारांचा अंतर्भाव होतो. एखाद्या कालखंडातील संस्कृतीच्या या सर्व अंगांचा अभ्यास व दोन किंवा अधिक कालखंडामधील त्यांचा परस्परसंबंध आणि उत्क्रांती यांचे आकलन अपेक्षित आहे. यासाठी किंबहुना इतिहासाच्या कोणत्याही अंगाच्या आकलनासाठी भारतीय इतिहासाची ढोबळ रूपरेखा पूर्णपणे समजून घेणे अत्यावश्यक ठरते. भारतीय अश्मयुगाचा यात अंतर्भाव करण्याची फारशी आवश्यकता नाही. अश्मयुगाचा ठउएफळ च्या पुस्तकांतून केलेला अभ्यास पुरेसा ठरतो. प्राचीन भारत (सिंधू संस्कृती, वैदिक काळ, वेदोत्तर/ मौर्यपूर्व काळ, मौर्यकाळ/ साम्राज्य, मौर्योत्तर/ गुप्तपूर्व काळ, गुप्त काळ/साम्राज्य, गुप्तोत्तर काळ), मध्ययुगीन भारत (आद्य मध्ययुगीन काळ- चोल साम्राज्य, गुर्जर प्रतिहार, राष्ट्रकूट, पाल यांचा संघर्ष); मध्ययुगीन काळ (सुल्तानशाही, मुघल साम्राज्य, दक्षिणेमध्ये विजयनगर व बहामनी राज्ये), आधुनिक भारत (कंपनीचा काळ, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा काळ, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारत) याला भारतीय इतिहासाची ढोबळ रूपरेखा म्हणता येईल. भारतीय संस्कृतीच्या संदर्भात आपण याचा विचार करू.
सिंधू संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीची वैशिष्टय़े, महत्त्वाची शहरे, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाज, धार्मिक धारणा, लिपी, मृतदेह पुरण्याच्या पद्धती, महत्त्वाचे अवशेष व त्यांचा अर्थ आणि या संस्कृतीचा ऱ्हास यांचा अंतर्भाव होतो. २०१४ च्या मुख्य परीक्षेमधील सिंधू संस्कृतीवरील प्रश्न या संस्कृतीमधील ‘नगररचनेचा अभ्यास व त्याचे आजच्या नगररचनेसंदर्भातील उपयोजनाचे प्रमाण’ या मुख्य मुद्दय़ावरील विवेचनाची अपेक्षा ठेवतो. सिंधू संस्कृती व आर्याचे आगमन यांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. सिंधू संस्कृतीचे लोक व आर्य यांच्यामध्ये कोणता असा संबंध होता की सिंधू संस्कृतीच्या संपूर्ण ऱ्हासानंतर आर्य आले हा मतभेदाचा मुख्य मुद्दा ठरतो. इतिहासकारांमधील वाद हा वाद म्हणूनच स्वीकारायचा असतो.
वैदिक काळापासून पुढे मात्र भारतीय इतिहास एका विशिष्ट उत्क्रांतीची साखळी दर्शवतो. वैदिक काळाची विभागणी दोन कालखंडात केली जाते- ऋग्वेदिक काळ व उत्तर वैदिक काळ. कारण ऋग्वेद रचला गेलेला काळ व त्यानंतरचा काळ हे उत्क्रांतीचे दोन टप्पे दर्शवतात. ऋग्वेदिक काळातील भटकी अर्थव्यवस्था उत्तर वैदिक काळात शेतीप्रधान होते. ऋग्वेदिक काळातील धार्मिक धारणा या साध्या व सोप्या होत्या. देवाची साधी गद्य स्तृती ही पूजा होती. बालविवाहाची प्रथा नव्हती तर विधवा पुनर्वविाहास संमती होती. स्त्रियांना शिक्षणाचा व सार्वजनिक सभांमध्ये सहभागाचा हक्क होता. इतकेच नव्हे तर ऋग्वेदाच्या काही ऋचा स्त्रियांनी रचल्या. उत्तर वैदिक काळात देवाची पद्य स्तृती (सामवेद), मंत्रांचा वापर (यजुर्वेद), जादुई मंत्रांचा वापर (अथर्ववेद) असा प्रवास दिसतो. याबरोबरच नंतरच्या वैदिक काळात यज्ञविधी व पशूबळी यांचे स्तोम वाढताना दिसते. ब्राह्मण साहित्यप्रकारामध्ये विधींच्या शास्त्रांचा ऊहापोह दिसतो. यज्ञविधी व पशूबळी यांच्या अतिरेकाला पहिली प्रतिक्रिया म्हणजे आरण्यक (ध्यानातून ज्ञानप्राप्ती) व उपनिषद (तत्त्वज्ञान) ही साहित्यकृती होय. या दोन्ही साहित्यकृतींनी विधींच्या अतिरेकावर टीका केली. ही प्रतिक्रिया मात्र वैदिक धर्मातर्गत प्रतिक्रिया ठरते.
