कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिग असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर्स, कनिष्ठ कारकून यांसारख्या पदांवर नेमणूक करण्यासाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत –
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांच्याजवळ टंकलेखन-संगणकविषयक पात्रता असायला हवी.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १, १५ व २२ नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, अकोला व जळगाव या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना कौशल्य चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या सेवेत दरमहा ५२००-२०२०० + २४०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व लाभ देय असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १०० रु.ची टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी रिक्रुटमेंट टपाल तिकिटे लावणे आवश्यक आहे.
अर्जाचा तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची मुदत : राज्यातील विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील भरलेले व आवश्यक तो तपशील आणि रिक्रुटमेंट टपाल तिकिटांसह असणारे अर्ज क्षेत्रीय संचालक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर १३ जुलै २०१५ पर्यंत पाठवावेत.