विधी व पशूबळी यांच्या अतिरेकाला मिळालेल्या प्रतिक्रियांपकी वेदिक धर्माच्या अधिसत्तेला अमान्य करत वेगळे पर्याय निर्माण करणारी प्रतिक्रिया म्हणजे वेदोत्तर/मौर्यपूर्व काळात ६४ वेगवेगळ्या पंथांचा उदय. या ६४ पंथांपकी जैन व बौद्ध धर्मानी खऱ्या अर्थाने वैदिक धर्माला पर्याय निर्माण केला व त्याहीपुढे जाऊन बौद्ध धर्माने नवे आव्हान निर्माण केले. या दोन्ही धर्माच्या तत्त्वज्ञानाचा (जैन व बौद्ध साहित्य) सखोल अभ्यास अत्यंत आवश्यक ठरतो. या तत्त्वज्ञानाने भारतामध्ये धार्मिक सुधारणेचा पाया रोवला आणि भारतीय समाज व संस्कृतीवर दूरगामी परिणाम केला. विधी व पशूबळी यामध्ये ब्राह्मण व क्षत्रिय या वर्णाचे हितसंबंध गुंतले होते. क्षत्रियांना त्यांच्या अधिसत्तेला अधिमान्यता हवी होती तर ब्राह्मणांना उपजीविका. पशूंचा नाहक बळी पशूंची निकड असलेल्या वैश्य व शूद्रांच्या हितसंबंधाविरुद्ध गेला. एका बाजूला मोठा आíथक दर्जा असलेल्या वैश्य व शूद्रांना त्यास अनुसरून अपेक्षित सामाजिक दर्जा प्राप्त झाला नाही. या सर्वाची परिणती जैन व बौद्ध धर्माची लोकप्रियता वाढण्यात व वैदिक धर्माची लोकप्रियता घटण्यात झाली. या व्यतिरिक्त या काळातील महत्त्वाची बाब म्हणजे महाजनपदांचा उदय. हासुद्धा एका ताíकक उत्क्रांतीचा टप्पा ठरतो. ऋग्वेदिक काळातील भटक्या टोळ्या (जन) उत्तर वैदिक काळात स्थायिक होतात (जनपद). स्थर्य प्राप्त झालेल्या मानवी वसाहतींची वाटचाल स्थिर शेती, अधिकचं उत्पादन यातून नागरिकीकरणाकडे (महाजनपदे) होते. या नागरी केंद्राभोवती (महाजनपदे) राज्यांची निर्मिती होते. विविध स्रोतांमध्ये वेगवेगळे आकडे जरी असले तरी
१६ महाजनपदांचा उदय मान्य केला जातो. यापकी वत्स, अवंती, कोसल व मगध ही बुद्धांच्या काळातील महत्त्वाची महाजनपदं होय. सर्व महाजनपदांमध्ये मगध सर्वश्रेष्ठ ठरते. मौर्यापूर्वी हिरण्यक (िबबीसार, अजातशत्रू, उदयी इ.) शिशुनाग व नंद या घराण्यांनी मगधवर राज्य केले व त्याचा विस्तार केला. या काळातील तिसरा महत्त्वाचा धागा म्हणजे पारशी व ग्रीकांची परकीय आक्रमणे व त्यातून झालेली सांस्कृतिक देवाण-घेवाण. भारतावर आक्रमण करणारा सायरस हा पíशयन सम्राट होता तर नंदांच्या काळात अलेक्झांडरचे आक्रमण होते. महाजनपदांच्या व्यतिरिक्त काही गणसंघांचे अस्तित्वही महत्त्वाचे ठरते.
मौर्य साम्राज्य हे भारतातील पहिले व एक वैभवशाली साम्राज्य म्हणून गणले जाते. मौर्याच्या काळातील कौटिल्याचे अर्थशास्त्र (या १५ पुस्तकांच्या नेमक्या कालखंडाबाबत वाद आहे), अशोकचे स्तंभ व शिलालेख, अशोकाचा धम्म (हा धर्म नसून एक संहिता आहे), बौद्ध धर्माचा प्रसार, स्तूप, विहार, चत्य यांतील वास्तुकला यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. मौर्य साम्राज्याने जवळपास संपूर्ण भारतीय उपखंडाला एक केंद्रिभूत प्रशासन दिले व त्यातून रस्ते, कालवे, सिंचन यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास केला. या पायाचा उपयोग पुढील कालखंडातील (मौर्योत्तर/गुप्तपूर्व) आíथक भरभराटीला झाला. या व्यतिरिक्त ग्रीक, शक, पहलव, कुशाण यांच्या आक्रमणांमुळे जगातील अनेक भागांची भारतीय व्यापाऱ्यांना ओळख झाली. उत्तर – पश्चिमी भागात ग्रीक, शक, पहलव, कुशाण यांची राज्ये, पूर्वेकडे मौर्याना उलथवून टाकणारे शुंग राज्य, दक्षिण मध्य भागात सातवाहनांचे राज्य, दक्षिणेत चोल, चेरा, पाण्डय़, चालुक्य, काकतिय, होयसाळ इत्यादींची राज्ये असा काहीसा राजकीय पट दिसतो. या राजकीय विकेंद्रीकरणातून निर्मित स्वायत्तत्तेमुळे या काळात व्यापार, साहित्य, विज्ञान, कला, वास्तुकला अशा अनेक क्षेत्रांत मोठी प्रगती दिसून येते. या काळातील समाजाला स्थर्य प्राप्त करून देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे श्रेणी (Guild) होय. अनेक इतिहासकारांच्या मते, श्रेणींमधूनच भारतामध्ये संकीर्ण जातींचा उदय होतो. श्रेणींच्या माध्यमातून व्यापारास मोठी चालना मिळाली व भारताचा परकीय व्यापार वाढला. धातूकाम, वस्त्रोद्योग, मौल्यवान खडे, मोती, हस्तिदंत, काच, नाणी या उद्योगधंद्यामध्ये मोठी प्रगती दिसून येते. यातून निर्माण झालेल्या समृद्धीचा परिणाम मौय्रेत्तर व गुप्त काळातील समृद्ध सांस्कृतिक अभिव्यक्तीवर स्पष्ट जाणवतो. गांधार, मथुरा, अमरावती ही वैशिष्टपूर्ण कलेची केंद्रे, धर्मशास्त्र, वेदांग, पुराण या स्मृती साहित्याची निर्मिती, वैद्यकशास्त्र (चरक, शुश्रूत), संस्कृत व्याकरण (पाणिनी, पतांजली), नाटके व काव्य (हाल, अश्वघोष, भाष, वात्सायन), महायान बौद्ध तत्त्वज्ञान (नागार्जुनाचे माध्यमिक तत्त्वज्ञान, मििलदपान्हो), सहा पारंपरिक तत्त्वज्ञानांचा विकास (सांख्य, योग, वैषेशिक, न्याय, वेदांत व मीमांसा), भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान यांचा समावेश या काळातील संस्कृतीमध्ये होतो. तद्वतच, या काळात दक्षिण भारतामध्ये संगम साहित्याची निर्मिती होते, ज्यातून दक्षिण भारतातील राजकीय, सामाजिक, आíथक, सांस्कृतिक, धार्मिक जीवनावर प्रकाश पडतो.
संस्कृतीचा अभ्यास ऐतिहासिक उत्क्रांतीच्या अनुषंगाने करणे उपयुक्त ठरते. कोणत्याही कालखंडाच्या संस्कृतीचा अभ्यास करताना तत्त्कालीन सामाजिक, आíथक व राजकीय संदर्भाचा अभ्यास आवश्यक ठरतो. कारण हा संदर्भ कलेच्या, साहित्याच्या अभिव्यक्तीमध्ये प्रतििबबित होतो. सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासून मौय्रेत्तर कालखंडापर्यंतचा संस्कृतीच्या प्रवासाच्या सारांशाचा आपण वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला.
त्याचा संदर्भासहित सखोल अभ्यास आयोगाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरतो. पुढील लेखात आपण गुप्त कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंतचे सांस्कृतिक अवलोकन करू या.

disaster types
UPSC-MPSC : आपत्तीचे प्रकार कोणते? त्यांचा विविध क्षेत्रांवर कसा परिणाम होतो?
Disaster Management
UPSC-MPSC : आपत्ती म्हणजे नेमके काय? त्याचे किती प्रकार पडतात?
भारतीय संस्कृती आणि वारसा
महिला चळवळींचा उदय